realme smartphone: realme चा ‘हा’ दर्जेदार स्मार्टफोन मिळतोय फक्त १० हजारांत; जाणून घ्या डिटेल्स..

0

realme smartphone: दर्जेदार स्मार्टफोन (smartphone) कमी किंमतीत मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. आता स्मार्टफोन फक्त मनोरंजनाचे साधन राहिलं नाही, तर स्मार्टफोनच्या माध्यमातून तुम्ही करिअर देखील करू शकता. साहजिकच यामुळे अलीकडच्या काळात स्मार्टफोनची मागणी प्रचंड वाढली आहे. जर तुम्ही देखील कमी किंमतीत दर्जेदार स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमचा शोध याठिकाणी पूर्ण होणार आहे. फ्लिपकार्ट (Flipkart) या ई कॉमर्स वेबसाईटवर (e commerce website) realme C35 हा स्मार्टफोन खूप मोठ्या डिस्काउंटवर विक्री होत आहे. जाणून घेऊया, या स्मार्टफोन आणि ऑफर्स विषयी सविस्तर.

फ्लिपकार्ट या ई कॉमर्स वेबसाईटवर (Flipkart e commerce website) विक्री होत असलेल्या या फोनवर तुम्हाला प्रचंड डिस्काउंट मिळणार आहे. महत्वाचे म्हणजे, या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये देखील दर्जेदार आहेत. जर तुम्हाला देखील हा स्मार्टफोन ऑफरमध्ये खरेदी करायचा असेल, तर या स्मार्टफोनवर चालू असलेल्या डिस्काउंट ऑफरबद्दल तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊया सविस्तर.

तुम्हाला Flipkart या इ कॉमर्स वेबसाईटवरून realme C35 (64GB+4GB) हा स्मार्टफोन खरेदी करायला आहे. मार्केटमध्ये या स्मार्टफोनची मूळ किंमत 13,999 रुपये ठेवण्यात आली आहे. मात्र फ्लिपकार्टवर तुम्ही हा स्मार्टफोन 21% डिस्काउटमध्ये खरेदी करू शकता. म्हणजेच, तुम्ही केवळ 10,999 मध्ये हा फोन खरेदी करू शकणार आहे. एवढेच नाही, तर बँक ऑफर्सचा देखील तुम्हाला लाभ घेता येणार आहे. जर तुम्ही या स्मार्टफोनचे पेमेंट अॅक्सिस बँक कार्डद्वारे केले, तर तुम्हाला पाच टक्के कॅशबॅक मिळणार आहे.

एक्सचेंज ऑफर उपलब्ध

एक्सचेंज ऑफरची देखील सुविधा ग्राहकांना या स्मार्टफोन खरेदीवर मिळणार आहे. जर तुम्ही एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊ इच्छित असाल, तर तुमच्या जुन्या फोनची स्थिती तपासून तुम्हाला ऑफर्सचा लाभ दिला जाणार आहे. तुमचा जुना स्मार्टफोन व्यवस्थित असेल, तर तुम्हाला तब्बल साडेनऊ हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या ऑफर्सचा लाभ ग्राहक खूप मोठ्या प्रमाणात घेत आहेत. ही ऑफर मर्यादित काळासाठी देण्यात येणार असल्याने तुम्हाला गडबड करावी लागणार आहे.

फीचर्स

Realme C35 या स्मार्टफोनचा डिस्प्ले तुम्हाला 6.6 फुल HD+ मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, या स्मार्टफोनचा कॅमेरा दमदार देण्यात आला आहे. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनचा प्रायमरी कॅमेरा 50MP चा देण्यात आला आहे. याशिवाय फ्रंट कॅमेरा देखील उत्तम देण्यात आला आहे. 8MP फ्रंट कॅमेरा असला तरी कॉलिटी उत्तम असल्याचा रिव्ह्यू आहे.

बॅटरीचा विचार करायचा झाल्यास या स्मार्टफोनमध्ये तब्बल 5000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. सोबतच Unisoc Tiger T616 प्रोसेस दिला असल्याने, तुम्हाला या स्मार्टफोनच्या वेगाबद्दल कोणत्याही प्रकारची तक्रार नसणार आहे. बजेट आणि स्मार्टफोनच्या फिचर्सची तुलना करायची झाली तर हा फोन एक उत्तम पॅकेज आहे.

हे देखील वाचा Couple Viral Video: तरुण-तरुणीने भररस्त्यातच सुरू केला कार्यक्रम; व्हिडिओ व्हायरल झाल्याने उडाली खळबळ..

Honda Shine 100cc: Hero Splendor Plus ला टक्कर देण्यासाठी Honda Shine 100cc झाली सज्ज; जाणून घ्या कोणती गाडी आहे बेस्ट..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.