Ration Card: ब्रेकिंग! राज्य सरकारने जारी केला आदेश; गहू-तांदळाबरोबर या वस्तू मिळणार मोफत..

0

Ration Card: देशातील गरीब नागरिक उपाशी राहू नये त्यासाठी केंद्र सरकार (central government) आणि राज्य सरकार (state government) रेशन कार्डच्या (ration card) माध्यमातून नागरिकांना मदत करत असते. सरकारच्या योजनांचा लाभ लाखो नागरिक घेताना दिसून येतात. कोरोना काळामध्ये केंद्र सरकारने मोफत गहू आणि तांदूळ देण्याचा देखील निर्णय घेतला. लॉकडाऊन मुळे मजुरांच्या हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला.

नागरिकांना अजूनही मोफत गहू आणि तांदूळ (wheat and rice) मिळत असला तरी केंद्र सरकार ही योजना बंद करण्याचा तयारीत आहे. अशातच आता राज्य सरकारकडून रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. गहू आणि तांदळाबरोबरच आणखीनही काही जीवनावश्यक वस्तू देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला असून, या संदर्भातले आदेश देखील पारित करण्यात आले आहेत. गहू आणि तांदळ याबरोबरच काही रक्कम आकारून साखर आणि मीठ देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे.

इतक्या कुटुंबाला मिळणार लाभ

केंद्र सरकारने मोफत गहू आणि तांदूळ देण्याचा निर्णय घेतला होता. सोबतच आता उत्तराखंड सरकार देखील तब्बल 23 लाख कुटुंबांना मोफत रेशन देण्याची योजना राबवणार आहे. याबरोबरच उत्तराखंड सरकार रेशन कार्डधारकांना नियमानुसार रेशन, मीठ आणि साखर काही रक्कम आकारून देणार आहे. या संदर्भातला आदेश देखील देण्यात आला आहे. उत्तराखंड सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवल तब्बल 65 लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च पडणार आहे.

सरकारवर अतिरिक्त 65 लाख कोटी रुपयांचा खर्च येणार असला तरी राज्यातील जनतेला या सुविधा दिल्या जाणार असल्याचं उत्तराखंडच्या अन्नमंत्र्यांनी सांगितले आहे. या योजना राबवण्यासाठी मंत्रिमंडळात यासंदर्भातलं बजेट देखील तयार केलं आहे. उत्तराखंड अन्नमंत्र्यांनी तयार केलेल्या या बजेटमध्ये 2023 मध्ये रेशन कार्डधारकांना मोफत रेशन दिले जाणार आहे. उत्तराखंड सरकारकडून राज्यातील जनतेला रेशन आणि मीठ मोफत दिले जाणार आहे. तर साखरेवर काही रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.

अन्नमंत्र्यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले, रेशन बरोबरच राज्यातील जनतेच्या स्वयंपाक घरात रेशन त्याचबरोबर साखर आणि मीठ जायला हवं, हा आमचा उद्देश आहे. राज्य सरकार दहा ते पंधरा रुपयांपर्यंत साखरेवर सबसिडी देणार आहे. सुरुवातीला साखरेवर दहा रुपयांची सबसिडी देण्यात येणार आहे. काही दिवसांनी पंधरा रुपयांपर्यंत वाढवण्यावर देखील विचार केला जाऊ शकतो, असं अन्न मंत्री म्हणाले.

हे देखील वाचा BPL Ration Card: आता बीपीएल रेशन कार्डसाठी तुम्हालाही करता येणार अर्ज; जाणून घ्या फायदे आणि असा करा अर्ज..

KL Rahul-Athiya Shetty: केएल राहुलचा हनिमून संदर्भात धक्कादायक निर्णय; रिसेप्शन पार्टीबद्दलही मोठा खुलासा..

Cricket Love Story: कार्तिक मुरली विजय घटनेची पुनरावृत्ती; या खेळाडूने मित्राच्या पत्नी सोबतच लग्न केल्याने खळबळ..

LIC: एलआयसी मध्ये या उमेदवारांसाठी 9400 जागांची मेगाभरती; जाणून घ्या सविस्तर..

MPSC: MPSC च्या 8 हजाराहून अधिक जागांची मेगा भरती; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Kissing Tips: पहिलं kiss चुकलं तर होईल सत्यानाश; जाणून घ्या पहिल्यांदा किस करताना कोणती काळजी घ्यायची..

Women Like Condom: महिलांना हा कंडोम आवडतो सर्वाधिक; लैंगिक संबंधा दरम्यान देतो जास्त आनंद..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.