Honda Shine 100cc: मायलेज, किंमत, लूक्समध्ये Honda Shine 100cc ने Hero spender plus ला टाकले मागे; जाणून घ्या सविस्तर..

0

Honda Shine 100cc: भारतामध्ये होंडा आणि हिरो या दोन कंपन्यांच्या गाड्यांची विक्री सर्वाधिक आहे. यामध्ये Hero spender plus आणि Honda shine या दोन गाड्यांचा समावेश आहे. या दोन्ही गाड्यांची विक्रम विक्री गेल्या काही वर्षांमध्ये झाली आहे. या दोन्ही कंपन्यांनी आपला वेगळा संसार थाटल्यानंतर, होंडा कंपनीने Honda shine 125cc ही बाईक मार्केटमध्ये उतरवली. आणि या बाईकने अक्षरशः मार्केट गाजवले. मात्र ग्राहकांकडून मायलेजची तक्रार येत असल्याने कंपनीने आता 100सीसी इंजिन असणारे व्हेरियंट बाजारात आणले आहे.

हिरो स्प्लेंडर प्लसला टक्कर देण्यासाठी होंडा कंपनीने होंडा शाइन125cc व्हेरियंट बाजारात उतरवलं असल्याचं सांगण्यात येतं. हिरो स्प्लेंडर प्लस या बाईकचे मार्केट खाण्यासाठी कंपनीने ही चाल खेळली असली तरी, खरचं ही बाईक हिरो स्प्लेंडर पेक्षा जास्त दमदार आहे का? असा प्रश्न असंख्य ग्राहकांना पडला आहे. हिरो स्प्लेंडर प्लस प्रमाणे होंडा शाईन या बाईकचे देखील १०० सीसी इंजिन कंपनीने उतरवलं आहे. असं असलं तरी लूक, मायलेज, किंमत, इंजिन या सगळ्या गोष्टीत खरंच हिरो स्प्लेंडर प्लसवर हिरो होंडा शाईन 100 सीसी बाईक वरचड ठरली आहे का? वाचा सविस्तर.

किंमतीत बाजी

हिरो स्प्लेंडर प्लस या टू व्हीलर पेक्षा होंडा शाईन 100cc या बाईकची किंमत कमी असल्याने, किंमतीमध्ये या गाडीने बाजी मारली आहे. हिरो स्प्लेंडर प्लसची एक्स शोरूम प्राईस 72 हजार 420 आहे. तर होंडा शाईन १०० सीसी बाईकची किंमत 64 हजार 900 रुपये आहे. म्हणजेच जवळपास साडेसात हजार रुपयांनी तुम्हाला होंडा शाइन100cc स्वस्त मिळते. आणि म्हणून हिरो स्प्लेंडर प्लस या बाईक पेक्षा ग्राहकांची Honda shine गाडीला अधिक पसंती आहे.

मायलेज

होंडा शाईन 125cc बाईक हिरो स्प्लेंडर प्लस या गाडी पेक्षा कमी मायलेज देत होती. ग्राहकांनी देखील तक्रारी केल्या होत्या. मायलेजचा विचार करून कंपनीने आता शाईन१०० सीसी बाईक बाजारात उतरवली आहे. दोन्ही गाड्यांच्या मायलेजची तुलना करायची झाली, तर दोन्ही गाड्या 65 ते 75 या दरम्यान मायलेज देत असल्याचा ग्राहकांचा रिव्ह्यू आहे.

दोन्हीं गाड्यांचे इंजिन जवळपास सारखेच..

हिरो स्प्लेंडर प्लस आणि होंडा शाईन 100cc या दोन्हीं गाड्यांचे इंजिन जवळपास सारखेच आहे. फीचरमध्ये थोडासा फरक आहे. मात्र तुलना करायची झाली, तर दोन्ही गाड्या इंजिनच्या बाबतीत सारख्याच आहेत. शाइन 100cc बाईकलाला मूलभूत अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आले आहे. तर स्प्लेंडर प्लसला टॉपिंग XTEC प्रकाराला एक फॅन्सी डिजिटल कन्सोल देण्यात आला आहे.

Honda Shine 100cc मध्ये ग्राहकांना 99.7cc, सिंगल-सिलेंडर मिळतो. इंजिन गरम होऊ नये म्हणून एअर-कूल्ड इंधन-इंजेक्टेड असणार आहे. हे 7.6 bhp आणि 8.05 Nm टॉर्क निर्माण करते. Hero Splendor Plus या बाईकला 97.2cc चा सिंगल-सिलेंडर देण्यात आला आहे. सोबतच एअर-कूल्ड इंधन-इंजेक्टेड मोटर देखील आहे. जी 7.9 bhp आणि 8.05 Nm पीक टॉर्क बनवण्याचे काम करते.

लूक

जो लूक होंडा शाईन 125cc या बाईचा आहे, अगदी तोच लूक होंडा शाईन 100cc या व्हेरियंटला देण्यात आला आहे. हिरो स्प्लेंडर प्लस एकूण बारा रंगांमध्ये उपलब्ध आहे. मात्र शाईन या बाईकचा लूक ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे. होंडा 125cc बाईक प्रमाणे या बाईकचे पाठीमागील सिट देखील थोडसं उंच असल्याने, लूकच्या बाबतीत ही गाडी अधिक अधिक दर्जेदार वाटत आहे. किंमत, मायलेज, लूक, इंजिन या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा झाल्यास, हिरो स्प्लेंडर प्लस या गाडीपेक्षा होंडा शाइन 100 सीसी गाडी उजवी आहे.

 हे देखील वाचा Viral video: महिलेसमोरच हस्तमैथुन करू लागला चिपांजी; महिला ओरडत राहिली तरीही थांबला नाही, पाहा व्हिडिओ..

UPI Credit Payment: खात्यावर पैसे नसले तरीही UPI द्वारे करू शकता पेमेंट; जाणून घ्या रिझर्व्ह बँकेचा हा नवीन नियम..

Post Office RD: फक्त दहा हजार गुंतवा, मिळेल 16 लाखांचा परतावा; होय ही आहे पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना..

physical relationship: संबंध करताना चुकूनही खाऊ नका हे चार पदार्थ अन्यथा..

IRCTC Recruitment 2023: B.Sc उत्तीर्ण आहात, असा करा अर्ज नोकरी मिळेल हमखास..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.