TCS Recruitment: TCS मध्ये पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्ण संधी, मिळणार लाखोचं पॅकेज..

0

TCS Recruitment: टाटा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये (Tata consultancy services) नोकरी मिळवण्याचे अनेकांचे स्वप्न असते. तुम्ही देखील टीसीएसमध्ये नोकरी मिळवण्यासाठी धडपडत असाल, तर तुमच्याकडे यापेक्षा दुसरी मोठी संधी नसेल. टीसीएस या आयटी कंपनीत विविध जागांसाठी मोठी भरती होणार आहे. डेटा इंजिनीअर्स, डेटा आर्किटेक्ट आणि डेव्हलपमेंट अँड ऑपरेशन्स (डेव्हऑप्स) आर्किटेक्ट्स ही पदे टीसीएसमध्ये भरण्यात येणार आहेत. जाणून घेऊया या भरती प्रक्रिया संदर्भातील सविस्तर माहिती.

‘डेटा आर्किटेकेस्ट’ या या पदावर काम करण्यासाठी तुमच्याजवळ या कामाचा अनुभव किंवा तसे कौशल्य असणे आवश्यक आहे. सविस्तरपणे सांगायचे झाल्यास, स्पार्क, एचडीएफएस, पिग, हाइव्ह, स्टॉर्म, एचबेस, टेराडेटा, टॅब्लू, गुगल बिग क्वेरी, टेडाप्रोक, लॉकर, एआय प्लॅटफॉर्म, ऑटोएमएलसारख्या हडूप (Hadoop) आणि बिग डेटा टेक्नॉलॉजीचा वापर तुम्हाला उत्तम प्रकारे करता येणे आवश्यक आहे.

डेटाफ्लो, क्लाउड कंपोझर, क्लाउड डेटा फ्युजन, क्लाउड पब/सब, डेटा कॅटलॉग, डेटा स्टुडिओ, क्लाउड आएएम, क्लाउड रन, गुगल क्युबरनेट्स इंजिन, गुगल कॉम्प्युट इंजिन, क्लाउड स्टोरेज, क्लाउड आयएएम ा गुगल सर्व्हिसेस आहेत. यासारख्य़ा गुगल सर्व्हिसेसमध्ये काम करण्यात तुमचा हातखंड हवा. ‘डेटा इंजिनिअर या पदासाठी कोणते कौशल्य हवे हे हे देखील जाणून घेऊ.

तुमच्याकडे डेटा इंजिनिअर पदावर काम करण्यासाठी क्लाउड बिगक्वेरी, क्लाउड डेटाफ्लो, पब-सब, क्लाउड बिग टेबल आणि एआय/एमवन सोल्युशन्स वापरून गुगल क्लाउड प्लॅटफॉर्मवर (जीसीपी) डेटा इंडिनीअरिंग सोल्युशन शोधणे यामध्ये उमेदवार पारंगत असायला हवा असं कंपनीचे म्हणणे आहे.

तसेच, इच्छुक उमेदवारांना जीसीपीचा देखील चांगला अनुभव असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे  पायथॉन/जावा, पेस्पार्क/ स्पार्क जावा सारख्या या कॉम्प्युटर लँग्वेजवर उमेदवारांचे चांगले प्रभुत्व हवे. उमेदवारांना जीसीपी पब-सबचं ज्ञान देखील आवश्यक असल्याचं कंपनीने स्पष्ट केले आहे.

डेव्हलपमेंट अँड ऑपरेशन्स या पदासाठी लागणारे कौशल्य जाणून घ्यायचे झाल्यास, उमेदवार डेव्हलपमेंट प्रोसेस आणि ऑपरेशन्सचा उत्तम प्रकारे हाताळण्यामध्ये नावीन्यपूर्ण असायला हवा. सोबतच उमेदवारांमध्ये नेतृत्वगुण देखील आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. आपल्या टीममधील सदस्यांना उत्तम प्रकारे मार्गदर्शन करण्याची जबाबदारी देण्यात येणार असल्याने याचे कौशल्य उमेदवाराकडे लिडरशिप क्वालिटी म्हणून असायला हवे. या भरती प्रक्रिया संदर्भात लवकरच घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

हे देखील वाचा IPPB Recruitment 2023: इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये मोठी भरती; या उमेदवारांना नोकरीची सुवर्ण संधी..

IDBI Bank Recruitment 2023: IDBI बॅंकेत या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्ण संधी; जाणून घ्या डिटेल्स..

ATM card: आता एटीएम कार्डद्वारे मिळणार तब्बल ५ लाख रुपयांपर्यंतचा लाभ; असा घ्या लाभ..

Physical Relationship Tips: या वयात महिलांची सेक्स करण्याची इच्छा असते सर्वाधिक; जाणून बसेल धक्का..

Sexual Tips: सेक्सपूर्वी या गोष्टी केल्या तरच महिला होतात संतुष्ट; असा मिळावा तिचा प्रतिसाद..

Marriage Tips: लग्न न करण्याचे गंभीर परिणाम जाणून सरकेल पायाखालची जमीन; समाजाचा दृष्टिकोनही बदलतो..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.