Electric bike: ८० रुपयांत ८०० किमी धावते ‘ही’ E-Bike; ड्रायव्हिंग लायसन्सचीही गरज नाही..

0

Electric bike: दिवसेंदिवस इंधनाच्या किमती गगनाला भिडत असल्याचे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. त्यामुळे सरकारसह सामान्य नागरिकांचे लक्ष देखील इलेक्ट्रिक वाहनांकडे केंद्रित झाल्याचे अपल्याला पाहावयास मिळत आहे. कारण इलेकट्रीक वाहनांमुळे ना पेट्रोलची झंझट राहते, ना आर्थिक झळ सोसावी लागते. या सगळ्या बाबींचा विचार करून केंद्र सरकारकडून देखील इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. कारण पारंपरिक इंधनावर अवलंबून असणाऱ्या वाहनांचा वापर कमी करता येईल, आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवता येईल.

दरम्यान जर इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढला तर सरकारवर असलेल्या मोठ्या चिंतेचे ओझे कमी होणार आहे. कारण आपल्या सगळयांना माहित आहे, इंधन हे मर्यादित आहे. लोकसंख्या पाहता हे इंधन काही पुरेसे नाही. त्यामुळे याला पर्यायी मार्ग शोधणे ही काळाची गरज आहे. आणि या बाबीचा विचार करूनच केंद्र सरकार देखील या पारंपरिक ऊर्जा स्रोतावर आधारित गोष्टींवर भर देत आहे. याबाबीचा विचार करूनच अनेक वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी आपले उत्पादने देखील त्यानुसार बनवायला सुरवात केलेली आहे.

अनेक बड्या कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती केली आहे. अशातच आता सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारे, एक उत्पादन मार्केटमध्ये आले आहे. या वाहनासाठी तुम्हाला ना ड्रायव्हिंग लायसन्सची गरज असणार आहे, ना कुठल्या रजिस्ट्रेशनची. यापेक्षाही महत्वाची बाब म्हणजे, हे प्रॉडक्ट आपल्यास आर्थिक दृष्ट्याही परवडणारे आहे. कारण त्याची इतर उपकरणांच्या तुलनेत किंमत देखील खूप कमी आहे. ते प्रोडक्ट म्हणजे ई-बाईक’.

एस्सेल एनर्जीने सामान्यांसाठी दैनंदिन वापरासाठी महत्वाचे असणारे GET 1 हे मॉडेल बाजारमध्ये आणले आहे. हे मॉडेल दैनंदिन वापरासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकणार आहे. यामध्ये तुम्हाला इतर स्कुटर प्रामाणे फुल्ल स्पेस असून, यामध्ये आपल्याला दोन व्हेरियंट देखील मिळणार आहेत. यामध्ये पहिला प्रकार म्हणजे 16Ah बॅटरी पॅक फुल मॉडेल याची मार्केटची प्राईज 43,500 रुपये असून, यातील दुसरा व्हेरियंट 13Ah बॅटरी पॅक उपलब्ध असणारा आहे. याची किंमत 41,500 रुपये निश्चित करण्यात आली आहे. ही स्कुटर एकदा चार्ज केल्यानंतर सुमारे ५० किलोमीटर पर्यंत जाऊ शकते, असा कंपनीकडून दावा करण्यात आलेला आहे.

ही ई-बाईक तुम्हाला दोन वेगवेगळ्या लिथियम बॅटरी पॅकसह उपलब्ध आहे. यातील पहिल्या व्हेरिअंटमध्ये 13Ah क्षमतेची बॅटरी देण्यात आली आली आहे. तर दुसऱ्यामध्ये 16Ah क्षमतेची बॅटरी दिलेली आहे. कंपनीने 39 किलो वजनाच्या GET 1 सायकलमध्ये 250 वॅट्स व 48 व्होल्ट क्षमतेची BLDC रियर हब इलेक्ट्रीक मोटर युज केली आहे. यात एक डिस्प्ले आहे, त्यात बॅटरी रेंजबाबत माहिती दाखवली जाते. या बॅटरीवर कंपनीने 2 वर्षांची वॉरंटी आणि इलेक्ट्रीक कंपोनंट्ससाठी 1 वर्षाची वॉरंटी दिली आहे. छोट्या बॅटरीच्या सायकलला चार्ज करायला 5 तास लागतात. तर मोठ्या बॅटरीच्या चार्जिंगला 6-7 तास लागतात. या स्कुटरमध्ये ड्रायव्हरची सीट उंच ठेवली आहे. आणि मागील सीट कमी आहे. त्याचा तुम्ही कॅरिअर म्हणून वापर करू शकतो. या बाईकवर तुम्ही 1 रुपयामध्ये 10 किमी आणि 80 रुपयामध्ये 800 किमीचा प्रवास करू शकता.

हे देखील वाचा Bajaj electric scooter: बजाज कंपनीची ही इलेक्ट्रिक स्कूटर मिळतेय अवघ्या 15 हजारांत; ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड..

Vastu Tips: तुमच्या घरात हे झाड असेल तर लक्ष्मी येईल धावत; सुख समाधानही राहील कायम दरवळत..

business idea: शेतकऱ्यांनो या पिकाचे उत्पादन घ्याल तर व्हाल करोडपती..

Pathaan: पठाणने मोडले सगळ्यांचे रेकॉर्ड, बाहुबलीलाही टाकले मागे; जाणून घ्या पठाणची कमाई..

Viral video: बहाद्दराने मगर टाकली खांद्यावर, अन् फिरू लागला रस्त्यावर; पुढे जे घडलं ते पाहून येईल चक्कर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.