Chanakya Niti: वैवाहिक जीवनात ‘या’ चुका केल्या तर कोणीही वाचवू शकणार नाही तुमचं नातं..

0

Chanakya Niti: आचार्य चाणक्य (aacharya Chanakya) हे अतिशय बुद्धिमान व्यक्ती होते. आजही अनेक लोक त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालतात. चाणक्यांनी सांगितलेल्या गोष्टी जगप्रसिद्ध आहेत. अनेक लोक आपल्या रोजच्या जीवनात चाणक्यांनी सांगितलेल्या गोष्टींचा अवलंब करतात. आपले वैवाहिक आनंदी जीवन जर चांगले घालवायचे असेल, तर आपण आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या गोष्टींचा अवलंब केला पाहिजे. वैवाहिक जीवनात जर काही चुका झाल्या तर आपले जीवन उध्वस्त होऊ शकते. चाणक्यांनी सांगितल्यानुसार, अशा कोणत्या गोष्टी आहेत? ज्याची काळजी घेतली नाही तर तुमचं वैवाहिक आयुष्य उध्वस्त होऊ शकतं, जाणून घेऊया सविस्तर.

खर्च: आयुष्यात पैसा जरी सर्वस्व नसेल तरी चांगले आयुष्य जगण्यासाठी पैसा खूप महत्वाचा असतो. त्यामुळे वैवाहिक आयुष्यात पैशाला खूप महत्व असते. त्यासाठी तुम्हाला पैशाचे योग्य नियोजन करणे खूप गरजचे आहे. वैवाहिक जीवनामध्ये पैशाचा इन्कम आणि खर्चाविषयी तुम्ही जोडीदाराला सविस्तरपणे सांगणे आवश्यक आहे. तुम्ही जर तुमच्या जोडीदाराला पैशाबाबत खोटं बोलायला सुरुवात केली, तर तुमचे नाते तुटायला वेळ लागणार नाही. त्यामुळे आपले वैवाहिक आयुष्य जर चांगले घालवायचे असेल, तर पैशांच्या खर्चांबाबत एकमेकांना सांगणे गरजेचे आहे.

आदर: कोणत्याही नात्यात एकमेकांचा आदर सन्मान करणे फार गरजेचे आहे. त्यामुळे आपल्याकडून जोडीदाराचा अपमान होईल, असे वागणे आपण टाळले पाहिजे. कितीही भांडण झाले तरी आपण मर्यादेत राहूनच बोलायला हवे. जेणेकरून आपल्या जोडीदाराला वाईट वाटणार नाही. काहींना राग अनावर झाल्याने ते तोंडाला येईल ते बोलत असतात. पण यामुळे तुमचे नाते संबंध खराब होईल. त्यामुळे या गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्या.

राग: राग ही अशी गोष्ट आहे, जी येताना एकटी येते, मात्र जाताना सगळे चांगले गुण घेऊन जाते. त्यामुळे तुम्हाला कितीही राग आला तरी देखील तुम्ही मर्यादा ओलांडता कामा नये. रागामुळे अनेक चांगली नाती क्षणात संपुष्टात येतात. त्यामुळे वैवाहिक जीवन जगत असताना माणसाने रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. आपण जर रागावर नियंत्रण ठेवले नाही, तर निराशेचा सामान करावा लागतो. त्यामुळे कोणत्याही गोष्टींवर लगेच न चिडता त्यावर शांतनेने मार्ग काढावा. म्हणजे तुमच्या नात्यात दुरावा येणार नाही. चाणक्य म्हणतात, स्वतःची काळजी घ्यायची असेल तर रागावर नियंत्रण ठेवावे.

कोणत्याही नात्यात आपल्या जोडीदारापेक्षा स्वतःला वरचढ समजणे ही चुकीचे असते. आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृती आहे. त्यात पुरुष म्हणेल तीच पूर्व दिशा असते. मात्र आता महिला अनेक क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना पाहायला मिळतात. काही गोष्टीत त्याही परफेक्ट असतात. त्यामुळे त्यांना कमी समजणे चुकीचे ठरेल. वैवाहिक जीवन चांगले जगायचे असेल, तर आपल्या जोडीदाराला कमी समजू नका. प्रत्येक जण सर्वच कामात नाविन्यपूर्ण असू शकत नाही. नात्यात पहिल्यांदा तुम्ही हे समजणं आवश्यक असतं. म्हणजे तुमच्या नात्यात एकमेकांबद्दल आदर, प्रेम कायम राहील.

संवाद: सुखी वैवाहिक जीवन जगायचे असेल, तर आपल्या जोडीदाराशी संवाद साधने खूप गरजेचे आहे. एकमेकांना वेळ देणे गरजेचे आहे. समोरच्याला गृहीत धरणे तुम्ही टाळले पाहिजे. समोरच्याला काही न बोलता समजेलच असे समजू नका. त्या व्यक्तीसोबत संवाद साधा. त्यामुळे एकमेकांसोबत चांगला वेळही जाईल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराला समजून घेता येईल.

हे देखील वाचा Chanakya Niti: लग्नापूर्वी या तीन गोष्टी जाणून घ्या अन्यथा उध्वस्त होईल आयुष्य..

Shivsena: या मुद्द्यांच्या आधारे ठाकरेंना  शिवसेना आणि चिन्ह पुन्हा मिळणार; निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उद्या होणार सुनावणी..

IND vs AUS: याला म्हणतात कॅप्टन; आपला त्याग करत रोहितने पुजाराची विकेट वाचवली, पाहा हृदयस्पर्शी व्हिडिओ.

Healthy Physical Life: सेक्स करण्यापूर्वी आणि नंतर काय करायला हवं जाणून घ्या, अन्यथा होतील गंभीर परिणाम..

Physical relationship tips: लैंगिक सुखात परमोच्च आनंद मिळवण्यासाठी जाणून घ्या महिलांच्या शरीराचे हे हॅपी झोन अवयव..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.