Delhi Capitals: IPL 2023 मध्ये Delhi capitals विजेता पदाची प्रमुख दावेदार; जाणून घ्या जमेच्या बाजू आणि प्लेइंग इलेव्हन..

0

Delhi Capitals: भारताचा स्टार फलंदाज आणि दिल्ली कॅपिटल संघाचा कर्णधार (Delhi capitals captain) ऋषभ पंतचा (Rishabh Pant) अपघात झाल्याने, आयपीएलच्या (ipl 2023) या हंगामात दिल्लीचा संघ कशी कामगिरी करतो, याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. खासकरून दिल्ली कॅपिटल संघाचे चाहते आपल्या संघाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, या हंगामात देखील चाहत्यांना दिल्ली कॅपिटल संघाच्या टॉप ऑर्डरकडून फायर पॉवर पाहायला मिळू शकते. एक नजर टाकूया दिल्ली कॅपिटल संघाच्या प्लेइंग इलेव्हन आणि संपूर्ण स्कॉडवर. (Delhi Capitals team strongest possible XI for IPL season 2023)

गेल्या काही हंगामापासून दिल्ली कॅपिटल संघ कमालीचा लोकप्रिय राहिला आहे. तसं पाहायला गेले तर आयपीएलच्या सुरुवातीपासूनच दिल्ली कॅपिटल संघामध्ये अनेक दर्जेदार आणि महान खेळाडूंनी प्रतिनिधित्व केलं आहे. साहजिकच यामुळे हा संघ पहिल्यापासूनच चर्चेत राहिला आहे. सुरुवातीला वीरेंद्र सेहवागच्या नेतृत्वात दिल्ली संघाने ठीक कामगिरी केली. मात्र अद्याप दिल्ली कॅपिटल संघाला आयपीएल ट्रॉफी (ipl trophy) जिंकता आलेली नाही. मात्र तरीदेखील दिल्ली कॅपिटल हा संघ प्रत्येक सीजनमध्ये विजेतेपदाचा प्रमुख दावेदार असतो.

गेल्या काही सीझनमध्ये ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली संघाने कमालीचा परफॉर्मन्स दाखवला आहे. मात्र ऋषभ पंत या हंगामात अपघातामुळे खेळू शकणार नाही. ऋषभ पंच्या जागेवर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नर (David Warner) दिल्ली कॅपिटल संघाचे नेतृत्व करणार आहे. (Delhi capitals captain David Warner) वॉर्नरच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबाद संघाने (sunrisers Hyderabad) 2016 ला आयपीएलची ट्रॉफी जिंकण्यात यश मिळवलं होतं. आता पुन्हा एकदा आपल्या नेतृत्वाचा करिष्मा दाखवण्याची संधी डेविड वॉर्नरकडे असणार आहे.

सुरुवातीपासूनच या संघाची फलंदाजी ही जमिनीची बाजू राहिली आहे. सध्या आयपीएल 2023 च्या हंगामात दिल्ली संघाकडे डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ (David Warner and Prithvi Shaw Delhi capitals opener) या दोन सलामवीरांच्या रूपात जबरदस्त फायर पॉवर आहे. आयपीएल 2023 च्या हंगामा इतर संघाच्या तुलनेत दिल्ली संघाकडे ही सर्वात आक्रमक जोडी आहे. आयपीएल 2023 सीझनमध्ये दहा संघाची तुलना करायची झाली तर या हंगामात दिल्ली कॅपिटल हा सगळ्यात समतोल, तुल्यबळ आणि फायर पॉवरने भरलेला संघ दिसतो. एक नजर टाकूया, प्लेइंग इलेव्हन आणि खेळाडूंच्या कामगिरीवर.

डेव्हिड वॉर्नर

ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत दिली कॅपिटल संघाला डेविड वॉर्नरच्या रूपात एक अनुभवी कर्णधार मिळाला आहे. डेव्हिड वॉर्नर सध्या फॉर्ममध्ये नसला तरी देखील तो केव्हाही फॉर्ममध्ये येऊ शकतो. एका वर्षानंतर क्रिकेट पासून दूर राहून देखील त्याने ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने पुनरागमन केले, हे पाहता आयपीएलमध्ये देखील तो आपल्या नावाचे वादळ निर्माण करण्याच्या दाट शक्यता आहे. सोबतच रिकी पॉंटिंग कोचच्या रूपात असल्याने, दोघांच्या विचारात एकमत होण्यास मदत होणार आहे.

