Railway Recruitment 2023: दहावी आणि ITI झालाय? मग रेल्वेमध्ये मिळवा नोकरी; जाणून घ्या डिटेल्स..
Railway Recruitment 2023: देशात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात असली तरी आता काही विभागांमध्ये नोकर भरती देखील केली जात आहे. जर तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल, तर भारतीय रेल्वेने भरती संदर्भात अधिसूचना जारी केली आहे. उत्तर पश्चिम रेल्वे अंतर्गत (NWR) ग्रुप सीमध्ये कर्मचाऱ्यांसाठी “असिस्टंट लोगो” त्याचबरोबर “पायलट” या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या संदर्भातली नोटिफिकेशन देखील जारी झाली आहे. जाणून घेऊया सविस्तर (Railway Recruitment 2023)
या भरती प्रक्रियेसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ८मे पर्यंत अर्ज करता येणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी एकूण 238 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केल्यानंतर, उमेदवारांची निवड सामान्य विभागीय स्पर्धा परीक्षा (GDCE) मार्फत होणार आहे. या भरती प्रक्रिया संदर्भात जाणून घ्या अधिक माहिती सविस्तर. Railway Recruitment 2023:
शैक्षणिक पात्रता
या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची पात्रता जाणून घ्यायची झाल्यास, उमेदवार हा कोणत्याही मान्यता प्राप्त शिक्षण मंडळातून दहावी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. सोबतच उमेदवार, फिटर इलेक्ट्रिशन मिल राईट, मॅकेनिक (मोटर वाहन) इंस्ट्रूमेंट मॅकेनिक (रेडिओ आणि टीव्ही) वायरमॅन, इलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिक, मॅच्योर, ट्रॅक्टर मॅकेनिक, मॅकेनिक (डिझेल) कॉइल वाइन्डर, यामध्ये आईटीआई केलेला असणे आवश्यक आहे. सोबतच ऑटोमोबाइल इंजीनिअरिंग/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकलमध्ये डिप्लोमा करणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
भारतीय रेल्वेमध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांची वयोमर्यादा ठरवून दिली आहे. यामध्ये सर्वसाधारण उमेदवारांना 42 वर्षाची वयोमर्यात असणार आहे. ओबीसी उमेदवारांसाठी 45, तर एससी/एसटी उमेदवारांसाठी 47 वर्षाची वयोमर्यादा असणार आहे.
निवड प्रक्रिया
अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड संगणक आधारित चाचणीवर होणार आहे यामध्ये लेखी चाचणी प्रथम, त्याचबरोबर अभियोग्यता चाचणी, दस्तऐवज पडताळणी चाचणी, आणि अखेर वैद्यकीय चाचणी या चार प्रकारांचा समावेश आहे. आता आपण या भरती प्रक्रिया संदर्भाततील अर्जा विषयी जाऊन घेऊ.
असा करा अर्ज
भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी खालील लिंकचा वापर करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये क्रोमवर जाऊन http://www.rrcjaipur.in/ असं सर्च करा. त्यानंतर तुमच्या समोर या विभागाचे अधिकृत वेबसाईट ओपन होईल. नंतर तुम्ही सविस्तर अर्ज करू शकता. भरती प्रक्रिये संदर्भातील जाहिरात पाहण्यासाठी यावर क्लिक करा.अर्ज शुल्क: रेल्वे भरतीसाठी अर्ज करणाऱ्या कोणत्याच उमेदवाराला कसल्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.
हे देखील वाचा NABARD Recruitment 2022: नाबार्डमध्ये निघालीय बंपर भरती; पदवीधरांसाठी आहे सुवर्णसंधी..
Business Idea: एकदाच गुंतवणूक करून वर्षाला कमवा लाखो रुपये; जाणून घ्या या जबरदस्त व्यवसाय विषयी..
PM Kusum Yojana: सौर पंपासाठी सरकार देतंय 90 टक्के अनुदान; लगेच करा अर्ज..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.