IND vs AUS: श्रेयस अय्यर-धनश्री वर्मा हॉटेलच्या एकाच खोलीत; फोटो समोर आल्याने उडाली खळबळ..

0

IND vs AUS: आपल्या आवडत्या खेळाडूंविषयी जाणून घेण्याची प्रत्येकांमध्ये उत्सुकता असते. चाहते आपल्या आवडत्या खेळाडूंना फॉलो करत असतात. त्यामुळे आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची चर्चा सोशल मीडियावर रंगल्याचे दिसून येते. अलीकडे भारतीय खेळाडूंसोबत त्यांची फॅमिली देखील ट्रॅव्हल करते. त्यामुळे अनेकांचे फोटो एकमेकांसोबत येणे, ही सामान्य गोष्ट आहे. श्रेयश अय्यर आणि चहलची पत्नी धनश्री वर्मा या दोघांचे फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. चहलच्या (Yuzvendra Chahal) अनुपस्थित धनश्री आणि श्रेयस अय्यर (Dhanashree Verma and shreyas iyer) या दोघांचे फोटो व्हायरल झाल्याने हे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आता पुन्हा एकदा या दोघांचे हॉटेलमधील एकाच खोलीतील फोटो समोर आल्याने सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडला आहे.

नुकतीच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये कसोटी मालिका पार पडली. (Border gavaskar test series) पाठीच्या दुखापतीमुळे भारताचा फलंदाज श्रेयस अय्यर चौथ्या कसोटी सामन्यात खेळून देखील फलंदाजी करू शकला नाही. या संपूर्ण कसोटी मालिकेत श्रेयस अय्यरची कामगिरी सुमार राहिली. मात्र सोशल मीडियावर तो कमालीचा ऍक्टिव्ह आणि चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी शार्दुल ठाकूरच्या लग्नामध्ये श्रेयस अय्यर आणि चहलची पत्नी धनश्री वर्मा या दोघांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. विशेष म्हणजे शार्दुल ठाकूरच्या लग्नाला चहल उपस्थित राहिला नव्हता. मात्र त्याची पत्नी उपस्थित राहिल्याने, अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

श्रेयस अय्यर सोबत धनश्री वर्मा सूर्यकुमार यादवच्या (SuryaKumar yadav) घरी डिनरसाठी गेला होती. तेव्हा देखील या दोघांमध्ये काहीतरी शिजत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचं देखील सोशल मीडियावर बोललं जात होतं. एवढेच नाही, तर या दोघांच्या जवळीकमुळे चहल आणि धनश्री वेगळे झाल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. श्रेयस अय्यरचा हॉटेलमध्ये चाहत्याबरोबर एक फोटो व्हायरल झाल्याने, धनश्री वर्मा सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल झाली आहे.

काय आहे प्रकरण?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोत श्रेयस अय्यर सोबत दोन तरुणी दिसत आहेत. हा फोटो हॉटेलमधील एकाच खोलीतला असल्याचं पाहायला मिळत आहे. महत्त्वाचं म्हणजे श्रेयस अय्यर ज्या दोन तरुणी सोबत आहे, त्यामधील एक तरुणी आपल्या फोनमध्ये सेल्फी घेत आहे. मात्र सेल्फी घेताना तिचा चेहरा दिसत नसल्याने दोघांमध्ये असणारी ही तरुणी नक्की कोण आहे? अशा चर्चा सोशल मीडियावर रंगल्या. अनेकांनी ही तरुणी चहलची पत्नी धनश्री वर्मा असल्याचे सांगितलं. आणि सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडला.

श्रेयस अय्यर सोबत ती तरुणी कोण?

इंदोरमध्ये चौथा कसोटी सामना खेळला जात असताना, श्रेयस देखील या सामन्याचा भाग होता. इंदोर मधील एका हॉटेलमध्ये असताना दोन तरुणींनी श्रेयस अय्यर सोबत फोटो काढला. या दोन्ही तरुणी श्रेयस अय्यरच्या चाहत्या असल्याचे बोललं जात आहे. मात्र यामधील एका तरुणीचा चेहरा मोबाईलच्या मदतीने झाकला गेला असल्याने, ही तरुणी कोण आहे? हे स्पष्ट दिसत नाही. साहजिकच दोघांच्यामध्ये असणारी ही तरुणी दुसरी कोणी नसून, चहाची पत्नी धनश्री वर्मा असल्याचे बोललं गेलं.

गेल्या काही महिन्यांपासून श्रेयस अय्यर आणि धनश्री वर्मा या दोघांच्या नात्याविषयी सोशल मीडियावर नेहमी चर्चा होत असते. दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून जोर धरू लागल्या आहेत. युजवेंद्र चहल शिवाय पती पत्नी धनश्री वर्मा सूर्यकुमार यादवच्या घरी डिनरला गेली होती. या डिनरसाठी श्रेयस अय्यरला देखील निमंत्रण होते. आणि तेव्हापासूनच या दोघांच्या रिलेशनशिप विषयीच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत.

हे देखील वाचा Lifestyle: झोपेत अडथळा करणाऱ्या डासांना या पाच घरगुती उपाय योजना करुन लावा पळवून..

Extra Marital Affair: पती किंवा पत्नी दुसऱ्यासोबत रंगेहाथ पकडली तर कायदा काय सांगतो? जाणून सरकेल पायाखालची जमीन..

Women Like Condom: महिलांना हा कंडोम आवडतो सर्वाधिक; लैंगिक संबंधा दरम्यान देतो जास्त आनंद..

Physical Relationship Tips: ..म्हणून सकाळी उठल्यावर पुरुषाच्या त्या अवयवाला येते ताठरता? जाणून बसेल धक्का..

Health Tips: सालीसकट बदाम खाण्याचे दुष्परिणाम जाणून सरकेल पायाखालची जमीन; दिवसातून इतके बदाम खाणे योग्य..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.