फायर पॉवरने खचून भरलेला संघ

इतर संघाच्या तुलनेत दिल्ली कॅपिटल संघाकडे या हंगामात फायर पॉवरची मोठी फळी असल्याचं जाणवतं. सलामीवीर म्हणून डेव्हिड, पृथ्वी शॉ (David Warner Prithvi Shaw) ही तगडी फायर पावर असणारी सलामी जोडी आहे. नुकत्याच पार पडलेल्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय गोलंदाजाची धुलाई करणारा मिचेल मार्श (Mitchell Marsh) तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येणार आहे. विकेटकीपर म्हणून घरेलू क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा ओढणाऱ्या सरफराज खानला (Sarfaraz Khan) संधी मिळू शकते. मनीष पांडे हा देखील त्याला एक बॅकअप विकेटकीपर असणार आहे.

पाचव्या क्रमांकासाठी फलंदाजीसाठी वेस्टइंडीज संघाचा टी-ट्वेंटी संघाचा कर्णधार रोवमन पॉवेल (Rovman Powell) असणार आहे. नुकत्याच साऊथ आफ्रिका संघाविरुद्ध (WI vs SA) पार पडलेल्या टी-ट्वेंटी मालिकेत आपल्या फलंदाजीचा जलवा पॉवेलने दाखवला आहे. त्याला बॅकअप म्हणून राईली रुसो, फिल सॉल्ट सारखे फायर पॉवर फलंदाज आहेत. सोबतच आयपीएलच्या इम्पॅक्ट प्लेयर या नव्या नियमानुसार, दिल्ली कॅपिटल संघाकडे इम्पॅक्ट प्लेयरचा महत्त्वपूर्ण वापर करण्याची सुवर्णसंधी आहे. कारण त्यांच्या स्क्वाडमध्ये एकाहून एक फायर पॉवर फलंदाज, गोलंदाज आहेत.

अशी असेल दिल्ली कॅपिटल संघाची प्लेइंग इलेव्हन: डेव्हिड वॉर्नर (कॅप्टन) पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, सरफराज खान (विकेट किपर) (ललित यादव/ मनीष पांडे/यश धुल/) रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अॅनरिक नॉरखिया, खलील अहमद, चेतन साकारिय

दिल्ली कॅपिटल संघाचा संपूर्ण संघ: डेव्हिड वॉर्नर (कॅप्टन) पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, रोवमन पॉवेल, मनीष पांडे, रायली रूसो, सरफराज खान, यश धुल, ललित यादव, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, इशांत शर्मा, कमलेश नागरकोटी, फिल सॉल्ट, खलील अहमद, रिपल पटेल, एनरिक नॉर्टजे, चेतन साकारिया, लुंगी एनगिडी, मुस्तफिजुर रहमान, अमन खान, प्रवीण दुबे, विकी ओस्तवाल.

हे देखील वाचा PAN-Aadhaar Linking: जाणून घ्या PAN-Aadhaar Link आहे की नाही? नसेल तर लगेच जोडा या सोप्या पद्धतीने..

Shikhar Dhawan: ..म्हणून मला करावी लागली होती HIV टेस्ट; शिखर धवनच्या खुलाशाने खळबळ..

Business Idea: एकदाच गुंतवणूक करून वर्षाला कमवा लाखो रुपये; जाणून घ्या या जबरदस्त व्यवसाय विषयी..

Onion Subsidy: एका क्विंटलसाठी 350 रुपये अनुदान; कांद्याच्या अनुदानासाठी असा करा अर्ज..

Marriage Tips: ..होय लग्नानंतर बदलतं आयुष्य या गोष्टी माहीत असतील तरच संसाराचा गाडा चालेल व्यवस्थित..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.