Gold Rates Today: ..म्हणून सोन्याने गाठला उच्चांक; ‘या’ नंबरवर द्या मिस्ड कॉल, अन् जाणून घ्या सोन्याचे दर..

0

Gold Rates Today: भारतामध्ये सोन्याची (gold) मोठी क्रेझ आहे. सोनं दिवसेंदिवस महाग होत चाललं असताना देखील अनेक जण सोन्याची खरेदी करताना दिसून येतात. असं म्हणतात, सोनं सौंदर्य वाढवण्याचे काम करतं. मौल्यवान वस्तूंमध्ये सोन्याचा पहिला क्रमांक लागतो. अर्थात यामुळे सोन्याला प्रचंड मागणी असल्याने, सोन्याच्या दराची दररोज माहिती ठेवणारा देखील एक मोठा वर्ग पहायला मिळतो. जाऊन घेऊया सोन्याचे रोजचे दर कसे पाहायचे.

सोन्याचे का गाठला उच्चांक?

काल सोन्याने नवा विक्रम प्रस्थापित केला. जागतिक ट्रेंड नुसार सराफा बाजारामध्ये १० ग्रॅम सोन्याची किंमत ६१,०८० रुपयांवर पोहोचली आहे. हा एक विक्रम असून, सोनं आता आणखीन महाग होण्याचा अंदाज लावला जातोय. सोन्याबरोबर चांदीचे दर देखील वाढले आहेत. एक किलो चांदीचे दर जाणून घ्यायचे झाल्यास, आता तुम्हाला एक किलो चांदी खरेदी करण्यासाठी ७० हजार ५०० रुपये मोजावे लागणार आहेत. या संदर्भातली माहिती एचडीएफसी सिक्युरिटीज यांनी दिलेली आहे.

काल दिल्ली सराफ बाजारामध्ये सोन्याचे दर कमालीचे वाढले. तब्बल १ हजार २५ रुपयांनी हे दर वाढले आहेत. यापूर्वी सोनं ६०,०५५ होते. मात्र, आता सोन्याची किंमत १ हजार २५ रूपयांनी वाढली आहे. आता तुम्हाला दहा ग्रॅमवर ६१ हजार ८० रुपये मोजावे लागणार आहेत. येणाऱ्या काही दिवसात सोन्याचे दर आणखीन वाढणार असल्याचा अंदाज आता व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

चांदीही झाली महाग

काल फक्त सोन्याच्या घरातच वाढ झाली नाही, तर चांदी देखील कमालीची वाढली आहे. काल किलोमागे 1 हजार 810 रुपयांनी चांदी वाढली आहे. आता ग्राहकांना एक किलो चांदी खरेदी करण्यासाठी 73 हजार 950 रुपये मोजावे लागणार आहेत. लग्नकार्य, किंवा इतर कार्यासाठी सर्वसामान्यांपुढे आता सोनं खरेदी हे मोठं आव्हान असणार आहे.

म्हणून वाढले सोने?

परदेशी बाजार पेठमध्ये सोन्याची घसरण होत असल्याने परदेशात सोन्याला मागणी वाढली आहे. साहजिकच त्यामुळे भारतीय बाजारपेठांमधून सोन्याची निर्यात वाढली आहे. 2,027 डॉलर प्रति औंस सोने परदेशात विकले जात आहे. तर चांदीचा 24.04 डॉलर प्रति औंस असा दर आहे.

चीन त्याचबरोबर मध्य पूर्व बाजारपेठामध्ये सोन्याची मागणी आता वाढली आहे. फेब्रुवारीमध्ये भारताच्या दागिन्यांची निर्यात तब्बल २४ टक्क्यांनी वाढली आहे. आकड्यामध्ये जाणून घ्यायचे झाल्यास २८ हजार ८३२ कोटी इतकी वाढली आहे. GJEPC या संदर्भात माहिती देताना सांगितले आहे, गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये हिरे आणि इतर दागिन्यांची निर्यात २३ हजार ३२६. ८० कोटी होती.

मिस्ड कॉलद्वारे जाणून घ्या सोन्याचे दर

अनेकांना दररोज सोन्याचे दर जाणून घ्यायचे असतात. तुम्ही देखील अशा लोकांमध्ये असाल, तर तुम्हाला आता एका मिस्ड कॉलद्वारे सोन्याचे दर दररोज जाऊन घेता येणार आहेत. सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुमच्या मोबाईल मधून तुम्हाला एका नंबरवर मिस्ड कॉल द्यायचा आहे. ८९५५६६४४३३ या नंबरवर जर तुम्ही मिस्ड कॉल दिला, तर तुम्हाला एक एसएमएस येईल. ज्याद्वारे तुम्हाला सोन्याचे दर सांगितले जातील.

हे देखील वाचा CRPF Recruitment 2023: CRPF मध्ये तब्बल 1 लाख 30 हजार पदांची मेगा भरती; 10+12 पोरांनो लगेच जाणून घ्या अपडेट..

RR vs PBKS: ही एक चूक आणि या एका खेळाडूमुळे राजस्थान रॉयल्सने गमावला सामना..

Wedding viral video: स्टंटबाजीच्या नादात नवरीचा सुंदर चेहरा झटक्यात जळाला; पाहा व्हिडिओ..

OnePlus Nord CE3 lite: OnePlus चा खतरनाक स्मार्टफोन लॉन्च; 108MP कॅमेरा असणारा फोन केवळ 20 हजारात..

PAN Card: पॅन कार्ड हरवलंय? सोडून द्या चिंता! घरबसल्या असा करा ऑनलाईन अर्ज मिळून जाईल पॅन कार्ड..

PAN-Aadhaar Linking: जाणून घ्या PAN-Aadhaar Link आहे की नाही? नसेल तर लगेच जोडा या सोप्या पद्धतीने..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.