business idea: शेतकऱ्यांनो ‘या’ पिकाचे उत्पादन घ्याल तर व्हाल करोडपती..

0

business idea: भारत हा कृषिप्रधान देश आहे. आपल्या देशात अनेक पिकांचे उत्पादन घेतले जाते. देशाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पिकांचे उत्पादन घेतले जाते. कोणत्याही नवीन पिकाचे उत्पादन घ्यायचे असेल तर त्यासाठी वातावरण देखील तेवढेच पोषक असावे लागते. तेव्हाच आपण त्या पिकाचे उत्पादन घेऊ शकतो. सध्या शेतीसाठी लागणाऱ्या खतांचे भाव वाढल्याने तसेच खराब हवामान आणि कमी होत चाललेला बाजारभाव यामुळे शेतकऱ्याला शेती करणे खूप अवघड झाले आहे. त्यामुळे शेतकरी कमी क्षेत्र, कमी पाणी आणि कमी खर्च यात आपल्याला काय पिकवता येईल. हा विचार करत असतो.

अनेक शेतकरी शेतात काहीतरी वेगळे उत्पादन घेऊन श्रीमंत झालेले आपण पाहत असतो. त्यांनी आपल्या भागात न पिकणारे काहीतरी नवीन उत्पादन घेतलेले असते. तर काही शेतकरी हे आपल्याच भागातील एखादे पीक पिकवतात, पण ते आधुनिक पद्धतीने पिकवतात. त्यामुळे त्यांनाही आपल्या खर्चाच्या दुप्पट उत्पन्न मिळत असल्याची देखील अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत. त्यामुळे स्मार्ट शेती कशी करायची? त्याचबरोबर खर्चाच्या तब्बल ७ पट उत्पन्न देणारे असं कोणतं पीक आहे? जाऊन घेऊया सविस्तर..

सरकार शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सतत प्रयत्न करत असते. तसेच त्या पिकांच्या लागवडीस प्रोत्साहनपर अनुदान देखील दिले जाते. जेणेकरुन शेतकरी आपले उत्पन्न वाढवू शकेल. औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या अश्वगंधाची लागवड करून शेतकरी आजच्या काळात मोठ्या प्रमाणात पैसे कमवत आहेत. खर्चापेक्षा कित्येक पटीने अधिक कमाई मिळवून देणारे हे पीक आहे. अश्वगंधा असं या पिकाचं नाव आहे.

या पिकाची लागवड प्रामुख्याने बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यात केली जाते. याची फळे, बिया आणि सालीपासून अनेक औषध तयार होतात. हे या भागातील एक नगदी पीक म्हणून ओळखले जाते. भारतात अश्वगंध राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, हरियाणा, गुजरात या भागात उत्पादित केले जाते. अश्वगंधाचा औषधी वनस्पती म्हणून उपयोग केला जातो. त्याच्या मुळाचा घोड्यासारखा वास येतो.

अश्वगंधा ही झुडूप असलेली वनस्पती आहे. याच्या उत्पादनातून आपण खर्चापेक्षा अनेक पट नफा मिळवू शकतो. अश्वगंधाची लागवड साधारण सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात करावी लागते. यासाठी कोरडे हवामान आणि ओलसर माती लागते. पाऊस पडल्यावर हे पीक घेतले जाते. पेरणीसाठी हेक्टरी 10-12 किलो अश्वगंधाचे बियाणे लागते. यासाठी सेंद्रिय खताचा वापर केला जातो. पेरणी झाल्यावर ८ दिवसांनंतर हे उगवून येते. मातीचे पीएच मूल्य 7.5 ते 8 दरम्यान असेल, तर त्या जमिनीत याचे चांगले उत्पादन निघते. अश्वगंधा लागवडीसाठी वालुकामय चिकणमाती आणि लाल माती चांगली मानली जाते.

500 ​​ते 750 मिमी पाऊस आणि 20-35 अंश तापमान या रोपांच्या वाढीसाठी आवश्यक आहे. या पिकाची कापणी जानेवारी ते मार्च या महिन्यात केली जाते. तुम्ही अश्वगंधा हे पीक घेऊन गहू, मका आणि भाताच्या 50 टक्क्यांपर्यंत अधिक नफा मिळवू शकता. अश्वगंधाचे अनेक उपयोग आहेत. त्यामुळे तिची मागणी कधीही जास्त राहते. भारतात अश्वगंधाचे उत्पादन 1600 टन आहे. आणि मागणी वार्षिक 7000 टन आहे. तणाव आणि चिंता दूर करण्यासाठी अश्वगंधा फायद्याची मानली जाते. विशेष म्हणजे या पिकासाठी लागणाऱ्या खर्चाच्या ७ पट अधिक उत्पादन मिळत असल्याने शेतकरी या पिकाची शेती करून खूप कमी काळात मालामाल होऊ शकतात.

 हे देखील वाचा Business Idea: कमी भांडवलात महिन्याला लाखों रुपये नफा मिळवून देतील हे चार व्यवसाय..

Milk farming: पशुखाद्यामध्ये या पदार्थांचा करा समावेश; निरोगी रोग्याबरोबरच गाई म्हशी दूधही देतील दुप्पट..

Pathaan: तो सीन सुरू होताच चाहते स्क्रीन समोर बेभान होऊन नाचू लागले; पाहा व्हिडिओ..

पठाणने मोडले सगळ्यांचे रेकॉर्ड, ‘बाहुबली’लाही टाकले मागे; जाणून घ्या पठाणची कमाई..

Bajaj electric scooter: बजाज कंपनीची ही इलेक्ट्रिक स्कूटर मिळतेय अवघ्या 15 हजारांत; ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड..

Viral video: बहाद्दराने मगर टाकली खांद्यावर, अन् फिरू लागला रस्त्यावर; पुढे जे घडलं ते पाहून येईल चक्कर..

couple romance viral video: कपलचा बाईकवर जबरदस्त रोमान्सचा व्हिडिओ तुफान व्हायरल; पोरीचं कृत्य पाहून धराल डोकं..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.