Aadhaar-Ration card linking: जाणून घ्या आधार कार्डला रेशन कार्ड लिंक करण्याची ही सोपी ऑनलाइन पद्धत..

0

Aadhaar-Ration card linking: रेशन कार्ड (ration Card) आणि आधार कार्ड (aadhar card) हे सर्वसामान्यांच्या जीवनाचा भाग बनले आहे. या दोन डॉक्युमेंट शिवाय भारतीय नागरिक आता जगू शकणार नाहीत, अशी परिस्थिती आहे. सरकारच्या कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुमच्याकडे आधार कार्ड, रेशन कार्ड हे दोन डॉक्युमेंट्स असावी लागतात. ड्रायव्हिंग लायसन, रेशन कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, यासारखे अनेक डॉक्युमेंट्स एकत्र करून केवळ एकच आधारकार्ड हे एकच ओळखपत्र असावं, असा सरकारचा उद्देश आहे.

फक्त आधार कार्डच्या माध्यमातून देशातल्या नागरिकांना कोणत्याही रेशन दुकानांमधून आपले धान्य खरेदी करता यावे, हा सरकारचा उद्देश आहे. यासाठी रेशन कार्ड आधार कार्डला जोडणे अनिवार्य आहे. रेशन कार्डला आधार कार्ड लिंक करण्याची तारीख आता सरकारने वाढवली आहे. सरकारने आता आधार कार्डला रेशन कार्ड लिंक करण्याची मुदत वाढवून 30 जून 2023 केली आहे. जर तुम्ही अजूनही रेशन कार्डला आधार लिंक केलं नसेल तर चिंता करण्याची आवश्यकता नाही. आज आपण सोप्या पद्धतीने ऑनलाईन आधारकार्ड रेशन कार्डला कसं लिंक करायचं? हे सविस्तर जाणून घेणार आहोत.

सर्वसामान्यांना स्वस्त धान्य दुकानातून गहू, तांदूळ यासारख्या जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी रेशन कार्ड आवश्यक आहे. रेशनकार्ड शिवाय तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. मात्र आता रेशन कार्ड आधारला लिंक केल्यानंतर, तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तरीदेखील तुम्हाला रेशन दुकानातून धान्य खरेदी करता येणार आहे. मात्र यासाठी तुमचे रेशन कार्ड आधारला लिंक असणे आवश्यक आहे.

रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यासाठी तुमच्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन https://nfsa.gov.in/sso/frmPublicLogin.aspx असं सर्च करायचं आहे.

यामध्ये तुम्हाला उजव्या साईटला ‘login’ या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक रेशन कार्ड क्रमांक त्याचबरोबर नोंदणीकृत मोबाईल क्रमांक सबमिट करायचा आहे. त्यानंतर

“Continue” या पर्यायावर क्लिक करायचे आहे. नंतर तुम्हाला एक OTP पाठवला जाईल. त्यानंतर तुम्ही ओपन केलेल्या पेजवर तुम्हाला ओटीपी हा पर्याय पाहायला मिळेल. त्या पर्यायावर तुम्हाला मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी सबमिट करायचा आहे. इथपर्यंत तुम्ही व्यवस्थित प्रोसेस केल्यानंतर, तुमचे रेशन कार्ड आधार कार्डला लिंक होणार आहे.

जर तुम्हाला ही प्रोसेस किचकट वाटत असेल, किंवा ऑनलाईन आधार कार्डला रेशन कार्डला लिंक करण्यासाठी काही अडचण येत असेल, तर तुम्ही ऑफलाइन पद्धतीने देखील आपल्या रेशन कार्ड आधार कार्डला लिंक करू शकता. आपण ही देखील प्रोसेस सविस्तर जाणून घेऊ.

सर्वप्रथम तुम्हाला तुमक्या आधार कार्ड आणि रेशन कार्डची झेरॉक्स काढायची आहे. जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याबरोबर लिंक नसेल, तर बँक पासबुकची देखील झेरॉक्स तुम्ही काढून अर्जाला जोडायची आहे. रेशन कार्डवर असणाऱ्या कुटुंब प्रमुखाचा एक पासपोर्ट फोटो, अर्जाला जोडून संबंधित अर्ज तुम्हाला रेशन दुकानदाराकडे किंवा कार्यालयात जमा करायचा आहे. सोबतच तुम्ही अर्जाची पोच देखील रेशन दुकानदाराकडून घ्या. म्हणजे तक्रार करायला नंतर सोयीस्कर होईल.

तुम्ही अर्ज जमा करताना सर्व कागदपत्राची पडताळणी करण्यासाठी, तुमचे फिंगर प्रिंट आयडी घेतला जातो. त्यानंतर तुम्हाला दस्तावेज वितरणाचा संदेश मेसेजद्वारे किंवा मेलद्वारे पाठवला जातो. त्यानंतर तुमच्या आधार कार्डला रेशन कार्ड लिंक झाल्याचा मेसेज देखील तुम्हाला येतो.

हे देखील वाचा PAN-Aadhaar Linking: जाणून घ्या PAN-Aadhaar Link आहे की नाही? नसेल तर लगेच जोडा या सोप्या पद्धतीने..

Cash limit at home: घरात फक्त इतकाच कॅश ठेऊ शकता; दिवसात कोणाकडूनही यापेक्षा जास्त रक्कम घेऊ शकत नाही..

UPI Payment Charges: Google pay, phone pay वापरकर्त्यांचा झाला सत्यानाश; 1 एप्रिपासून तब्बल इतके रुपये शुल्क आकारला जाणार..

Delhi Capitals: IPL 2023 मध्ये Delhi capitals विजेता पदाची प्रमुख दावेदार; जाणून घ्या जमेच्या बाजू आणि प्लेइंग इलेव्हन..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.