Relationship Advice: बायको रागावली? झटक्यात राग दूर करण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स..

0

Relationship Advice नवरा-बायकोचं नातं प्रेम, आदर, सन्मान, विश्वास आणि समर्पण या गोष्टींवर टिकून असतं. मात्र अलीकडे धावपळीमुळे या गोष्टीमुळे नकळत आपले दुर्लक्ष झालं आहे. आता बऱ्यापैकी नवरा बायको दोघेही नोकरी करतात. बायकोला नोकरी करत असताना घरही सांभाळावं लागतं. जबाबदाऱ्या, टेन्शन जास्त असल्याने बायकांची लवकर चिडचिड होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे अनेकवेळा नवरा-बायकोचे खटके उडत असतात. सध्या कामाचा लोड, सोशल मीडिया, जगण्याचे स्वातंत्र्य यामुळे खटक्यांच प्रमाण जास्त वाढलेलं दिसत आहे. यातून भांडण शेवटच्या टोकाला जाण्याची शक्यता असते. मात्र आपण परिस्थिती हाताबाहेर जावू नये म्हणून, वेळीच प्रयत्न करायला हवेत. त्यामुळे बायको जर रागावली असेल, तर तिला शांत कसे करायचे? ही कला पुरुषांना अवगत असली पाहिजे. जाणून घेऊया सविस्तर.

रागाचं कारण शोधा

बायको जर चिडली तर आपण बहुतेक वेळा तिच्याकडे दुर्लक्ष करतो. बरेच पुरुष तर बायकोबरोबर भांडण झालं की घरातून रागाने निघून जातात. पण असे न करता ती नेमकी का चिडलीये? तिच्या रागाचं नेमक कारण आहे? हे आपण शोधायला पाहिजे. त्यासाठी स्वतः शांत व्हा, आणि बायकोला जवळ घेऊन शांततेत तिच्या रागाचं कारण विचारा. असं केल्याने नवऱ्याने आपल्या रागाकडे दुर्लक्ष केलं नाही, हे पाहून तिचा राग आपोआपच शांत होईल.

तिचे काय म्हणणे आहे?

अनेकवेळा नवरा-बायकोच्या भांडणात पुरुषांचा अहंकार आडवा येतो. पुरुष मंडळी आपले मत बायकोवर लादत असतात. मात्र तिचे नेमके काय मत आहे, हे कधीच ऐकून घेत नाहीत. बायकोचे ऐकलं तर तर ती डोक्यावर बसेल, विचित्र ही भीती पुरुषांना असते. पण घरात शांतता हवी असेल, तर आपण आपल्या मताला जसे महत्व देतो, तसे बायकोच्या मतालाही महत्व द्या. तुम्ही तिचे मत ऐकून जर तिला समजून घेत असाल, तर तिचा राग लगेच शांत होईल.

बायकांना जसा लवकर राग येतो, तसा लवकर जातोही. त्यामुळे तिला हसवण्याचा प्रयत्न करा. बायकोचा राग जर झटपट घालवायचा असेल, तर, स्मित हास्य करून एकटक तिच्याकडेच पाहत रहा. थोड्या वेळात तीही तुमच्या सारखं स्मित हास्य करून तिची चूक असेल, तर ती मान्य करून तुमची माफीही मागेल. या पद्धतीने जर तुम्ही बायकोचा राग घालवत असाल, तर भांडण टोकाला जाणार नाही.

बायकांना खुश करायला जास्त पैसा किंवा खूप वेळ लागत नाही. छोट्या-छोट्या गोष्टीमुळे त्या आनंदित होत असतात. त्यामुळे तुमची बायको जर तुमच्यावर चिडली असेल, तर तिला बाहेर फिरायला, हॉटेलमध्ये जेवायला किंवा शॉपिंगला घेऊन जावा. जर तुम्ही स्वतः हा काढला तर तिचा अर्धा राग तिथेच शांत झालेला तुम्हाला पाहायला मिळेल.

नवरा बायकोच भांडण झालं तर तू तू, मैं मैं बराच वेळ सुरू असते. समोरची व्यक्ती रागात असताना आपण असं काहीतरी अजून बोलून जातो, कि तो राग कमी होण्याऐवजी अजून वाढतो. त्यामुळे आपली बायको जर आपल्यावर चिडली असेल, तर तिच्या रागावर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. तिला थोडा वेळा द्या. त्यांनतर तिच्याशी शांततेत बोला. तिची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करा. यामुळे नात्यातलं प्रेम वाढतं. सोबतच तिचा राग देखील शांत होतो.

शारीरिक संबंध दोन व्यक्तींना भावनिकरित्या जोडण्यास मदत करतात, असं अनेक संशोधनांमधून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे तुम्ही शारीरिक संबंधाच्या माध्यमातूनही बायकोचा राग दूर करू शकता. बायकोचा राग घालवण्यासाठी फूल, भेटवस्तू देणं हा चांगला पर्याय ठरू शकतो. घरी येताना एखादा बुके, गजरा किंवा गुलाबाचं फूल आणून बायकोला द्या. यामुळे तिचा राग दूर होईल.

हे देखील वाचा IND vs AUS: अखेर दुसऱ्या कसोटी सामन्यात केएल राहुलचा पत्ता होणार कट..

पोटनिवडणूक: टिळकांच्या मरणाची गिधाडाप्रमाणे वाट पाहणाऱ्याला तिकीट देताना लाज वाटली नाही? शैलेश टिळकांचा फडणवीसांवर हल्लाबोल..

Chetan Sharma: विराट कोहली खोटारडा, हे खेळाडू घेतात तसले इंजेक्शन; चेतन शर्माच्या विधानाने BCCI मध्ये भूकंप, पाहा व्हिडिओ..

Relationship Tips: लग्नानंतर पार्टनर सोबत असं केलं तरच प्रेम आणि सन्मान वाढतो..

Age for marriage: लग्न करण्याचे योग्य वय जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.