Bank of Baroda Recruitment 2023: बँक ऑफ बडोदामध्ये मेगा भरती; या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी..

0

Bank of Baroda Recruitment 2023: बँकेत नोकर भरतीची तयारी करत असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांसाठी मेगा भरती निघाली असून, यासंदर्भात अधिसूचना जारी केली गेली आहे. तुम्ही बँकेमध्ये नोकरी करू इच्छित असाल, आणि पात्र असाल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. 11 मे 2023 पर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. जाणून घेऊया, या भरती प्रक्रिया संदर्भात सविस्तर.

कोणत्या पदासाठी किती जागा?

बँक ऑफ बडोदामध्ये निघालेल्या या भरतीसाठी एकूण 220 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये “झोनल सेल्स मॅनेजर” या पदासाठी एकूण 11 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. “रीजनल सेल्स मॅनेजर” या पदासाठी एकूण 9 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. “असिस्टंट वाइस प्रेसिडेंट” या पदासाठी एकूण 50 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. “सिनियर मॅनेजर” या पदासाठी 110 जागा भरण्यात येणार आहेत. “मॅनेजर” या पदासाठी एकूण 40 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

पदानुसार शैक्षणिक पात्रता?

झोनल सेल्स मॅनेजर” या पदासाठी उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सोबतच बारा वर्षाचा अनुभव देखील आवश्यक असल्याचं अधिसूचनेत नमूद करण्यात आलं आहे. “रीजनल सेल्स मॅनेजर” या पदासाठी उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा, सोबतच 8 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.

असिस्टंट वाइस प्रेसिडेंट” या पदासाठी उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा. सोबतच आठ वर्षाचा अनुभव देखील असणे आवश्यक आहे. “सिनियर मॅनेजर” यापदासाठी उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. सोबतच पाच वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. “मॅनेजर” या पदासाठी उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि दोन वर्षाचा अनुभव आवश्यक.

वयोमर्यादा आणि परीक्षा फी

बँक ऑफ बडोदामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय हे एक एप्रिल 2023 पर्यंत 22 ते 48 वर्षापर्यंत असायला हवे. यामध्ये ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना तीन वर्ष अतिरिक्त सूट दिली जाणार आहे. तर एससी/एसटी उमेदवारांसाठी पाच वर्ष अतिरिक्त सूट मिळणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 600 रुपये परीक्षा फी आकारली जाईल. मात्र एससी/एसटी आणि पीडब्ल्यूडी तसेच महिला उमेदवारांसाठी शंभर रुपये शुल्क आकारले जाईल.

निवड प्रक्रिया

बँक ऑफ बडोदामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या निवडीविषयी बोलायचं झालं तर, निवड प्रक्रिया वैयक्तिक मुलाखतीच्या आधारावर केली जाणार आहे. त्यामध्ये लहान सूची लावण्यात येईल. निवड प्रक्रियेचे निकष त्याचबरोबर निवडीची पद्धत याविषयीचे सगळे अधिकार बँकेकडे असणार आहेत. उमेदवारांची निवड ही पदवी गुणवत्तेच्या आधारे, त्याचबरोबर कामाचा अनुभव या सगळ्या गोष्टींचा विचार करून निवड केली जाणार आहे.

अर्ज पद्धत आणि नोकरीचे ठिकाण

निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारांना संपूर्ण भारतामध्ये नोकरी करावी लागणार आहे. उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे 2023 निश्चित करण्यात आली आहे. बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीकरिता अर्ज करण्यासाठी https://www.bankofbaroda.in/ या लिंकचा आधार घ्यावा लागेल. डायरेक्ट अर्ज करण्यासाठी यावर क्लिक करा. जाहिरात पाहण्यासाठी यावर क्लिक करा

हे देखील वाचा Sports shoes offer: ब्रँडेड कंपनीचे स्पोर्ट्स शूज 300 रुपयांत खरेदी करण्याची सुवर्ण संधी; जाणून सविस्तर..

Jio Recharge Plan: ग्राहकांची चांदी! जिओने सुरू केला 388 दिवसांचा हा दमदार रिचार्ज प्लॅन..

Walk Benefits: निरोगी हृदयासाठी दिवसभरात किती चालावे? जाणून घ्या चालण्याची योग्य पद्धत आणि फायदे..

Chanakya Niti: जीवनात या दोन गोष्टी नेहमी गुप्त ठेवा, अन्यथा याल रस्त्यावर..

 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.