PAN Card: पॅन कार्ड हरवलंय? सोडून द्या चिंता! घरबसल्या ‘असा’ करा ऑनलाईन अर्ज मिळून जाईल पॅन कार्ड..

0

PAN Card: आर्थिक व्यवहार करण्यासाठी पॅन कार्ड (PAN Card) खूप आवश्यक आहे. आर्थिक व्यवहार करण्यासाठीच नाही, तर इतर ओळखपत्र म्हणून देखील आता पॅन कार्डचा वापर होतो. जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल, किंवा तुमचं पॅन कार्ड हरवलं असेल, तर आता चिंता करण्याची गरज नाही. यापूर्वी तुम्ही ऐकलं असेल, पॅन कार्ड हे फक्त एकदाच बनते. मात्र आता तुम्हाला पॅन कार्ड कितीही वेळा बनवता येऊ शकतं. होय तुम्ही बरोबर वाचलं आहे. आज आपण याच संदर्भात सविस्तर जाणून घेणार आहोत.

आर्थिक गैरव्यवहार टाळण्यासाठी आयकर विभागाने पॅन कार्ड वापरणे अनिवार्य केलं आहे. 50 हजार किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचे व्यवहार करण्यासाठी तुम्हाला बँकेत पॅन कार्डची आवश्यकता असते. याशिवाय तुम्ही आर्थिक व्यवहार करू शकत नाही. तुम्हाला तुमचं पॅन कार्ड कुठे ठेवलं आहे, हे आठवत नसेल? किंवा हरवलं असेल, तर तुम्हाला आता डुप्लिकेट पॅन कार्डसाठी अर्ज करता येणार आहे. जाणून घ्या कसा करायचा अर्ज.

असा करा डुप्लिकेट पॅन कार्डसाठी अर्ज

डुप्लिकेट पॅन कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन https://www.tin-nsdl.com/ असं सर्च करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर अधिकृत वेबसाईट ओपन होईल. तुम्हाला डाव्या कोपऱ्यामध्ये “क्विक लिंक्स” या विभागात जायचे आहे. नंतर तुम्हाला “ऑनलाईन पॅन सेवा” या विभागात जाऊन ‘Apply Pan for Online’ या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला “Reprint of PAN card” यावर जाऊन खाली स्क्रोल करायचं आहे.

इथपर्यंत व्यवस्थित प्रोसेस झाल्यानंतर, तुम्हाला तुमचे पॅन कार्ड ‘Reprint’ करावं लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला या पेजवर “Request for Reprint of PAN Card” हा पर्याय पाहायला मिळेल. तुम्हाला बरोबर यावर क्लिक करायचं आहे. या पर्यवर क्लिक केल्यानंतर, तुमच्यासमोर ऑनलाईन अर्ज करण्यासंबंधीचा सविस्तर फॉर्म ओपन होईल.

आता तुम्हाला ओपन झालेल्या ऑनलाईन अर्जाच्या पेजवर सविस्तर तपशील भरायचा आहे. यामध्ये तुमचे पॅन क्रमांक, त्याचबरोबर तुमचा आधार क्रमांक, पॅन कार्ड बरोबर जो मोबाईल नंबर लिंक आहे, तो मोबाईल क्रमांक, त्याचबरोबर तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. Information Declaration मध्ये तुम्हाला ✓ अशी खूण करायची आहे.

नंतर कॅप्चा कोड टाकायचा आहे. ही सर्व माहिती वेवस्थित भरून झाल्यानंतर, तुम्हाला अर्ज सबमिट करायचा आहे. आता तुम्हाला आलेला ओटीपी कन्फर्म करायचा आहे. नंतर तुम्हाला पेमेंट हा पर्याय निवडायचा आहे. याच पेजवर तुम्हाला समोर “ई पॅन कार्ड ऑर्डर” हा पर्याय निवडायचा आहे. तुम्ही पन्नास रुपये पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला रेकॉर्डसाठी एक Receipt Number देण्यात येईल. अशा पद्धतीने तुम्ही e PAN काढू शकता.

हे देखील वाचा SSC CGL Recruitment 2023: स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये निघाली मेगा भरती; जाणून घ्या सविस्तर अन् असा करा ऑनलाईन अर्ज..

Mobile Aadhaar linking: आता आधार कार्डला सिमकार्ड लिंक करणे अनिवार्य; जाणून घ्या सिमकार्ड आधारशी लिंक करण्याची प्रोसेस..

PAN Card Apply: सात दिवसात घरपोच मिळवा पॅन कार्ड; जाणून घ्या ऑनलाईन अर्ज करण्याची ही सोपी पद्धत..

PAN-Aadhaar Linking: जाणून घ्या PAN-Aadhaar Link आहे की नाही? नसेल तर लगेच जोडा या सोप्या पद्धतीने..

Aadhaar-Ration card linking: जाणून घ्या आधार कार्डला रेशन कार्ड लिंक करण्याची ही सोपी ऑनलाइन पद्धत..

Marriage Tips: ..होय लग्नानंतर बदलतं आयुष्य; या गोष्टी माहीत असतील तरच संसाराचा गाडा चालेल व्यवस्थित..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.