Marriage Tips: लग्नापूर्वी मुलीला ‘हे’ पाच प्रश्न विचारल्याशिवाय चुकूनही करू नका लग्न; नाहीतर आयुष्यभर..

0

Marriage Tips: लग्न (marriage) हा प्रत्येकाच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा टप्पा असतो. (Marriage is most important phase of life) लग्न केवळ दोन व्यक्तींसाठीच नाही तर दोन्हीं कुटुंबांना एकत्र आणण्याचे काम करतं. लग्नानंतर पती-पत्नी हे नातं अस्तित्वात येतं. पती-पत्नी हे नातं अस्तित्वात येत असलं तरी देखील त्यामध्ये जिव्हाळा, प्रेम, आपुलकी, तडजोड या गोष्टी नसतील, तर या नात्याला काहीही महत्त्व राहत नाही. हे वेगळं सांगण्याची गरज नाही. आयुष्यभरासाठी एकमेकांसोबत राहण्याची बांधिलकी पती-पत्नीच्या (husband wife) नात्यांमध्ये नसेल, तर पती-पत्नी हे नातं किळसवाणं वाटू लागतं. लग्नानंतर जर तुम्हाला देखील पती-पत्नीच्या नात्यात कटूता निर्माण होऊ नये, असं वाटत असेल तर लग्नापूर्वी मुलीला काही प्रश्न विचारणे आवश्यक आहे.

पूर्वीचा काळ आता राहिला नाही. मुली आता स्वतःच्या पायावर उभ्या राहायला शिकल्या आहेत. साहजिकच यामुळे लग्नानंतर देखील त्यांना आपलंही अस्तित्व असावं, असं वाटत असतं. अलीकडे लग्नानंतर पती-पत्नीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाद होत असताना पाहायला मिळते. फक्त वादच नाही, तर प्रकरण घटस्फोटांपर्यंत देखील पोहोचल्याची अनेक उदाहरणे आपल्याला आपल्या आसपास पाहायला मिळतात. मात्र या गोष्टीला सर्वस्वी जबाबदार हे पती-पत्नी दोघेही असतात. लग्नापूर्वी काही गोष्टी क्लिअर केल्या नसल्याने या समस्या निर्माण होतात. आणि म्हणून लग्नापूर्वी काही प्रश्न एकमेकांना विचारणं फार आवश्यक असतं. आज आपण याचविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

हे प्रश्न तुमच्या विचारा

लग्नापूर्वी जेव्हा आपण मुली पाहतो, तेव्हा अनेकदा काही गोष्टी जाणीवपूर्वक लपवल्या जातात. मात्र ही ही खूप मोठी चूक ठरू शकते. लग्नापूर्वी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत जितकं स्पष्ट बोलाल, तितका जास्त फायदा तुम्हाला लग्नानंतरच्या आयुष्यात होत असतो. १) एकत्र कुटुंब हवं की विभक्त? एका सर्वेनुसार, अलीकडे लग्नानंतर मुलींना विभक्त कुटुंबात राहायला आवडत असल्याचं समोर आले आहे. आणि म्हणून, लग्नापूर्वी मुलीला तुम्ही हा प्रश्न आवर्जून विचारणे आवश्यक आहे. जर तुम्ही एकत्र कुटुंबात राहत असाल, आणि तिला विभक्त कुटुंब हवं असेल, तर लग्नानंतर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून लग्नापूर्वीच्या या गोष्टी क्लिअर करणे आवश्यक आहे.

कोणाच्या दबावाखाली लग्न करताय?

काही कुटुंबामध्ये मुलींना फारसं स्वातंत्र्य मिळत नाही. साहजिकच यामुळे त्यांना स्वतःच्या आवडीनिवडीवर विरजण टाकावं लागतं. आणि घरच्यांच्या दबावाखाली काही निर्णय घ्यावे लागतात. म्हणून लग्नापूर्वी मुलींना तुम्ही घरच्यांचा दबावाखाली लग्नाला होकार तर दिला नाहीत ना, हा प्रश्न आवर्जून विचारणे आवश्यक आहे. मुलींच्या इच्छेविरुद्ध जर लग्न होत असेल, तर लग्नानंतर तुमच्यासोबत ती खुश राहीलच, हे ठामपणे सांगता येत नाही. शिवाय तुमच्याविषयी तिला प्रेम, आपुलकी या गोष्टी देखील निर्माण होण्यात अडथळे निर्माण येऊ शकतात.

लग्नानंतर अपेक्षा

लग्नापूर्वी मुलीला लग्नानंतर तुम्हाला काय अपेक्षा आहेत, हा प्रश्न जरूर विचारा. प्रत्येक मुलीने लग्नानंतर आपलं आयुष्य कसं असेल, याची कल्पना केलेली असते. लग्नानंतर तिने केलेल्या कल्पनेसारखं आयुष्य मिळालं नाही, तर ती सुखी आणि समाधानी राहत नाही. लग्नानंतर पत्नीकडून तुमच्या देखील काही अपेक्षा असतात. आणि म्हणून दोघांच्या अपेक्षांचा समतोल साधता येतो की नाही, हे लग्नापूर्वी स्पष्ट होणे आवश्यक असतं. अन्यथा लग्नानंतर, तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावं लागू शकतं.

लग्नापूर्वी जोडीदाराची ध्येय..

लग्नापूर्वी मुलीला लग्नानंतर तुमची काय ध्येय आहेत, याविषयी देखील आवर्जून विचारणे आवश्यक आहे. दोघांची ध्येय वेगवेगळी असतील, तर वादविवाद होण्याची शक्यता खूप जास्त असते. थोड्याफार प्रमाणात ध्येयामध्ये भिन्नता असेल, तर तडजोड करता येऊ शकते. मात्र दोघांचीही ध्येय खूप वेगळी असतील तर मात्र तुमचं नातं फार काळ टिकू शकणार नाही. याची देखील शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून, लग्नापूर्वी हा प्रश्न विचारणं खूप महत्त्वाचं ठरतं. या प्रश्नाचे दोघांनाही समाधानकारक उत्तर मिळाले नाही, तर लग्न करण्यात काहीही अर्थ नाही.

राजकीय विचार विचारणे आवश्यक

लग्नापूर्वी जोडीदाराला त्यांच्या राजकीय विचाराविषयी देखील विचारणे गरजेचे आहे. यामुळे तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे वैचारिक विचार लक्षात येऊ शकतात. दोघांचे वैचारिक विचार वेगवेगळे असतील, तरीदेखील हरकत नाही. मात्र वैचारिक लढाई नेहमी वैचारिक पद्धतीने लढणे आवश्यक असतं. वैचारिक लढाईमध्ये जर हिंसकपणा आला तर नातं क्षणात संपुष्टात येण्याची शक्यता असते. आणि म्हणून वैवाहिक आयुष्यात जोडीदाराचे राजकीय विचार देखील महत्त्वाचे ठरतात.

हे देखील वाचा realme smartphone: realme चा हा दर्जेदार स्मार्टफोन मिळतोय फक्त १० हजारांत; जाणून घ्या डिटेल्स..

Honda Shine 100cc: Hero Splendor Plus ला टक्कर देण्यासाठी Honda Shine 100cc झाली सज्ज; जाणून घ्या कोणती गाडी आहे बेस्ट..

Couple Viral Video: तरुण-तरुणीने भररस्त्यातच सुरू केला कार्यक्रम; व्हिडिओ व्हायरल झाल्याने उडाली खळबळ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.