IDBI Bank Recruitment 2023: IDBI बॅंकेत या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्ण संधी; जाणून घ्या डिटेल्स..

0

IDBI Bank Recruitment 2023: अनेकांना सरकारी नोकरी करायची असते. सरकारी नोकरी ही सुरक्षित नोकरी मानले जाते. साहजिकच यामुळे अनेकांचा कल सरकारी नोकरीकडे असतो. यासाठी लाखो तरूण तरूणी दिवस रात्र मेहनत देखील घेत असतात. कोरोना काळात सर्वच गोष्टी अडचणीत आल्या होत्या. तेव्हा सर्वच विभागातील नोकर भरतीही अर्थात बंद होती. मात्र आता कोरोनानंतर विविध ठिकाणी नोकर भरती सुरू केली आहे.

त्यामुळे सरकारी नोकरीच्या शोधात असणार्यांसाठी आणि बॅंकेत नोकरी करू इच्छिणा-यांसाठी ही सुवर्ण संधी आहे. आयडीबीआय बॅंकेत तब्बल ११४ पदे भरली जाणार आहेत. विविध पदांसाठी ही भरती असून, या संदर्भातील अधिसूचना देखील जारी करण्यात आलेली आहे.

पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन नोंदणी अद्याप सुरू झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार ऑनलाईन भरती ही 21 फेब्रुवारी 2023 पासून नोंदणी सुरू होणार असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 मार्च 2023 ठेवण्यात आली आहे. एकूण 144 जागांसाठी ही भरती होणार आहे. रिक्त पदानुसार शैक्षणिक पात्रता काय ठेवण्यात आली आहे, जाणून घेऊया सविस्तर.

मॅनेजर या पदासाठी एकूण 75 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता जाणून घ्यायची झाल्यास, BCA/ B.Sc (IT)/ B.Tech/B.E. M.Tech/ M.E IT इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स त्याचबरोबर सॉफ्टवेअर, इलेक्ट्रॉनिक्स & इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर सायन्स, डिजिटल बँकिंग, फायनान्स मार्केटिंग, डिजिटल बँकिंग, किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + M.Sc. सांख्यिकी / डेटा सायन्स किंवा MCA/M.Sc (IT) या पदवी पैकी उमेदवारांची एक पदवी पूर्ण असणे आवश्यक आहे. सोबतच 04 वर्षाचा अनुभव देखील असणे आवश्यक आहे.

असिस्टंट जनरल मॅनेजर या पदासाठी भरण्यात येणाऱ्या 29 रिक्त जागांसाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता ही BCA/ B.Sc (IT) त्याच बरोबर B.Tech, B.E. M.Tech तसेच M.E, इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स सोबतच सॉफ्टवेअर, इलेक्ट्रॉनिक्स & इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स, डिजिटल बँकिंग आणि MBA फायनान्स, मार्केटिंग, डिजिटल बँकिंग इत्यादी एक पदवी किंवा कोणत्याही शाखेतील M.Sc, MCA, M.Sc इत्यादी शाखेतील पदवी आवश्यक आहे. सोबतच सात वर्षाचा अनुभव देखील आवश्यक आहे.

वयोमर्यादा

उमेदवारांचे वय हे पदानुसार ठेवण्यात आले आहे. असिस्टंट जनरल मॅनेजर या पदासाठी 28ते 40 ठेवण्यात आले आहे. मॅनेजर या पदासाठी 25 ते 35 वय निश्चित करण्यात आले आहे. या वयामध्ये सरकारी नियमानुसार सूट दिली जाणार आहे. एस सी/एसटी उमेदवारांसाठी पाच तर ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्ष अतिरिक्त सूट दिली जाईल. ओपन नाही ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 1000 परीक्षा फीया करले जाईल तर एससी एसटी उमेदवारांसाठी दोनशे रुपये परीक्षा फी द्यावी लागणार आहे.

पगार आणि ऑनलाईन अर्ज

मॅनेजर पदासाठी 48170 पासून 69810 पर्यंत पगार दिला जाणार आहे. असिस्टंट जनरल मॅनेजर या पदासाठी 63 हजार 840 ते 73 हजार 790 इतका पगार दिला जाणार आहे. इच्छुक आणि पात्र असणारे उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन https://www.idbibank.in/index.aspx असं सर्च करायचं आहे. त्यानंतर तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर सविस्तर अर्ज करू शकता.

हे देखील वाचा Relationship tips: पुरुषांमध्ये या प्रकारची देहबोली असेल, तर स्त्रिया होतात आकर्षित..

Benefits of morning sex: सकाळी सेक्स करण्याचे हे फायदे जाणून बसेल धक्का; महिलांसाठी प्रचंड फायदेशीर..

Second Hand Bike: सेकंड हॅण्ड Hero HF Deluxe मिळतेय फक्त 20 हजारामध्ये; जाणून घ्या याविषयी सविस्तर.

Sara Tendulkar: शुभमन गिल नाही, हा आहे सारा तेंडुलकरचा बॉयफ्रेंड; नाव जाणून व्हाल चकित..

Mahashivratri 2023: ..म्हणून महादेवाचे बेलपत्रावर आहे विशेष प्रेम; शिवलिंगावर बेलपत्र वाहण्याचे महत्व जाणून व्हाल चकित..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.