PM Kisan Samman Nidhi: १४ व्या हप्त्याची तारीख निश्चित! फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार ४ हजाराचा हप्ता; तुम्हाला मिळणार का? जाणून घ्या या पध्दतीने..

0

PM Kisan Samman Nidhi: देशातल्या गरीब शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी, शेती करण्यासाठी आर्थिक हातभार लागावा, यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी ही योजना सुरू केली. (PM Kisan Yojana) आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या (PM Kisan Yojana Beneficiary farmers) बँक अकाउंटवर 13 हप्ते केंद्र सरकारने जमा केले आहेत. आता शेतकऱ्यांना 14 व्या हाताची प्रतीक्षा लागली असून, मीडिया रिपोर्टनुसार जूनच्या पहिल्या आठवड्यात 14वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे. (PM Kisan 14th Installment update)

केंद्र सरकार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या (pantpradhan Kisan Samman Nidhi Yojana) माध्यमातून दर चार महिन्याला दोन हजाराचे तीन हप्ते लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर जमा करते. असे वर्षाला एकूण सहा हजार रुपये शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून आर्थिक मदत केली जाते. देशातील अनेक बोगस शेतकरी या योजनेचा लाभ घेत असल्याचे लक्षात आल्यानंतर, केंद्र या सरकारने योजनेमध्ये बदल केला. योजनेचा लाभ घेण्यासाठी आता शेतकऱ्यांना ई केवायसी करने बंधनकारक आहे.

फक्त याच शेतकऱ्यांना ४००० रुपये मिळणार

केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर शेतकऱ्यांना आता ekyc प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. जर तुम्ही ekyc पूर्ण केली नसेल, तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. eKYC प्रक्रियेमुळे जर तुमच्या अकाउंटवर १३ वा हप्ता जमा झाला नसेल, तर आता तुमच्या अकाउंटवर 13 वा आणि 14 वा हप्ता असे दोन हप्ते जमा होणार आहेत. म्हणजेच तुम्हाला 14व्या आणि तेराव्या हप्त्याची रक्कम मिळून एकूण चार हजार बँक अकाउंटमध्ये जमा होतील. जर तुम्ही अद्याप तुमच्या खात्याची पडताळणी केली नसेल, तर खालील पद्धतीने लगेच करून घ्या.

तुम्हाला मिळणार का चार हजार? पाहा या पद्धतीने

पी एम किसान योजनेचा चौदावा हप्ता तुम्हाला मिळणार आहे की नाही? सोबतच जर त्याला मिळाला नसेल तर तो देखील मिळणार आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागणार आहे. यासाठीआपल्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन http://pmkisan.gov.in/ असं सर्च करायचं आहे.

http://pmkisan.gov.in/ किंवा क्रोमवर जाऊन हे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर पीएम किसान योजनेची अधिकृत वेबसाईट ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला या वेबसाइटवर “फार्मर कॉर्नर” हा पर्याय पाहायला मिळेल. तुम्ही लगेच त्यावर क्लिक करायचं आहे. तर तुम्ही “लाभार्थी स्थिती” हा पर्याय निवडायचा आहे. निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक बँक खाते आणि मोबाईल क्रमांक या तीन पर्यायांपैकी एक पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्याची स्थिती पाहायला मिळेल.

लाभार्थी स्थिती म्हणजे काय? 

पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आतापर्यंत किती हप्ते देण्यात आले आहेत. त्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळाला आहे की नाही? हप्ते कोणत्या तारखेला जमा झाले? बरोबरच शेतकऱ्यांचे कोणते हप्ते अडकले आहेत? कोणत्या कारणामुळे हप्ते अडकले? लाभार्थी शेतकऱ्यांचे आधार कार्ड पडताळले आहे की नाही? असा तपशील पाहायला मिळतो.

हे देखील वाचा MahaDBT Scheme: आता मागेल त्या शेतकऱ्यांना मिळणार शेततळे, ठिबक सिंचन, फळबाग; जाणून घ्या सविस्तर..

Mangoes Buying Tips: या तीन गोष्टी तपासून ओळखता येतो आंबा गोड आहे की आंबट; जाणून घ्या या तीन सोप्या ट्रिक्स..

land area calculator: मोबाइलवरुन 5 मिनिटात मोजता येतेय जमीन; लगेच जाणून घ्या ही सोपी प्रोसेस..

RCB vs KKR: हे चार खेळाडू खेळतात गल्ली क्रिकेट, आमची जिंकण्याची लायकी नाही; विराटच्या विधानाने खळबळ..

IPL 2023: नाकातून मेकुड काढून अर्जुन तेंडुलकरने टाकला तोंडात; व्हिडिओ झाला कॅमेऱ्यात कैद..

TATA electric bicycle: टाटाची सगळ्यात स्वस्त आणि दमदार सायकल बाजारात दाखल; किंमत आहे केवळ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.