Marriage Tips: लग्न न करण्याचे गंभीर परिणाम जाणून सरकेल पायाखालची जमीन; समाजाचा दृष्टिकोनही बदलतो..

0

Marriage Tips: लग्न म्हणजे दोन व्यक्तींचं, दोन परिवाराचं मिलन. लग्न म्हणजे प्रेम, जबाबदारी आणि बरच काही. भारतीय संस्कृतीनुसार लग्नाला खुप महत्व आहे. परंतु अलिकडच्या काळात लग्न न करता लिव्ह इन रिलेशनशिप किंवा एकटे राहण्याचा विचार रुढ होत चालला आहे. लग्न हा माणसाच्या जीवनातला खूप महत्वाचा टप्पा मानला जातो. लग्नानंतरच खऱ्या अर्थाने आयुष्याला सुरुवात होते. मात्र अलीकडे जस जसा काळ बदलतोय तशी माणसाची विचारसरणीही बदलत आहे. बदलत्या काळानुसार माणसाच्या जीवन जगण्याच्या संकल्पनाही बदलत चालल्या आहेत. (Side effects of being single)

लग्न करण्याच्या संकल्पनेबद्दल देखील आता लोकांचे विचार बदलत चालले आहेत. म्हणूनच अलिकडच्य़ा काळात अनेकजण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणं किंवा एकटे राहणं पसंत करतात. अनेक मुलं मुली लग्न न करण्याचा निर्णय घेतात. म्हणूनच आजच्या काळात लग्न करणे योग्य की नाही? किंवा लग्न केल्याने काय होते, न केल्याने काय होते? अशा विषयांवर बोलणे महत्वाचे ठरते. आजच्या लेखात आपण लग्न न केल्याने काय होऊ शकते? याविषयी बोलणार आहोत.

लग्न करायलाच हवं, असे काय आहे लग्नात. तर मित्र मैत्रिणींनो आधी आपण या मागची भावना समजून घेतली पाहीजे. माणूस जन्माला आल्यानंतर, त्याला बालपण, तरुणपण आणि म्हातारपण अशा तीन टप्प्यातून जावे लागते. बालपणात आई-वडील आपले कौतूक करत सांभाळतात, मोठे करतात. उत्तम शिक्षण देऊन स्वबळावर ऊभे राहण्याचा मार्ग दाखवतात. तरुणपणी माणसाला स्वतःचे निर्णय स्वतः घेऊन आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून स्वतःच्या जीवनाचा मार्ग निवडायचा असतो.

यात लग्न हा मुख्य घटक आला. लग्न हा केवळ संस्कार, जबाबदारी नाही तर दोन जीवांच्या प्रेमाचा धागा आहे. आयुष्याच्या शेवटपर्यंत एकमेकांना साथ देण्याची एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणे, भावना समजून घेणे महत्वाचे ठरते. म्हणूनच लग्नाना भारतीय संस्कृतीत प्रचंड महत्व आहे. मात्र अनेक जण लग्न न करण्याचा देखील निर्णय घेतात. लग्न न केल्यामुळे आयुष्यामध्ये काय समस्या उद्भवतात, जाणून घेऊया सविस्तर.

लग्न न करणे म्हणजे एकटेपणा स्विकारणे होय. मग माणूस आयुष्यभर खरोखर एकटा राहू शकतो का? तर नाही. माणसाला जीवन जगताना एका सवंगड्याची, सोबतीची गरज असते. माणसाला मन, विचार, भावना आहेत. त्यामुळे त्याला व्यक्त होण्यासाठी, आनंद, दुःख वाटून घेण्यासाठी कुणाची तरी सोबत हवीच असते. तुम्ही म्हणाल, मित्र-मैत्रीणी असतातच की, तर मित्र मैत्रिणी हे त्या त्या वेळेपुरते आपल्या सोबत राहू शकतील. मात्र कायमची सोबत ते देऊ शकत नाहीत. हा निसर्गाचा नियम आहे. आयुष्यात सोबत जर कुणी देऊ शकत असेल, तर तो आपला जोडीदार असतो. मग लग्न करून जोडीदारासोबत आयुष्य घालवणे काय वाईट?

शिवाय लग्न न केल्याने आपल्याला एकटेपणा तर येतोच मात्र, याचे अजूनही काही दुष्परिणाम आहेत ते जाणून तुम्ही देखील चकीत व्हाल.जे अविवाहित आहेत त्यांच्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोण बदलतो. तुम्ही अविवाहीत असाल, आणि एखाद्या स्त्री सोबत तुमची मैत्री जरी असेल तरी लोक तुमच्याकडे संशयाच्या नजरेने पाहू शकतात. तुम्ही लग्न न केल्याने तुमचे बाहेर अनैतिक संबंध देखील असू शकतात असा देखील लोकांचा समज होत असतो.

लग्न म्हणजे दोन शरीराचे मिलन. त्यामुळे लग्न न केल्याने शारीरीक सुख उपभोगता येत नाही. त्यामुळे शरीरातील उत्साह कमी होतो. असा देखील सर्वे समोर आला आहे. या बरोबरच आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये आपण एकटेच पडू शकतो, अशी चिंता देखील नेहमी सतावत राहण्याची शक्यता असते. माणूस एकटा राहिल्यामुळे सतत विचित्र विचार देखील मनात येण्याची शक्यता असते.

लग्न न केल्यामुळे समाजातील महिला आपल्या सोबत बोलताना दहा वेळा विचार करतात. समाजातील महिलांना या पुरुषाची नजर आपल्यावर वाईट असू शकते. असं वाटत राहतं. साहजिकच यामुळे महिला आपल्याशी बोलत देखील नाहीत. लग्न न केल्याने जीवनात एकटेपणा येण्याची शक्यता असते. यामुळे त्यामुळे नैराश्यात देखील जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हे देखील वाचा Marriage Tips: ..म्हणून लग्नाआधी लावतात हळद; हळद लावण्याची सहा करणे जाऊन तुम्हालाही बसेल धक्का..

Relationship tips: पुरुषांमध्ये या प्रकारची देहबोली असेल, तर स्त्रिया होतात आकर्षित..

Relationship Tips: ती हे इशारे करत असेल तर समजून जा तुमच्या प्रेमात झालीय पागल..

Mahashivratri 2023: ..म्हणून महादेवाचे बेलपत्रावर आहे विशेष प्रेम; शिवलिंगावर बेलपत्र वाहण्याचे महत्व जाणून व्हाल चकित..

Second Hand Bike: सेकंड हॅण्ड Hero HF Deluxe मिळतेय फक्त 20 हजारामध्ये; जाणून घ्या याविषयी सविस्तर.

Chanakya Niti: लग्नापूर्वी या तीन गोष्टी जाणून घ्या अन्यथा उध्वस्त होईल आयुष्य..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.