Vastu Tips: तुमच्या घरात ‘हे’ झाड असेल तर लक्ष्मी येईल धावत; सुख समाधानही राहील कायम दरवळत..

0

Vastu Tips: आयुष्यात वास्तू शास्राला खूप महत्व आहे. घर, बांधताना, ऑफिस उभे करताना आपण सर्वप्रथम वास्तूशास्त्रानुसार आपल्या घराची ऑफिसची रचना करून घेतो. व्यक्ती कितीही श्रीमंत असो, माणसाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी येतच असतात. कधी-कधी त्यांना त्यातून बाहेर पडणे अवघड होऊन जाते. अशावेळी अनेक जण वास्तुशास्त्राची मदत घेण्याचा सल्ला देत असतात. जर तुम्हाला देखील आयुष्यात येणारे अडचणी पासून दूर राहायचं असेल? पैशाच्या समस्येपासून लांब राहायचं असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. (Plant Tips For Money)

वास्तुशास्त्राच्या म्हणण्यानुसार, घराच्या प्रत्येक कोपऱ्याला आणि घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूला महत्त्व आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी हवी असेल, तर या गोष्टीला महत्व देणे तितकेच गरजेचे आहे. वास्तुशास्त्र हे तुमच्या विपुलतेची आणि सौभाग्याची गुरुकिल्ली असू असते. घरामध्ये असणाऱ्या प्रत्येक वस्तूपासून तुम्हाला समृद्धी, आनंद आणि समृष्टपणा मिळत असतो.

आपण आपल्या घरात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीत एक ऊर्जा समाविष्ट असते. पण आपण काही चुका केल्या, तर घरात वास्तुदोष येतो. याचा आपल्या जीवनावर नकारात्मक परिणाम दिसून येतो. त्यामुळे आपल्याला सुख शांती तर लाभतच नाही. पण घरात अनेक आर्थिक समस्या निर्माण होतात. त्यामुळे आपण जर वास्तुचा उपाय केला, तर घरात सुख शांती लाभते. आणि पैसाही टिकतो. त्यामुळे आपण नेमही सकारात्मक राहतो. आपण घरात काही झाडे लावली तर घरात वास्तुदोष राहत नाही. आणि सुख, शांती समृद्धी पैसा हा आपल्या घरात कायम टिकून रहातो. तुमच्या घरात पैसे येत नसेल, किंवा टिकत नसेल तर तुम्ही लागलीच घरामध्ये क्रॅसुला (Pigmyweeds) झाड लावणं आवश्यक आहे.

घरात सुख शांती येण्यासाठी तुम्ही क्रॅसुला नावाचे झाड लावल्यास घरातील अनेक समस्या नाहीशा होऊ शकतात. तुम्ही अनेकदा कुठे बाहेर गेला, तर अनेक लोकांच्या घरात मनी प्लांट लावण्याचे पाहायला मिळते. खरं तर आपल्या लक्षात येत नाही, पण घरात पैसा टिकावा, वाद होऊ नयेत, घर आनंदी राहावे. केवळ म्हणूनच हे झाड लावण्याचे काम केले जाते. तुम्ही जर तुमच्या घरात क्रॅसुला नावाचे झाड लावले, तर ते ‘मनी प्लांट’ पेक्षाही जास्त प्रभावी असते, असे म्हंटले जाते. पाहूया या झाडाचे नेमके काय फायदे आहेत?

क्रॅसुला वनस्पती ही घरात लावणे अत्यंत शुभ मानले जाते. तुमच्या घरात जर पैसा येत नसेल, तर तुम्ही घरात हे झाड लावू शकता. यामुळे तुमच्या घरातील आर्थिक समस्या दूर होतील. तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये देखील हे झाड लावू शकता. यामुळे घरात आणि ऑफिसमध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तुमच्याकडे पैसा येत असेल, पण तो टिकून राहत नसेल, तरीदेखील हे झाड प्रभावी ठरते. तुम्ही घरात आणि ऑफिसमध्ये हे झाड जरूर लावा. हे झाड जर घरात असेल, तर तुम्हाला संपत्तीचे अनेक मार्ग खुले होतील.

क्रॅसुला वनस्पतीचे फायदे: या वनस्पतीचे अनेक फायदे आहेत. ही वनस्पती आपल्या घरात लावली, तर घरात सकारात्मक ऊर्जा संचारते. घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. तुमच्या घरात जर काही आर्थिक समस्या असतील, तर त्या नष्ट होतात. तुम्ही नोकरी करत असाल, तर हे झाड तुमच्या घरात असणे महत्वाचे आहे. कारण या झाडामुळे तुमचे प्रमोशन लवकर होईल. आर्थिक समस्या, सुख, शांती नोकरीत यश या सगळ्या गोष्टी हव्या असतील, तर आपल्या घरात क्रॅसुला वनस्पती लावा. मात्र हे झाड लावताना काही काळजी देखील घेणे आवश्यक आहे. वास्तुशास्त्रानुसार प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला क्रॅसुला झाड लावा. ऑफिसमध्ये ठेवायचे असेल, तर डेस्कवर ठेवू शकता. क्रॅसुला झाड लावणे खूप शुभ मानले जाते.

हे देखील वाचा Vastu Tips: घरामध्ये चुकूनही या 3 वस्तू आणू नका, अन्यथा रस्त्यावर याल..

Sexual Relationship Tips: तुमच्यामध्ये या गोष्टी होत नसतील तर समजून जा तुमचे लैंगिक आयुष्य आहे खूपच खराब..

business idea: शेतकऱ्यांनो या पिकाचे उत्पादन घ्याल तर व्हाल करोडपती..

Bajaj electric scooter: बजाज कंपनीची ही इलेक्ट्रिक स्कूटर मिळतेय अवघ्या 15 हजारांत; ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड..

 पठाणने मोडले सगळ्यांचे रेकॉर्ड, ‘बाहुबली’लाही टाकले मागे; जाणून घ्या पठाणची कमाई..

Viral video: बहाद्दराने मगर टाकली खांद्यावर, अन् फिरू लागला रस्त्यावर; पुढे जे घडलं ते पाहून येईल चक्कर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.