Yojana: शेततळे बांधण्यासाठी 1 लाख 10 हजार अनुदान देण्याचा राज्य सरकारचा निर्णय..

0

Yojana: शेतकऱ्याचे आर्थिक उत्पन्न सुधारण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार अनेक योजना राबवत असते. एवढेच नाही, तर शेतकऱ्याला आर्थिक मदत व्हावी, यासाठी केंद्र सरकारने पीएम किसान योजनेची देखील सुरुवात केली. शेतीसाठी पाणी हा खूप महत्त्वाचा घटक आहे. पाण्याशिवाय शेती करणे शक्य नाही. साहजिकच या सगळ्या गोष्टीचा विचार करून सरकार शेततळे ही योजना देखील राबवत आहे. शेततळे बांधण्यासाठी लागणाऱ्या निधीमध्ये राज्य सरकारने वाढ केली असून, आता शेतकऱ्यांना एक लाख दहा हजार रुपये अनुदान मिळणार आहे.

महाराष्ट्रमध्ये फडणवीस यांनी मागेल त्याला शेततळे ही योजना सुरू केली होती. योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपल्या शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा कायमस्वरुपी तोडगा काढल्याचे दिसून आले. शेतीच्या पाण्यासाठी सिंचनाचे कोणतेही साधन नसणाऱ्या शेतकऱ्यांनी ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेच्या माध्यमातून आपल्या शेतात शेततळे घेऊन पाण्याचा साठा केला. या योजनेचा फायदा राज्यातील हजारो शेतकऱ्यांना होत असल्याचे चित्र पाहायला मिळतं.

राजस्थान सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवण्याचा निर्णय घेतला असून, यामध्ये शेततळे ही योजना देखील मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे. विशेष म्हणजे, 90 हजार रुपये अनुदानावरून राजस्थान सरकारने शेतकऱ्यांना एक लाख दहा हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नाही, तर शेतकऱ्यांना तब्बल २००० युनिट वीज मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अशोक गहलोत सरकारने नुकताच अर्थसंकल्पीय अधिवेशनात बजेट सादर केले. यामध्ये निवडणुकीपूर्वी केलेल्या कामांची पूर्ती करण्याचे काम झाल्याने मोठ्या प्रमाणात कौतुक होताना पाहायला मिळत आहे. नागरिकांना 100 युनिट पर्यंत मोफत वीज, शेतकऱ्यांना 2000 युनिट पर्यंत मोफत वीज, त्याचबरोबर 75 किलोमीटर पर्यंत विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवास, उज्ज्वला योजनेतील महिलांना पाचशे रुपयात गॅस सिलेंडर, मुलींना मोफत इलेक्ट्रिक स्कुटी यासह अनेक योजनांची तरतूद बजेटमध्ये केली आहे.

चिरंजीवी आरोग्य विमा योजनेंतर्गत वैद्यकीय कवच म्हणून, तब्बल 10 लाख रुपयांवरून 25 लाख रुपये प्रत्येक कुटुंबांना दरवर्षी देण्याची घोषणा केली आहे. राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालये बांधली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. EWS कुटुंबांना चिरंजीवी योजनेचा लाभ दिला जाणार आहे. या योजनेंतर्गत अपघात विम्याची रक्कम 5 लाखांवरून 10 लाख करण्यात आली आहे. त्याचबरोबर महिलांना शिलाई मशीनसाठी ५ हजार रुपये राज्य सरकारकडून दिले जाणार आहे.

युवकांच्या कौशल्य विकासासाठी तब्बल 500 कोटी रुपये रुपयांची तरतूद बजेटमध्ये करण्यात आली आहे. RTE अंतर्गत इयत्ता 12वी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याची तरतूद बजेटमध्ये करण्यात आली आहे. एपीजे अब्दुल राजस्थानमध्ये 30 हजार सफाई कामगारांची भरती केली जाणार असल्याची घोषणा अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे. राजस्थानमध्ये या वर्षी डिसेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या या घोषांमुळे पुन्हा एकदा राजस्थानमध्ये काँग्रेस सरकार सत्तेवर येणार असल्याचं बोललं जात आहे.

हे देखील  वाचा Milk farming: पशुखाद्यामध्ये या पदार्थांचा करा समावेश; निरोगी रोग्याबरोबरच गाई म्हशी दूधही देतील दुप्पट..

Physical Relationship Tips: या वयात महिलांची सेक्स करण्याची इच्छा असते सर्वाधिक; जाणून बसेल धक्का..

Marriage Tips: लग्न न करण्याचे गंभीर परिणाम जाणून सरकेल पायाखालची जमीन; समाजाचा दृष्टिकोनही बदलतो..

Sexual Tips: सेक्सपूर्वी या गोष्टी केल्या तरच महिला होतात संतुष्ट; असा मिळावा तिचा प्रतिसाद..

IND vs AUS: याला म्हणतात कॅप्टन; आपला त्याग करत रोहितने पुजाराची विकेट वाचवली, पाहा हृदयस्पर्शी व्हिडिओ..

TCS Recruitment: TCS मध्ये पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्ण संधी, मिळणार लाखोचं पॅकेज..

ATM card: आता एटीएम कार्डद्वारे मिळणार तब्बल ५ लाख रुपयांपर्यंतचा लाभ; असा घ्या लाभ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.