TATA electric bicycle: टाटाची सगळ्यात स्वस्त आणि दमदार सायकल बाजारात दाखल; किंमत आहे केवळ..

0

TATA electric bicycle: इंधनाच्या किंमती दिवसेंदिवस वाढत चालल्या असल्याने आता अनेकजण इलेक्ट्रिक वाहनांकडे वळला आहे. इंधनाची बचत होण्यासाठी आता इलेक्ट्रिक वाहन हा सर्वोत्तम पर्याय ठरत आहे. इंधनाच्या दरवाढीने सर्वसामान्य हैराण झाला आहे. साहजिकच या गोष्टी लक्षात घेऊन, अनेक बड्या कंपन्यानी आपला मोर्चा इलेक्ट्रिक वाहन निर्मितीकडे वळवला आहे. (Street Fire 21 Speed)

इंधनाच्या वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक वाहनांची (electric vehicles) किंमत जास्त असल्याने सर्वसामान्यांना इलेक्ट्रिक वाहने खरेदी करता येत नाहीत. इलेक्ट्रिक टू-व्हीलरच्या (electric two wheeler) किंमती खूप जास्त असल्याने प्रत्येकाला इलेक्ट्रिक टू-व्हीलर खरेदी करता येत नाही. आणि म्हणून कंपनीने सर्वसामान्यांसाठी इलेक्ट्रिक सायकलचे निर्मिती केली असून, आता ही सायकल बाजारात दाखल देखील झाली आहे. जाणून घेऊया सायकलची किंमत वैशिष्ट्ये आणि फीचर्स. 

भारतामध्ये बहुसंख्य लोक सर्वसामान्य आहेत आणि एम्पलोयी देखील आहेत. प्रत्येकाला टू-व्हीलरवर ऑफिसला जावं लागतं. मात्र आता अनेक एम्प्लॉयींना टू-व्हीलरवर ऑफिसला जाणं परवडत नाही. जर तुम्ही देखील या प्रकारात येत असाल, तर टाटाने तुमच्यासाठी इलेक्ट्रिक सायकल लॉन्च केली आहे. लॉन्च केलेल्या इलेक्ट्रिक सायकलचे नाव टाटा स्ट्रीट फायर 21 स्पीड (Street Fire 21 Speed ) असं आहे.

वैशिष्ट्ये

Street Fire 21-speed ही साइकल नाविन्यपूर्ण फिचर्ससह लॉन्च करण्यात आली आहे. या साइकल बरोबर आणखी एक साइकल टाटाने बाजारामध्ये उतरवली आहे. या साइकलचे नाव “स्ट्रीट फायर सिंगल स्पीड’ असं आहे. या सायकलच्या पर्यायामध्ये ग्राहकांना विविध कलर मिळतात. ग्राहक या दोन्ही सायकली टाटा स्ट्रायडरच्या अधिकृत वेबसाईट वरून खरेदी करू शकतात.

टाटाची स्ट्रीट फायर 21 स्पीड सायकल एक सिटी बाईक आहे. शहरात ज्याप्रमाणे वातावरण असतं, अशा पद्धतीने या सायकलची निर्मिती आणि रचना करण्यात आली आहे. कंपनीने या गाडीला १९-इंच असणारी लाइटवेट कार्बन स्टील फ्रेम दिली आहे. मजबुतीसाठी या गाडीमध्ये दुहेरी-वॉल तसेच अलॉय रिम्स देखील दिली आहे. हे सर्व शिमॅनो २१-स्पीड गियरिंगशी फिट केली आहेत.

ही गाडी तुम्हाला अनेक कलर ऑप्शनमध्ये मिळणार आहे‌. यामध्ये व्हाईट त्याचबरोबर डेझर्ट स्टॉर्म अशा दोन रंगामध्ये खरेदी करता येणार आहेत. उष्णता रोखण्यासाठी या साइकलला नवीन ग्राफिक्स देण्यात आले आहे. त्याचबरोबर TIG-वेल्डेड १९-इंचाची स्टील फ्रेम देखील देण्यात आली आहे. सोबतच स्ट्रीट फायर यासारखी उत्कृष्ट वैशिष्ट देखील ग्राहकांना मिळतात.

किंमत

टाटाने बाजारात उतरवलेल्या सायकलची किंमत सगळ्यांनाच धक्का बसवणारी आहे. या दोन्ही सायकलची किंमत 9,599 आणि 6,999 इतकी ठेवण्यात आली आहे. गाडीच्या स्पीड विषयी जाणून घ्यायचे झाल्यास, ही सायकल तुम्हाला प्रति ताशी 21 किलोमीटर पर्यंतची रेंज देते. टाटा स्ट्रायडर स्ट्रीट फायर 21 स्पीड ही सायकल 9 हजार 599 तर स्ट्रीट फायर सिंगल स्पीड डेझर्ट स्टॉर्म ही सायकल 6 हजार 999 रुपयात मिळते. या दोन्ही सायकली तुम्ही टाटा स्ट्रायडरच्या वेबसाइट वरून खरेदी करू शकता.

हे देखील वाचा Sugarcane Juice Benefits: कावीळ-मुतखड्यावर रामबाण उपाय आहे हा उन्हाळी ज्यूस; मात्र या 5 लोकांना येणार नाही पिता..

WTC 2023 Final: या मोठ्या खेळाडूंच्या जागी अजिंक्य रहाणेची टेस्ट टीममध्ये एंट्री; अशी आहे भारताची WTC Final टीम..

Best Selling Bike: 72 हजार किंमत, 80.6 मायलेज असणाऱ्या या गाडीचा नवा विक्रम; या आहेत भारतात सर्वाधिक विकल्या गेलेल्या पाच टू-व्हीलर..

Redmi Smartphone: Redmi Note 12 वर आतापर्यंतचा सर्वात मोठा सेल; या वेबसाईटवरून आजच करा ऑनलाइन ऑर्डर..

Bank of Baroda Recruitment 2023: बँक ऑफ बडोदामध्ये मेगा भरती; या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.