Poco Smartphone: 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्या असणारा हा दमदार स्मार्टफोन मिळतोय केवळ 9 हजारात..

0

Poco Smartphone: सध्या बाजारात अनेक नवीन स्मार्टफोनचा दबदबा आहे. ग्राहकांना ही प्रत्येक वेळी नवीन काहीतरी हवे असते. त्यामुळे अनेक मोठमोठ्या कंपन्या स्वतः ला अपडेट करून ग्राहकांसाठी कमीत कमी किमतीत नवनवीन फीचर्ससह अनेक स्मार्टफोन बाजारात आणत आहेत. ग्राहकांची संख्याही वाढत असून त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. सध्या लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यत सगळ्यांच्याच खिशात स्मार्टफोन असल्याने कंपन्या ग्राहकांना काहीतरी नवीन देण्याच्या प्रयत्नात असतात. याच प्रार्श्वभूमीवर Poco या मोबाईल उत्पादक कंपनीने आपला नवीन स्मार्टफोन लॉंन्च केला आहे.

Poco C55 असे या नवीन स्मार्टफोनचे नाव आहे. नुकताच हा स्मार्ट फोन आपल्या भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्यात आला आहे. या स्मार्ट फोनमध्ये अनेक नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. ६.७१ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले या स्मार्ट फोनला देण्यात आला आहे. या स्मार्ट फोनमध्ये अजून कोणते नवीन फीचर्स आहेत. हा मोबाईल किती रुपयांत मिळेल? याबाबत सविस्तर जाणून घेवू. Poco कंपनीने ग्राहकांना अनेक नवीन फीचर्ससह हा स्मार्ट फोन दिला आहे. Poco C55 या स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना ६.७१ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. त्याचा टच सॅम्पलिंग रेट १२० Hz एवढा आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये octa-core MediaTek Helio G85 12nm हा प्रोसेसर ही उपलब्ध आहे. डिस्प्लेच्या प्रोटेक्शनसाठी या स्मार्ट फोनच्या स्क्रीनवर पांडा ग्लास देण्यात आली आहे.

ग्राफिक्ससाठी Mali-G52 2EEMC2 GPU कंपनीकडून देण्यात आला आहे. Poco C55 या स्मार्ट फोनमध्ये ग्राहकांना ६४ जीबी व १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज देण्यात आले आहे. ४ आणि ६ जीबी रॅम ग्राहकांना मिळणार आहे. तसेच ग्राहक मायक्रोएसडी कार्डद्वारे या फोनचे स्टोरेज अजून १ टीबीपर्यँत वाढवू शकतात. Poco C55 हा स्मार्टफोन Android 12 आधारित MIUI 13 सह उपलब्ध आहे. यामध्ये सेल्फी तसेच व्हिडीओ कॉलिंगसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. सेफ्टी फीचर्समध्ये मागच्या बाजूला फिंगरप्रिंट सेन्सर्स देण्यात आला आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिमची सुविधा आहे. 5,000 mAh ची बॅटरी आणि 10w चा चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. या स्मार्ट फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा ग्राहकांना देण्यात आला आहे.

हा स्मार्टफोन ग्राहक Power Black, Forest Green आणि Cool Blue colour या तीन कलरमध्ये ग्राहकांना मिळणार आहे. ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी व्हेरिएंट असणाऱ्या स्मार्ट फोनची किंमत १०,९९९ रुपये आहे. तर ४ जीबी रॅम व ६४ जीबी व्हेरिएंटची असणाऱ्या स्मार्ट फोनची किंमत ही ९,४९९ रुपये आहे. Poco C55 हा स्मार्टफोन ऑडिओ जॅक तसेच FM रेडिओसह २८ फेब्रुवारीपासून फ्लिपकार्डवर उपलब्ध असणार आहे.

हे देखील वाचा OnePlus: OnePlus चा तगडा स्मार्टफोन मिळतोय केवळ 13,500 रुपयांत; जाणून घ्या डिटेल्स..

Samsung galaxy S22: सॅमसंगची विशेष ऑफर, २७ हजारात खरेदी करा ८६ हजाराचा हा स्मार्टफोन..

Relationship Tips: गोष्टी माहीत असायलाच हव्यात; अन्यथा नातं कधीच फार काळ टिकणार नाही..

Marriage Tips: लग्न न करण्याचे गंभीर परिणाम जाणून सरकेल पायाखालची जमीन; समाजाचा दृष्टिकोनही बदलतो..

Healthy Physical Life: सेक्स करण्यापूर्वी आणि नंतर काय करायला हवं जाणून घ्या, अन्यथा होतील गंभीर परिणाम..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.