ATM card: आता एटीएम कार्डद्वारे मिळणार तब्बल ५ लाख रुपयांपर्यंतचा लाभ; असा घ्या लाभ..

0

ATM card: आपण बॅंकेत खाते उघडल्यानंतर बँक आपल्याला एटीएम कार्ड प्रदान करते. त्यानंतर पुढचे सर्वाधिक व्य़वहार आपण या एटीएम कार्डद्वारेच करत असतो. कॅश काढणे, कॅश जमा करणे, तसेच ऑनलाईन व्यवहारासाठी आपण एटीएम कार्डचा वापर करतो. परंतू तुम्हाला माहिती आहे का? देवान घेवाणच्या व्यवहारासोबतच हे एटीएम कार्ड आपल्यासाठी नफा देखील मिळवून देऊ देते. एटीएम कार्ड आपल्याला पाच लाख रुपयांपर्यंतची मदत करू शकते, ते कसे ते घ्या जाणून सविस्तर.Cardless Withdrawal: आता Card शिवाय ATM मधून UPI द्वारे काढता येणार पैसे; जाणून घ्या प्रोसेस..

कोणत्याही बँकेत खाते उघडल्यानंतर, बॅंक आपल्याला एटीएम कार्डवर 25 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंतचे इन्शुरन्स देखील देत असते. मात्र अनेकांना याची माहितीच नसल्याने कित्येकांना त्याचा फायदा घेता येत नाही. मात्र आज आम्ही तुम्हाला एटीएम कार्डवर मिळणा-या विम्याबद्दल सांगणार आहोत. जाणून घेऊया एटीएम कार्डवर विमा कसा मिळवता येतो?

एटीएम कार्ड हे कोणत्याही राष्ट्रीयीकृत बॅंकेचे किंवा गैर-राष्ट्रीयीकृत बँकेचे असायला हवे. एटीएम कार्ड बॅंकेतून मिळाल्यानंतर आपण त्याचा किती वेळा वापर केला आहे, हे महत्वाचे आहे. ज्यांनी एटीएम कार्डचा उपयोग फक्त ४५ दिवस केला असेल, त्यांनाच या सेवेचा लाभ घेता येतो. याव्यतिरिक्त आपले एटीएम कार्ड कोणत्या कॅटेगिरीतील आहे हे देखील महत्वाचे ठरते.

कोणत्या कार्डवर किती नफा 

आपल्या एटीएम कार्डच्या कॅटेगरीनुसार या विम्याची रक्कम ठरवली गेली आहे. ती खालीलप्रमाणे आहे. क्लासिक कार्ड – एक लाख रुपये मास्टर कार्ड  – पन्नास हजार रुपयेप्लॅटिनम कार्ड – दोन लाख रुपयेप्लॅटिनम मास्टर कार्ड –  पाच लाख रुपये व्हिसा कार्ड – दीड लाख ते दोन लाख रुपयेतर, प्रधानमंत्री जन धन खात्यांवर उपलब्ध असलेल्या RuPay कार्डवर ग्राहकांना एक ते दोन लाख रुपयांचे इन्शुरन्स कव्हर दिले जाते. अशाप्रकारे कार्डच्या कॅटेगरीनुसार हा विमा दिला जातो.

त्याचप्रमाणए आपल्या एटीएम कार्डवर आपल्याला अपघाती विमा सुद्धा मिळतो. एखाद्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला 5 लाख रुपयांपर्यंतच विमा मिळू शकतो. आपण याविषयी देखील सविस्तर जाणून घेऊ. एटीएम कार्डवर उपलब्ध असलेल्या विम्याचा दावा करण्यासाठी, कार्डधारकाच्या नॉमिनीला संबंधित बँकेकडे अर्ज करावा लागतो. बँकेत एफआयआरची प्रत, हॉस्पिटलमधील उपचाराचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे त्याला सादर करावी लागते. त्यानंतर विमा दावा प्राप्त होतो. एटीएम कार्डधारकाचा मृत्यू झाल्यास जे नॉमिनी असतील, त्यांना त्या बॅंकेत इन्शुरन्ससाठी अर्ज करावा लागतो.

त्यानंतर त्या व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र, एफआयआर प्रत, आश्रित प्रमाणपत्र, मृत व्यक्तीच्या प्रमाणपत्राची मूळ प्रत इत्यादी सादर करणे आवश्यक असते. याव्यतिरिक्त एटीएम कार्ड जर ४५ दिवस वापरले असतील, आणि त्या दरम्यान कार्डधारकाचा मृत्यू झाला तर मृत व्यक्तीवर अवलंबून असणा-या व्यक्तीला पूर्ण क्लेम मिळू शकतो, यासाठी तो अधिकृत क्लेम करू शकतो.

हे देखील वाचा Physical Relationship Tips: या वयात महिलांची सेक्स करण्याची इच्छा असते सर्वाधिक; जाणून बसेल धक्का..

Sexual Tips: सेक्सपूर्वी या गोष्टी केल्या तरच महिला होतात संतुष्ट; असा मिळावा तिचा प्रतिसाद..

Marriage Tips: लग्न न करण्याचे गंभीर परिणाम जाणून सरकेल पायाखालची जमीन; समाजाचा दृष्टिकोनही बदलतो..

IDBI Bank Recruitment 2023: IDBI बॅंकेत या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्ण संधी; जाणून घ्या डिटेल्स..

Cardless Withdrawal: आता Card शिवाय ATM मधून UPI द्वारे काढता येणार पैसे; जाणून घ्या प्रोसेस..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.