Honda Shine 100cc: Hero Splendor Plus ला टक्कर देण्यासाठी Honda Shine 100cc झाली सज्ज; जाणून घ्या कोणती गाडी आहे बेस्ट..

0

Honda Shine 100cc: हिरो आणि होंडा (hero and Honda) या दोन्ही कंपनीच्या गाड्या भारतात खूप मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. पूर्वी या दोन्ही कंपन्या एकत्र मिळून आपल्या उत्पादनाची निर्मिती करत होत्या. मात्र आता या दोन्ही कंपनींनी आपला वेगवेगळा संसार थाटला आहे. मात्र तरीदेखील हिरो आणि होंडा या दोन्ही कंपन्यांच्या गाड्यांना भारतीय बाजारात खूप मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे आढळून येते. हिरो मोटर कंपनीच्या गाडी विषयी बोलायचं झालं, तर स्प्लेंडर प्लस या गाडीने अनेकांच्या मनावर राज्य केलं आहे. तर दुसरीकडे होंडा कंपनीच्या Shine 125cc या गाडीने देखील भारतीय बाजारात धुमाकूळ घातला आहे. मात्र shine125cc व्हेरियंटला मायलेज कमी असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून करण्यात आल्याने आता कंपनीने shine चे 100cc व्हेरियंट देखील मार्केटमध्ये उतरवले आहे.

होंडा कंपनीने hero spender Plus या गाडीला टक्कर देण्यासाठी १०० सीसी व्हेरियंट मार्केटमध्ये उतरवलं असल्याचे बोलले जात आहे. या दोन्ही गाड्यांचा मोठा चाहता वर्ग असला तरी या दोन्हीं गाड्यांपैकी कोणती गाडी बेस्ट आहे? दोन्हीं गाड्यांपैकी कोणती गाडी खरेदी करावी? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल तर, ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. जाणून घेऊया Honda SHINE 100cc आणि HERO SPENDER PLUS या दोन्ही गाड्यांविषयी सविस्तर.

किंमत

होंडा शाइन 100 cc व्हेरियंट गाडीची किंमत 64,900 रुपये ठेवण्यात आली आहे. तर हिरो स्प्लेंडर प्लसमध्ये खूप सारे व्हेरियंट उपलब्ध आहेत. हिरो स्प्लेंडर प्लस 72,076 पासून 76,346 रुपयांपर्यंत एक्स शोरुम किंमत ठेवण्यात आली आहे. दोन्ही गाड्यांच्या किंमतीची तुलना करायची झाली तर, 100cc होंडा शाइन हिरो स्प्लेंडर प्लस पेक्षा सात हजार रुपयांनी स्वस्त मिळते.

इंजिन आणि गिअरबॉक्स

होंडा शाइन 100 या गाडीमध्ये ग्राहकांना 99.7 सीसी सिलेंडर, त्याचबरोबर एअर कूल्ड, फ्युल इंजेक्टेड इंजिन देण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे हे 7.6 बीएचपी तसेच 8.05 एनएम टॉर्क जनरेट करण्याचे काम करते. हिरो स्प्लेंडर प्लसच्या इंजिन आणि गिअरबॉक्स विषयी जाणून घ्यायचे झाल्यास 97.2 सीसी, सिंगल सिलेंडर, मिळतो. त्याचबरोबर एअर कूल्ड, फ्युल इंजेक्टेड मोटर देखील मिळते. हे इंजिन देखील 7.9 बीएचपी तसेच 8.05 एनएम पीक टॉर्क जनरेट करण्याचे काम करते. दोन्हीं गाड्याला 4 गिअर बॉक्स देण्यात आले आहेत.

हार्डवेअर/ फीचर्स

दोन्ही गाड्यांच्या ब्रेक सिस्टीम विषयी जाणून घ्यायचे झाल्यास, दोन्ही गाड्यांना ड्रिम ब्रेक सिस्टम देण्यात आली आहे. दोन्ही गाड्यांच्या फीचर्स विषयी सांगायचे झाल्यास, होंडा शाइन 100 cc मध्ये बेसिक इंस्ट्रुमेंट क्लस्टर असणार आहे. तर स्प्लेंडर प्लस डिजिटल कंसोलसह ग्राहकांना मिळणार आहे. दोन्ही गाड्यांच्या हार्डवेअर आणि फीचर्स विषयी तुलना करायची झाल्यास, दोन्ही गाड्यामध्ये फारसा फरक नाही.

डिझाईन आणि कलर

मायलेज, फीचर्स या सगळ्या गोष्टी बरोबरच ग्राहकांना गाडी आकर्षक दिसणारी हवी असते. डिझाईन आणि आकर्षकच्या बाबतीत या दोन्हीं गाड्या दमदार आहेत. होंडा कंपनीने आपली शाईन 100 सीसी बाईक पाच रंगांमध्ये मार्केटमध्ये उतरवली आहे. तर दुसरीकडे हिरो मोटारसायकल कंपनीने आपली हिरो स्प्लेंडर प्लस ही बारा रंगांमध्ये मार्केटमध्ये उतरवली आहे.

हे देखील वाचा IND vs AUS: श्रेयस अय्यर-धनश्री वर्मा हॉटेलच्या एकाच खोलीत; फोटो समोर आल्याने उडाली खळबळ..

Hardik Pandya: हार्दिक पांद्याने जाणिवपूर्वक विराट कोहलीचा केला मोठा अपमान; कशावरून झाला वाद, पाहा व्हिडिओ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.