UPI Payment Charges: Google pay, phone pay वापरकर्त्यांचा झाला सत्यानाश; 1 एप्रिपासून तब्बल इतके रुपये शुल्क आकारला जाणार..

0

UPI Payment Charges: अलीकडच्या काळात यूपीआय पेमेंट (UPI Payment) हा प्रत्येक नागरिकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. सामान्य नागरिक देखील आता जवळ पैसे बाळगत नसल्याची परिस्थिती पाहायला मिळते. अगदी एक रुपयापासून हजारो रुपयांचा व्यवहार तो यूपीआयच्या माध्यमातून करतो. हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या वस्तूंचे पेमेंट यूपीएच्या माध्यमातून करत असल्याने आता सुट्टे पैसे जवळ बाळगण्याची काहीही गरज नव्हती. मात्र आता सर्वसामान्यांना पुन्हा एकदा कॅशने व्यवहार करावा लागणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

होय तुम्ही बरोबर ऐकलं आहे. गूगल प्ले (Google pay) फोन पे (phone pay) तसेच इतर यूपीआय पेमेंटवर तुम्हाला शुल्क लावले जाणार आहे. दोन हजारापेक्षा जास्त रकमेवर तुम्हाला तब्बल 1.1% शुल्क आकारला जाणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. एक एप्रिल पासून हा नियम लागू होणार असल्याचं नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) परिपत्रक काढत स्पष्ट केले आहे. युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) चालवणारी NPCI ही संस्था आहे. याच संस्थेने हा निर्णय घेतला असून, एक एप्रिल पासून आता युपीआयच्या माध्यमातून पेमेंट करणाऱ्या ग्राहकांसमोर चार्ज दिल्याशिवाय कोणताही पर्याय नसणार आहे.

या संदर्भातले परिपत्रक एनपीसीआय म्हणजेच “नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया” या संस्थेने 24 मार्च 2023 रोजी काढले आहे. या परिपत्रकानुसार आता 1 एप्रिल 2023 पासून हा नियम लागू होणार आहे.

कॅशलेस व्यवहार व्हावे यासाठी सरकारने देखील पावले उचलली होती. मात्र आता पुन्हा एकदा कॅशच्या माध्यमातूनच व्यवहार करावा लागणार की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यूपीआय वापरणाऱ्या ग्राहकांना दोन हजारांपेक्षा जास्त पैसे ट्रान्सफर करण्यावर शुल्क आकारला जाणारा असला तरी देखील यूपीआय व्यवहारात आता मर्यादा आल्या आहेत. साहजिकच यामुळे आता UPI ने व्यवहार न करता एकमेकांना थेट कॅशने व्यवहार करताना अनेकजण दिसून येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

किती रकमेवर किती टक्के शुल्क आकारले जाणार?

मीडिया रिपोर्टनुसार, एनपीआयने(नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) जारी केलेल्या पत्रकात या संदर्भात स्पष्ट माहिती देण्यात आली आहे. यामध्ये जर तुम्ही 2000 रूपयांपेक्षा जास्त व्यवहार केला, तर तुम्हाला शुल्क आकारले जाणार आहे. 2000 पेक्षा जास्त पेमेंट जर तुम्ही यूपीएच्या माध्यमातून केला, तर तुम्हाला 1.1 टक्के इतके शुल्क आकारले जाणार आहे.

या लोकांकडून आकारले जाणार शुल्क

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कडून जारी केलेल्या परिपत्रकानुसार, तुम्ही कोणत्या क्षेत्रासाठी पेमेंट ट्रान्सफर करत आहे, यानुसार शुल्क आकारले जाणार आहे. कृषी आणि दूरसंचार या क्षेत्रासाठी कमी शुल्क आकारले जाणार आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कडून जारी केलेल्या परिपत्रकानुसार, हे शुल्क जो व्यापारी व्यवहारांकरिता पेमेंट करणार आहे. अशाच वापरकर्त्यांसाठी हा नियम बनवण्यात आला आहे.

 या वापरकर्त्यांकडून शुल्क आकारले जाणार नाही

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी काढलेल्या परिपत्रकानुसार, बँक खाती आणि PPI वॉलेट,तसेच पीअर-टू-पीअर, पीअर-टू-पीअर-मर्चंट इत्यादी व्यवहारांवरती कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही. हा नवीन नियम 1 एप्रिलपासून लागू केला जाणार आहे. त्यानंतर नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया 30 सप्टेंबर 2023 अगोदर या निर्णयाचे पुनरावलोकन करणार असल्याची माहिती आहे.

हे देखील वाचा PAN-Aadhaar Linking: जाणून घ्या PAN-Aadhaar Link आहे की नाही? नसेल तर लगेच जोडा या सोप्या पद्धतीने..

Delhi Capitals: IPL 2023 मध्ये Delhi capitals विजेता पदाची प्रमुख दावेदार; जाणून घ्या जमेच्या बाजू आणि प्लेइंग इलेव्हन..

Shikhar Dhawan: ..म्हणून मला करावी लागली होती HIV टेस्ट; शिखर धवनच्या खुलाशाने खळबळ..

Photo | Bussiness IAS चा अभ्यास बंद करून हा छोटा व्यवसाय केला सुरु; कमावतात कोट्यवधींचा नफा

Business Idea: एकदाच गुंतवणूक करून वर्षाला कमवा लाखो रुपये; जाणून घ्या या जबरदस्त व्यवसाय विषयी..

Marriage Tips: लग्नापूर्वी मुलीला हे पाच प्रश्न विचारल्याशिवाय चुकूनही करू नका लग्न; नाहीतर आयुष्यभर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.