Hardik Pandya: हार्दिक पांद्याने जाणिवपूर्वक विराट कोहलीचा केला मोठा अपमान; कशावरून झाला वाद, पाहा व्हिडिओ..

0

Hardik Pandya: वाद आणि हार्दिक पांड्या (hardik Pandya) हे जणू समीकरणच बनलं आहे. गेल्या काही वर्षात हार्दिक पांड्या संदर्भात अनेक वादविवाद झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले आहेत. हार्दिक पांड्या हा घमंडी क्रिकेटर असल्याचं अनेक चाहत्यांचे म्हणणे आहे. हार्दिक पांड्या आणि विराट कोहली (hardik Pandya and Virat Kohli) या दोघांमध्ये सगळं काही ठीक नसल्याच्या बातम्या काही महिन्यांपूर्वी देखील समोर आल्या होत्या. आता पुन्हा एकदा काल वानखेडे मैदानावर (wankhede cricket ground) भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात (1st ODI) हार्दिक पांड्याने विराट कोहलीशी गैरवर्तन केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. (Hardik Pandya misbehaving with Virat Kohli video)

रोहित शर्माच्या (Rohit Sharma) गैरहजेरीत काळजीवाहू कर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडणाऱ्या हार्दिक पांड्याने काल टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. काल वानखेडे मैदानावर खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. परंतु 188 धावांचा पाठलाग करताना भारतीय प्रमुख फलंदाजांनी नांग्या टाकल्या. केएल राहुल (KL Rahul) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) या दोघांनी केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर भारताने पाच विकेटने हा सामना जिंकला. आणि तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत भारताने पहिला एकदिवसीय सामना जिंकला असला तरी या सामन्यापेक्षा जास्त चर्चा झाली ती हार्दिक पांड्याच्या घमंडीपणाची. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सोबत हार्दिक पांड्याने सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करत असताना गैवर्तन केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विराट कोहली हा एक सीनियर खेळाडू असून त्याने अनेक वर्ष भारतीय संघाचे कर्णधारपद देखील भूषवले आहे. कर्णधारपदाचा मोठा अनुभव असल्याने विराट हा नेहमी खेळाडूंना सल्ला देताना पाहायला मिळतो.

विराट कोहली हा एक उत्कृष्ट फलंदाज तर आहेच, मात्र मैदानावर क्षेत्ररक्षण करत असताना त्याच्याकडे दुर्लक्ष करता येणं अशक्य आहे. क्षेत्ररक्षण करताना देखील विराट कोहली नेहमी आक्रमक खेळ करतो. सोबतच इतर खेळाडूंना देखील सल्ले देताना पाहायला मिळतो. काल देखील गोलंदाजी करण्यासाठी कुलदीप यादव आला असताना कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण असायला हवं याविषयी विराट कोहली सांगत होता. यावेळी कर्णधार हार्दिक पांड्या देखील उपस्थित होता.

विराट कोहलीने हार्दिक पांड्याच्या उपस्थितीत कुलदीप यादवशी (kuldeep Yadav) केलेली चर्चा हार्दिक पांड्याला बिलकुलही आवडली नाही. विशेष म्हणजे, हार्दिक पांड्याने विराट कोहलीने दिलेला सल्ला न ऐकता थेट त्याच्याकडे दुर्लक्ष केले. विराट कोहलीच्या विरुद्ध आपल्या मर्जीने क्षेत्ररक्षण लावले. कर्णधार म्हणून आपल्या म्हणण्याप्रमाणे क्षेत्ररक्षण लावण्यात काहीही गैर नाही. मात्र विराट कोहलीचा सल्ला न ऐकता ज्या पद्धतीने हार्दिक पांड्या निघून गेला, हे विराट कोहलीच्या चाहत्यांना आवडलं नाही.

विराट कोहली सोबत हार्दिक पांड्याने केलेल्या गैरवर्तनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल झाला. एका सीनियर खेळाडू सोबत हार्दिक पांड्याने ज्या पद्धतीने वर्तन केले, हे खूप दुःखद असल्याचं सोशल मीडियावर बोललं जाऊ लागलं. ऍटीट्युड दाखवण्याइतका मोठा खेळाडू हार्दिक पांड्या झालेला नाही. सीनियर खेळाडूंचा रिस्पेक्ट करणं आवश्यक आहे. अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटू लागल्या. यापूर्वी देखील हार्दिक पांड्याने विराट कोहली सोबत गैरवर्तन केलं होतं. साहजिकच यामुळे सोशल मीडियावर या दोघांमध्ये काहीतरी वाद असल्याच्या चर्चा देखील रंगल्या आहेत.

हे देखील वाचा IND vs AUS: श्रेयस अय्यर-धनश्री वर्मा हॉटेलच्या एकाच खोलीत; फोटो समोर आल्याने उडाली खळबळ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.