Jio Recharge Plan: ग्राहकांची चांदी! जिओने सुरू केला 388 दिवसांचा हा दमदार रिचार्ज प्लॅन..

0

Jio Recharge Plan: टेलिकॉम (telicom) क्षेत्रात पाऊल ठेवल्यानंतर जिओने (Jio) अनेक टेलिकॉम कंपन्यांचा बाजार उठवला. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Jio ने पहिल्या वर्षी मोफत इंटरनेट डाटा आणि कॉलिंगची सुविधा ग्राहकांना प्रोव्हाइड केली. एका वर्षानंतर जिओने आपले रिचार्ज प्लान सादर केले. मात्र अनेक कंपनीच्या तुलनेत हे रिचार्ज प्लॅन स्वस्त असल्याने, ग्राहक जिओ नेटवर्कशी कनेक्ट राहिला. आता पुन्हा एकदा जिओने तब्बल 388 दिवसांचा मेगा प्लॅन ग्राहकांच्या भेटीला आणला आहे.

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जिओ नेहमी नवनवीन प्लॅन बाजारामध्ये उतरवत असते. इतर टेलिकॉम कंपनीच्या तुलनेत जिओचे रिचार्ज प्लॅन स्वस्त असल्याने, अजूनही जिओशी ग्राहक कनेक्ट झालेला पाहायला मिळतो. असं असलं तरी आता अनेकांना जिओचे दरमहा रिचार्ज प्लॅन परवडत नसल्याचे चित्र आहे. ग्राहकांना एका महिन्यासाठी जवळपास तीनशे रुपये मोजावे लागत असल्याने, अनेकांना जियोचा हा प्लॅन परवड नाही. याला पर्याय म्हणून, आता जिओने तब्बत 388 दिवसाचा मेगा प्लॅन बाजारात उतरवला आहे.

जियोच्या 388 दिवसांच्या मेगा प्लॅनमध्ये ग्राहकांना अनेक ऑफर देण्यात आल्या आहेत. जर तुम्ही ओटीपी प्लॅटफॉर्मचे युजर्स असाल, तर हा प्लॅन तुमचे हजारो रुपये वाचवणार आहे. शिवाय दरमहा इतर प्लॅनच्या तुलनेत हा प्लॅन देखील तुमचे हजोरो रुपये वाचवणार आहे. जिओच्या प्लॅनमुळे तुम्हाला दरमहा रिचार्ज करण्याचे कोणतेही टेन्शन असणार नाही. जिओचा या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला तब्बल 2.5 जीबी डाटा देण्यात येतो. जाणून घेऊया या प्लॅन विषयी सविस्तर.

जिओनी लॉन्च केलेल्या 388 दिवसांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला 75 जीबी अतिरिक्त डाटा अगदी मोफत मिळणार आहे. जिओकडून सादर करण्यात आलेल्या या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला 2999 रुपयांमध्ये 388 दिवसांची वैधता मिळते. म्हणजेच एका वर्षाहून अधिक काळ तुम्हाला या रिचार्ज प्लॅनची वैधता मिळते. या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग आणि प्रतीदिवस 2.5 जीबी इंटरनेट डाटा मिळतो.

जर तुम्ही ओटीपी प्लॅटफॉर्मचे युजर्स असाल, तर हा प्लॅन तुमच्यासाठी मोठी पर्वणी ठरतो. या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, त्याचबरोबर जिओ सिक्युरिटी, जिओ मोबाईल ॲप्लिकेशन या सगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रीप्शन मोफत मिळते. रिलायन्स इंडस्ट्रीज व्यवसायिक अध्यक्षांनी घोषणा करताना, म्हंटले आहे, येणाऱ्या दिवसांमध्ये शंभरहून अधिक चित्रपट आणि मालिका जिओ सिनेमा या ओटीटीवर जोडण्याचा आमचा मानस आहे.

हे देखील वाचा Walk Benefits: निरोगी हृदयासाठी दिवसभरात किती चालावे? जाणून घ्या चालण्याची योग्य पद्धत आणि फायदे..

Jiocinema: अंबानींचा ग्राहकांना दणका! फ्री नंतर आता Jio Cinema पाहण्यासाठी मोजावे लागणार पैसे..

Chanakya Niti: जीवनात या दोन गोष्टी नेहमी गुप्त ठेवा, अन्यथा याल रस्त्यावर..

Sonalika tiger Electric tractor: जबरदस्त वैशिष्ट्यांसह सोनालिकाने लॉन्च केला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर; किंमत फक्त इतकी..

Relationship Tips: कमी वेळेत पार्टनरला संतुष्ट करायचंय? जाणून घ्या संबंधाचा हा फंडा..

Railway Recruitment 2023: दहावी आणि ITI झालाय? मग रेल्वेमध्ये मिळवा नोकरी; जाणून घ्या डिटेल्स..

PAN Card: पॅन कार्ड हरवलंय? सोडून द्या चिंता! घरबसल्या असा करा ऑनलाईन अर्ज मिळून जाईल पॅन कार्ड..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.