Bank of Maharashtra Bharti 2023: या उमेदवारांसाठी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये विविध पदांची मेगा भरती..

0

Bank of Maharashtra Bharti 2023: तुम्ही देखील जर बँकेत नोकरी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये विविध पदांसाठी भरती आयोजित केली असून, या संदर्भातली अधिसूचना देखील जारी करण्यात आलेली आहे. पदानुसार इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची मुदत सहा फेब्रुवारी 2023 निश्चित करण्यात आली आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये विविध पदांसाठी केल्या जाणाऱ्या भरतीसाठी एकूण 255 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. 255 रिक्त जागांसाठी उमेदवारांची काय पात्रता ठेवण्यात आलेले आहे? त्यासोबतच कोण-कोणत्या पदासाठी 255 जागा भरण्यात येणार आहेत? याविषयी जाणून घेऊया सविस्तर.

अर्थशास्त्रज्ञ या विभागामध्ये एकूण दोन रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता ही अर्थशास्त्र पदव्युत्तर असणे आवश्यक आहे. सोबतच पाच वर्षाचा अनुभव देखील असणे गरजेचे आहे. ‘सुरक्षा अधिकारी’ या पदासाठी एकूण दहा रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी संपादन केलेली असणे आवश्यक आहे. सोबतच दहा वर्षाचा अनुभव देखील गरजेचा आहे.

स्थापत्य अभियंता या पदासाठी एकूण तीन रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी संपादन केलेली असणे आवश्यक आहे. सोबतच पाच वर्षाचा अनुभव देखील गरजेचे आहे. ‘कायदा अधिकारी’ या पदासाठी एकूण दहा रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही मान्यता प्राप्त विद्यापीठातून कायद्यातील बॅचलर पदवी संपादन केलेले असणे आवश्यक आहे. सोबतच सात वर्षाचा अनुभव देखील गरजेचा आहे.

‘व्यवसाय विकास अधिकारी’ या पदासाठी 49 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी शैक्षणिक पात्रता, मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर त्याचबरोबर एमबीए मार्केटिंग/ पीजीडी एमबीए पदवी संपादन केलेली असणे आवश्यक आहे. सोबतच तीन वर्षाचा अनुभव देखील असणे गरजेचे आहे. ‘विद्युत अभियंता’ या पदासाठी एकूण दोन रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी पदवी उमेदवाराने संपादन केलेली असणे गरजेचे आहे. या सोबतच तीन वर्षाचा अनुभव देखील आवश्यक आहे.

‘राजभाषा अधिकारी’ या पदासाठी एकूण 15 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता ही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी संपादन केलेली आवश्यक आहे. तीन वर्षाचा अनुभव देखील आवश्यक आहे. ‘आयटी विशेष अधिकारी’ या पदासाठी एकूण 123 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रताही मान्यता प्राप्त विद्यापीठातून बी टेक/ एमसीए/बी ई/ एमएससी ही पदवी संपादन केलेली असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा/ परीक्षा फी

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये केल्या जाणाऱ्या भरतीसाठी उमेदवारांच्या वयाचा विचार करायचा झाल्यास, 31 आक्टोंबर 2022 रोजी उमेदवारांचे वय 21 ते 38 वर्ष असणे आवश्यक आहे. सोबतच सरकारी नियमानुसार एससी आणि एसटी उमेदवारांसाठी पाच वर्षाची सूट दिली जाणार आहे. तर ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्षाची अतिरिक्त सूट असणार आहे. उमेदवारांना 1180 रुपये परीक्षा फी आकारली जाणार आहे. एससी/एसटी आणि पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी मात्र 118 रुपये परीक्षा फी असणार आहे.

वेतन आणि ऑनलाईन अर्ज

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारांना 48 हजार 170 ते 78 हजार 230 रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे. नोकरीचे ठिकाणी संपूर्ण भारतभर असणार आहे. उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 फेब्रुवारी 2023 ठेवण्यात आली असून, उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. सर्वप्रथम आपल्या मोबाईल मधील क्रोम वर जाऊन www.bankofmaharashtra.in असं सर्च करायचं आहे. त्यानंतर तुम्ही सविस्तर माहिती वाचून अर्ज करू शकता.

हे देखील वाचा Pathaan: तो सीन सुरू होताच चाहते स्क्रीन समोर बेभान होऊन नाचू लागले; पाहा व्हिडिओ..

KL Rahul Athiya Shetty marriage: विराट धोनी कडून केएल राहुला दोन कोटीहून अधिक किमतीच्या वस्तू भेट; जाणून घ्या काय दिल्या भेट वस्तू..

INDvsNZ T20 series: टी-ट्वेण्टी संघात निवड करूनही पृथ्वी शॉला BCCI चा दणका..

msrtc recruitment 2023: 8वी 10वी उत्तीर्णांसाठी एसटी महामंडळात मोठी भरती; जाणून घ्या डिटेल्स..

Rahul Dravid: ..म्हणून कोहली रोहीतला टी-ट्वेंटी टीममधून वगळले; राहूल द्रविडच्या विधानाने खळबळ..

ICF Recruitment 2023: दहावी बारावी उमेदवारांसाठी या विभागात मोठी भरती; परीक्षा विना अशी केली जाणार निवड..

Ration Card: ब्रेकिंग! राज्य सरकारने जारी केला आदेश; गहू-तांदळाबरोबर या वस्तू मिळणार मोफत..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.