Hair fall tips: म्हणून गळतात पुरुषाचे केस; त्वरित थांबवा या चुका तरच टक्कल पडण्यापासून वाचाल..

0

Hair fall tips: धावपळीच्या या युगात आता प्रत्येकाची लाईफस्टाईल (lifestyle) बदलली आहे. स्पर्धेच्या या युगामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात धावपळ होते. साहजिकच यामुळे निरोगी आहार, पुरेसा व्यायाम, यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्यायला बिलकुल वेळ नसतो. त्याचे परिणाम आरोग्यावर होतात, अन् अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. लाईफस्टाइल हीच आपल्या निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली असते. मात्र चुकीच्या लाईफस्टाईलमुळे आपल्या आरोग्यावर देखील त्याचा परिणाम होतो. केस गळती हा देखील त्याचाच एक भाग आहे. जाणून घेऊया केस गळण्याची कारणे काय आहेत.

खूप कमी वयामध्ये अनेकांना टक्कल पडल्याचं तुम्ही पाहिलं असेल. निरोगी आहार आणि केसाची व्यवस्थित काळजी घेतली तर टक्कल पडण्यापासून स्वतःचे संरक्षण करता येऊ शकतं. केस गळतीला तुम्ही स्वतः जबाबदार असता. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, मात्र हे खरे आहे. अनुवंशिकता हा एक वेगळा भाग असू शकतो. मात्र बऱ्याचदा तुमच्या सवयींमुळे तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतात. केस गळती ही समस्या देखील तुमच्याच चुकीमुळे उद्भवते.

शरीराच्या प्रत्येक अवयवाची व्यवस्थित निगा राखणे हे तुमचं प्राथमिक काम असतं. मात्र अनेकदा याकडे दुर्लक्ष होतं. केस धुताना प्रचंड घाई होते. त्यामुळे केस व्यवस्थित धुतले जात नाहीत. यामुळे तुमच्या टाळूवर कोंड्यासारखा प्रकार देखील जमा होत असतो. डोक्यावरची त्वचा कोरडी पडली जाते. साहजिकच याचे परिणाम म्हणून केस गळती सारखी समस्या जन्म घेते. तुम्ही आठवड्यातून दोन वेळा जरी तुमचं डोकं व्यवस्थित धुवून घेतलं, तर तुम्हाला केस गळण्यापासून संरक्षण मिळू शकतं.

यामुळे केस गळू लागतात.

महिला आणि पुरुषांच्या केसाची तुलना केली तर पुरुष नियमितपणे आपलं डोकं धुवत असतात. महिला मात्र आठवड्यातून एकदा किंवा दहा-बारा दिवसातून एक दोन वेळा केस धुवत असतात. दररोज केस धुल्यामुळे केसांमध्ये असणारे नैसर्गिक तेल नाहीसे होते. नियमितपणे आपण केस धुवत असताना शाम्पू किंवा साबणाचा वापर करतो. यामुळे केसाला मिळणारे नैसर्गिक आणि आवश्यक पोषक मिळत नाहीत. साहजिकच यामुळे केस कमकुवत होतात. आणि केस गळती सारखी समस्या उद्भवते. म्हणून रोज केस धुण्याऐवजी आठवड्यातून दोन वेळा व्यवस्थित केस धुवावे.

प्रत्येक पुरुषांना आपलेही केस मुलायम असावे असे वाटत असते. यासाठी अनेक जण बाजारामध्ये मिळणारे अनेक महागडे प्रोडक्ट्स देखील वापरतात. वेगवेगळ्या हेअर स्टाईल मिळवण्यासाठी स्टायलिंग प्रोडक्ट वापरलं जातं. अशा प्रॉडक्टमध्ये खूप मोठ्या प्रमाणात केमिकल्सची मात्रा असते. या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो. कोणत्याही प्रकारचे केमिकल हे फायद्यापेक्षा नुकसानकारकच जास्त असतं. केस गळतीला हे देखील एक महत्वाचे कारण आहे.

हे देखील वाचा KL Rahul Athiya Shetty marriage: विराट धोनी कडून केएल राहुला दोन कोटीहून अधिक किमतीच्या वस्तू भेट; जाणून घ्या काय दिल्या भेट वस्तू..

INDvsNZ T20 series: टी-ट्वेण्टी संघात निवड करूनही ‘पृथ्वी शॉ’ला BCCI चा दणका..

msrtc recruitment 2023: 8वी 10वी उत्तीर्णांसाठी एसटी महामंडळात मोठी भरती; जाणून घ्या डिटेल्स..

Rahul Dravid: ..म्हणून कोहली रोहीतला टी-ट्वेंटी टीममधून वगळले; राहूल द्रविडच्या विधानाने खळबळ..

ICF Recruitment 2023: दहावी बारावी उमेदवारांसाठी या विभागात मोठी भरती; परीक्षा विना अशी केली जाणार निवड..

BPL Ration Card: आता बीपीएल रेशन कार्डसाठी तुम्हालाही करता येणार अर्ज; जाणून घ्या फायदे आणि असा करा अर्ज..

KL Rahul-Athiya Shetty: केएल राहुलचा हनिमून संदर्भात धक्कादायक निर्णय; रिसेप्शन पार्टीबद्दलही मोठा खुलासा..

Marriage: नवरदेवाने भरमंडपातच सगळ्या लोकांसमोर नवरीला केले Kiss, नवरी गेली थेट पोलीस स्टेशनला.. 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.