Rahul Dravid: ..म्हणून कोहली रोहीतला टी-ट्वेंटी टीममधून वगळले; राहूल द्रविडच्या विधानाने खळबळ..

0

Rahul Dravid: सध्या भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यामध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. आज तिसरा एकदिवसीय सामना इंदोर क्रिकेट मैदानात सुरू आहे. सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि गिल (Shubman Gill) या दोघांनी आक्रमक शतके झळकावत भारताला दमदार सुरुवात करून दिली. मात्र मधल्या फळीने निराशा केल्याने जबरदस्त सुरुवातीनंतरही भारत 385 धावांपर्यंत मजल मारू शकला. मात्र सामना सुरू होण्यापूर्वी राहुल द्रविडने रोहित शर्मा आणि विराट कोहलीला (virat kohli) टी-ट्वेंटी संघातून (T20 cricket team) वगळण्याचे कारण स्पष्ट केल्याने खळबळ उडाली आहे.

आगामी टी ट्वेण्टी विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी भारतीय संघ आतापासूनच कामाला लागला लागला आहे. बीसीसीआयने अनेक बड्या खेळाडूंना टी-ट्वेंटी संघातून बाजूला करत नवीन खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी टी 20 विश्वचषक स्पर्धा हार्दिक पांड्याच्या (hardik Pandya) नेतृत्वात खेळली जाणार असून, आतापासूनच संघ बांधणी सुरू केली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली भुवनेश्वर कुमार, अश्विन शिवाय भारत आगामी टी-ट्वेंटी संघ तयार करत आहे.

एकीकडे रोहित शर्मा, विराट कोहली या दोन बड्या खेळाडूंना टी 20 संघातून वगळलं असलं तर दुसरीकडे मात्र कोच राहुल द्रविडने भलतंच वक्तव्य केल्याने आता पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आला आहे. राहुल द्रविडने रोहित शर्मा आणि विराट कोहलीला वगळण्याचे कारण स्पष्ट केल्याने राहुल द्रविडला देखील अंधारात ठेवून बीसीसीआयने हा निर्णय घेतल्याचं स्पष्ट होत आहे. वर्कलोड मॅनेजमेंटमुळे विराट कोहली आणि रोहित शर्माला टी20 संघातून काही काळ दूर ठेवले असल्याचे विधान राहुल द्रविडने केल्याने नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी पत्रकारपरिषदेत राहुल द्रविड म्हणाला, दुखापत आणि वर्कलोड मॅनेजर मॅनेजमेंट (workload management) या दोन वेगवेगळ्या गोष्टी असून खेळाडूंना पुरेशी विश्रांती मिळणे आवश्यक आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय आणि टेस्ट मालिकांसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. बीसीसीआयने (BCCI) देखील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीला आयपीएलमध्ये सिनियर खेळाडूंच्या वर्क मॅनेजमेंटवर लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.

एकदिवसीय विश्वचषकामध्ये समाविष्ट असणाऱ्या सीनियर खेळाडूंना वर्कलोड मॅनेजमेंट अंतर्गत पुरेशी विश्रांती देणे आवश्यक आहे. सिनियर खेळाडू महत्वाच्या स्पर्धांमध्ये खूप महत्वाचा भाग असतात. यावर्षी होणाऱ्या विश्वचषकामध्ये खेळणारे महत्त्वाचे खेळाडू आयपीएलमध्ये देखील खेळणार आहेत. कारण टी-ट्वेंटी क्रिकेटमधून आक्रमक फलंदाजीसाठी खेळाडूंना आणखी काही कौशल्य सामाविष्ट करता येऊ शकतात.

भारतीय क्रिकेट संघाचा कोच राहुल द्रविड यांच्या या विधानामुळे क्रिकेटच्या तिन्हीं प्रकारात वेगवेगळे कर्णधार निवडले जाणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. एकीकडे राहुल द्रविड क्रिकेटच्या तिन्हीं प्रकारांमध्ये वेगवेगळे कर्णधार निवडण्यासाठी इच्छूक नसले तरी दुसरीकडे मात्र निवड समिती आणि बीसीसीआयने टी ट्वेंटी, एकदिवसीय आणि टेस्ट क्रिकेटमध्ये आम्ही यापुढे वेगवेगळे कर्णधार निवडण्यावर सकारात्मक असल्याचं स्पष्ट केले आहे. त्यामुळे हा वाद आता आणखीन चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे देखील वाचा KL Rahul-Athiya Shetty: केएल राहुलचा हनिमून संदर्भात धक्कादायक निर्णय; रिसेप्शन पार्टीबद्दलही मोठा खुलासा..

ICF Recruitment 2023: दहावी बारावी उमेदवारांसाठी या विभागात मोठी भरती; परीक्षा विना अशी केली जाणार निवड..

Ration Card: ब्रेकिंग! राज्य सरकारने जारी केला आदेश; गहू-तांदळाबरोबर या वस्तू मिळणार मोफत..

BPL Ration Card: आता बीपीएल रेशन कार्डसाठी तुम्हालाही करता येणार अर्ज; जाणून घ्या फायदे आणि असा करा अर्ज..

Cricket Love Story: कार्तिक मुरली विजय घटनेची पुनरावृत्ती; या खेळाडूने मित्राच्या पत्नी सोबतच लग्न केल्याने खळबळ..

Belly fat: पोट सुटण्याची ही आहेत प्रमुख करणे; जाणून घ्या पोट कमी करण्याचे उपाय..

Kissing Tips: पहिलं kiss चुकलं तर होईल सत्यानाश; जाणून घ्या पहिल्यांदा किस करताना कोणती काळजी घ्यायची..

Women Like Condom: महिलांना हा कंडोम आवडतो सर्वाधिक; लैंगिक संबंधा दरम्यान देतो जास्त आनंद..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.