OnePlus Nord CE3 lite: OnePlus चा खतरनाक स्मार्टफोन लॉन्च; 108MP कॅमेरा असणारा फोन केवळ 20 हजारात..

0

OnePlus Nord CE3 lite: दिवसेंदिवस स्मार्टफोनचे (smartphone)महत्त्व वाढत चालले असल्याने, आता अनेक बड्या कंपन्या नवनवीन स्मार्टफोन बाजारात उतरवत आहेत. स्मार्टफोनच्या माध्यमातून आता करिअर देखील करता येत असल्याने, तरुणाईला स्मार्टफोनची भुरळ पडली आहे. अनेकांना दर्जेदार स्मार्टफोन हवा असतो. पण तो खरेदी करण्यासाठी त्याच्याकडे बजेट नसते. जर तुमचे ही बजेट कमी असेल, आणि तुम्हाला दर्जेदार स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर आता चिंता करण्याची गरज नाही. OnePlus कंपनीचा 108MP कॅमेरा असणारा दर्जेदार स्मार्टफोन तुम्ही केवळ 20 हजारात खरेदी करू शकता.

OnePlus कंपनीने असंख्य तरुणाईच्या मनावर राज्य केलं आहे. अनेक तरुणाई हा स्मार्टफोन खरेदी करताना दिसतात. दर्जेदार कॅमेरा या कंपनीची खासियत असल्याने OnePlus स्मार्टफोनला बाजारात प्रचंड मागणी आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनी नेहमी नवनवीन स्मार्टफोन बाजारात उतरवत असते. आता पुन्हा एकदा OnePlus ने OnePlus Nord CE3 lite हा स्मार्टफोन लाँच केला आहे. या मोबाईलचा कॅमेरा DSLR लाही भारी पडत आहे. जाणून घेऊया फोन आणि किंमत विषयी सविस्तर.

ॲपल या स्मार्टफोन नंतर वनप्लस स्मार्टफोनने भारतीय बाजारपेठेत आपलं नाव कमावले. वन प्लस नंतर क्लासिक स्मार्टफोनची निर्मिती करत वन प्लसने खूप कमी काळामध्ये नावलौकिक मिळवला. जबरदस्त लूक बरोबर दर्जेदार कॅमेरा सेटअपमुळे हा स्मार्टफोन ग्राहकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. मात्र या स्मार्टफोनचे बजेट सर्वसामान्यांना परवडणारे नसल्याने, अनेकांना या स्मार्टफोन खरेदी पासून वंचित रहावे लागत होतं. मात्र आता या कंपनीने “इको फ्रेंडली स्मार्टफोन” लॉन्च केला आहे. OnePlus Nord CE3 lite असं या स्मार्टफोनचे नाव आहे. ग्राहकांना आता 20 हजाराच्या आत तब्बल 108 mp कॅमेरा असणारा हा दर्जेदार स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे.

फीचर्स आणि किंमत

मंगळवारी वन प्लसने हा दर्जेदार स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन Oneplus nord CE2 lite चे अपडेट व्हर्जन असणार आहे. हा स्मार्टफोन विविध ब्राईट कलरमध्ये लॉन्च केला आहे. त्याचबरोबर लूकचा देखील विचार करत आतापर्यंतच्या सर्व स्मार्टफोनच्या तूलनेत हा स्मार्टफोन अधिक आकर्षित असणार असल्याचा कंपनीचा दावा आहे.

Oneplus ने लॉन्च केलेल्या Oneplus nord CE3 lite या स्मार्टफोनचा डिस्प्ले ६.७२ HD+ देण्यात आला आहे. त्याचबरोबर 120Hz रिफ्रेश रेटसह हा डिस्प्ले असणार आहे. ज्यामुळे स्मार्टफोनला कमालीचा स्मूथनेस प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर 690nits ब्राईटनेस देखील असणार आहे. ज्यामुळे तुम्हाला उन्हामध्ये हा स्मार्टफोन वापरताना कोणतीही अडचण येणार नाही.

या स्मार्टफोनला बॅटरी बॅकअप देखील दमदार असणार आहे. 65w फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. सोबतच Qaulcomm Snapdragon 695 असा प्रोसेसर प्रदान केला आहे. 8GB रॅमसह 256GB स्टोरेज असणारा हा स्मार्टफोन तुम्ही 16GB पर्यंत वाढवू शकता. या स्मार्टफोनची किंमत 20 हजारापासून चालू होते. सेक्युरिटीसाठी या स्मार्टफोनला साइड-माउंटेड फिंगरप्रिट सेंसर देण्यात आला आहे.

हे देखील वाचाPAN Card: पॅन कार्ड हरवलंय? सोडून द्या चिंता! घरबसल्या असा करा ऑनलाईन अर्ज मिळून जाईल पॅन कार्ड..

Samsung Smartphone: 9,500 रुपयात सॅमसंगचा 8 GB रॅम आणि 50 MP ट्रिपल कॅमेरा फोन; जाणून घ्या कुठे चालू आहे ऑफर..

Delhi Metro kiss: भर मेट्रोतच सुरू केला इम्रान हाश्मी स्टाईल kiss; एक मिनिट किस करूनही थांबायचं नाव घेत नव्हतं कपल..

Pushpa 2 Teaser: पुष्पाला शोधण्यासाठी धावाधाव, जाळपोळ; टीझरने प्रेक्षकांच्या मनात प्रश्नाचे काहूर, उत्सुकता शिगेला..

PAN-Aadhaar Linking: जाणून घ्या PAN-Aadhaar Link आहे की नाही? नसेल तर लगेच जोडा या सोप्या पद्धतीने..

Aadhaar-Ration card linking: जाणून घ्या आधार कार्डला रेशन कार्ड लिंक करण्याची ही सोपी ऑनलाइन पद्धत..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.