MI vs CSK: या तीन कारणामुळे मुंबई इंडियन्सचा उडणार धुव्वा; जाणून घ्या धोनीचा मास्टर प्लॅन..

0

MI vs CSK: आयपीएल सीझन16 चा बारावा सामना आज संध्याकाळी वानखेडे क्रिकेट मैदानावर चेन्नई आणि मुंबई (CSK vs MI) या दोन तुल्यबळ प्रतिस्पर्धी संघांमध्ये रंगणार आहे. आयपीएलच्या इतिहासात हे दोन सर्वाधिक यशस्वी संघ राहिले आहेत. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने एकूण पाच वेळा तर चेन्नई सुपर किंग्स (Chennai super kings) संघाने चार वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. आज हे दोन्ही संघ संध्याकाळी साडेसात वाजता एकमेकांशी दोन हात करणार आहेत.

मुंबईच्या वानखेडे क्रिकेट मैदानावर ( wankhede cricket ground Mumbai) चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स एकमेकांशी भिडणार आहेत. मुंबई इंडियन्स या सीजन मधला आपला पहिला विजय मिळवण्यासाठी धडपड करणार आहे. तर चेन्नई सुपर किंग्स मुंबई इंडियन्स संघाचा पराभव करण्यासाठी सज्ज असणार आहे. या दोन्ही संघाचा मोठा फॅन बेस असल्याने, या सामन्याची जोरदार चर्चा आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. साहजिकच यामुळे या सामन्यात कोण बाजी मारेल? हे ठामपणे सांगता येत नसलं तरी चेन्नई सुपर किंग्स संघाचे पारडे या सामन्यात जड आहे.

आजच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाचे पारडे जड असण्याची काही कारणे देखील आहेत. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत या दोन्ही संघांनी एकूण 34 सामने खेळले आहेत. यात मुंबई इंडियन्सने वीस तर चेन्नई सुपर किंग्सने 14 सामने जिंकले आहेत. रेकॉर्ड जरी मुंबई इंडियन्सच्या बाजूने असला तरी गेल्या हंगामाप्रमाणे या हंगामात देखील मुंबईचा संघ समतोल वाटत नाही.

मुंबई इंडियन्सच्या संघापुढे गोलंदाजी बरोबर फलंदाजीचे देखील मोठं आव्हान असणार आहे. सूर्यकुमार यादव (SuryaKumar yadav) ईशान किशन (Ishan Kishan) रोहित शर्मा (Rohit Sharma) हे प्रमुख तीन फलंदाज आपल्या फॉर्मशी झगडताना पाहायला मिळत आहेत. याशिवाय मधली फळी देखील मुंबई संघाला विश्वास देत नसल्याचे पाहायला मिळत आहे. रोहित शर्मा, ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव हे तीनही फलंदाज जर स्वस्तात बाद झाले, तर हा सामना एकतर्फी होण्याची दाट शक्यता आहे.

दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्स संघाची फलंदाजी जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. ऋतुराज गायकवाड, डेव्हिड कॉन्वे, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) यासारखे तगडे फलंदाज चेन्नई सुपर किंग्स संघाच्या ताफ्यात असून, ते फॉर्ममध्येही आहेत. जलदगती गोलंदाजी काहीशी कमकुवत असली तरी महेंद्रसिंग धोनी आपल्या गोलंदाजांकडून बेस्ट काढून घेण्यात मातब्बर आहे. शिवाय चेन्नईचे स्पिनर चांगले फॉर्ममध्येही आहेत.

वानखेडे मैदानाची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल असल्याने आजच्या सामन्यात हाय स्कोरिंग गेम चाहत्यांना पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आजच्या सामन्यात टॉस महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. जो संघ धावांचा पाठलाग करेल, त्या संघाला जिंकण्याची अधिक संधी असेल. त्याचे कारण म्हणजे या मैदानावर जाऊ पडण्याची शक्यता आहे. मात्र जर पहिल्यांदा फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्स संघाने 200 धावांचा टप्पा गाठला तर मुंबई इंडियन्सचा पराभव होण्याची अधिक शक्यता आहे. चेन्नईचे फलंदाज जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याने 200 धावांचा टप्पा गाठणे अवघड नसणार आहे.

धोनीचा मास्टर प्लॅन

सर्वात यशस्वी आणि कॅप्टन कूल म्हणून ओळख निर्माण करणारा महेंद्रसिंग दोन्ही हा सामन्यापूर्वी अनेक गेम प्लॅन तयार करून येतो. मात्र सामना सुरू झाल्यानंतर खेळपट्टी कशी खेळ करते? समोरचा फलंदाज कशा पद्धतीने फलंदाजी करतो? यानुसार आपली रणनीती आखतो. सामना कितीही रंगतदार अवस्थेत असला तरी देखील स्वतः कूल असतो. कधीही पॅनिक होताना पाहायला मिळत नाही. याचे कारण म्हणजे, तो कधीही निकालाचा विचार करत नाही. नेहमी प्रोसेसचा विचार करतो. कालाचा विचार न केल्याने, पराभवाची भीती तुमच्या पासून दूर जाते. हेच धोनीच्या यशस्वी कर्णधाराचं गुपित आहे. हे स्वतः त्याने एका कार्यक्रमात बोलून दाखवलं आहे.

आपल्या प्रत्येक खेळाडूंना महेंद्रसिंग धोनीने त्यांचा रोल समजावून सांगितलेला आहे. सामन्याच्या निकालाची चिंता तुम्ही अजिबात करू नका. तुम्ही तुमच्या खेळाला एन्जॉय करा. असं धोनीने प्रत्येक खेळाडूला सांगितलं आहे. या सिझनमध्ये खेळाडूंवर कुठल्याही प्रकारचा दबाव नाही. हाच गेम प्लॅन आम्ही प्रत्येक सामन्यात पुढे घेऊन जाणार आहोत. असे एका कार्यक्रमात चेन्नई सुपर किंगच्या प्रशिक्षकांनी सांगितलं आहे.

हे देखील वाचा Physical relationship tips: ..म्हणून महिला शारीरिक संबंध ठेवण्यास नसतात तयार; धक्कादायक म्हणजे याला सर्वस्वी जबाबदार आहेत पुरुष..

IRCTC Recruitment 2023: B.Sc उत्तीर्ण आहात, असा करा अर्ज नोकरी मिळेल हमखास..

KKR vs RCB: शाहरुखने विराटला अस्मान दाखवल्यानंतर सगळ्यांसमोर केले किस; पाहा व्हिडिओ..

PAN Card: पॅन कार्ड हरवलंय? सोडून द्या चिंता! घरबसल्या असा करा ऑनलाईन अर्ज मिळून जाईल पॅन कार्ड..

PAN-Aadhaar Linking: जाणून घ्या PAN-Aadhaar Link आहे की नाही? नसेल तर लगेच जोडा या सोप्या पद्धतीने..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.