PM Kusum Yojana: सौर पंपासाठी सरकार देतंय 90 टक्के अनुदान; लगेच करा अर्ज..

0

PM Kusum Yojana: देशातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवावे यासाठी सरकार शेतकरी हिताच्या अनेक योजना राबवत असते. (Agriculture scheme) मात्र अनेक शेतकऱ्यांना या योजनेविषयी (farmer Yojana) माहिती नसल्याने या योजनांपासून शेतकरी वंचित राहतो. अशीच एक योजना आहे, ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्याचे आर्थिक जीवनमान सुधारणार आहे. पीएम कुसुम योजना (PM Kusum Yojana) असं या योजनेचे नाव असून, शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत सरकार कडून तब्बल 90 टक्के अनुदान दिले जात आहे.

शेतीसाठी पाणी खूप आवश्यक आहे. पाण्याशिवाय शेती करता येणे शक्य नाही. पाणी असून देखील वेळेवर वीज नसल्याने पिकं जळून जातात. हे वेगळे सांगण्याची गरज नाही. शिवाय भरमसाठ वीज बिल येत असल्याने शेतकऱ्यांना वेळेत वीज बिल भरणे देखील शक्य नसते. साहजिकच थकित वीज बिलामुळे शेतकऱ्याची वीज कापली जाते. आणि मग उभे पिक डोळ्यादेखत जळून जातं. ही समस्या अलीकडे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते.

शेतीला पाणी द्यायचं, म्हटल्यावर विजेची आवश्यकता असते. वीज पंपाच्या साह्याने शेतकरी आपल्या पिकाला पाणी देत असतो. कंपन्यांनी युनिटचे दर देखील मोठ्या प्रमाणात वाढवले, असल्याने शेतकऱ्यांना विजेच्या माध्यमातून आपल्या पिकाला पाणी देणे आता खर्चिक झालं आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर केंद्र सरकारची पीएम कुसुम योजना ही शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची आणि ऐतिहासिक योजना आहे. जाणून घेऊया या योजनेविषयी सविस्तर

या योजनेअंतर्गत केंद्र सरकार सौरऊर्जा प्रकल्प शेतकऱ्यांच्या शेतात राबवते. सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सोलर पंप बसवून आपल्या पिकाला पाणी देता येते. शेतकऱ्यांच्या शेतात सौर पॅनल बसवण्यासाठी शेतकऱ्यांना सरकारकडून तब्बल 90 टक्के अनुदान दिले जाते. (Solar Pump Yojana Subsidy) या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत लाखो शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सौर पंप बसवून आपले उत्पन्न वाढवले आहे.

पीएम कुसुम योजना ही केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने 2019 मध्ये सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत राज्य सरकार 30 टक्के, केंद्र सरकार 30 टक्के, आणि उर्वरित 30 टक्के वित्तीय संस्थांद्वारे शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. सौर प्रकल्पाच्या एकूण दहा टक्के रक्कम भरून शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो. एकदा हा सौर पंप प्रकल्प आपल्या शेतात बसल्यानंतर पिकाला पाणी देण्यासाठी कोणत्याही प्रकारचा वीज खर्च शेतकऱ्यांनी लागत नाही. साहजिक यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च कमी येतो, आणि उत्पन्नात वाढ होते.

असा करा अर्ज

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन https://www.india.gov.in/ असं सर्च करा. त्यानंतर तुमच्यासमोर या विभागाची अधिकृत वेबसाईट ओपन होईल. या वेबसाईटवर गेल्यानंतर, तुम्हाला लगेच ऑनलाईन नोंदणी फॉर्म भरायचा आहे.

ऑनलाइन नोंदणी फॉर्म भरल्यानंतर, सविस्तर माहिती तुम्ही द्यायची आहे. यामध्ये आधार कार्ड, जमिनीची कागदपत्रे, म्हणजे सातबारा उतारा, सोबतच एक घोषणापत्र, आणि बँक खात्याचा तपशील इत्यादी कागदपत्रे तुम्हाला द्यावी लागणार आहेत. अधिक माहितीसाठी तुम्ही जवळच्या पंचायत समितीला किंवा जिल्हा परिषदला भेट देऊ शकता.

हे देखील वाचाIPL 2023: ईशान किशन बाद झाल्यानंतर सुहाना खानने हासडली ती घाणेरडी शिवी; पाहा व्हिडिओ..

RR vs GT: हार्दिक पांड्याने पुन्हा दाखवला माज, संजूशी असा भिडला; पाहा व्हिडिओ..

Animal Viral Video: खोल विहिरीतून मांजरीला बाहेर काढण्यासाठी माकडाची धडपड पाहून येतील अश्रू; पाहा हृदयस्पर्शी व्हिडिओ..

Ajit Pawar: ब्रेकिंग न्यूज! त्याचमुळे अजित पवारांनी आज अचानक रद्द केले सर्व कार्यक्रम; राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ..

Ration Card: रेशन कार्ड धारकांच्या खात्यावर येऊ लागले पैसे; तुम्हीही घेऊ शकता लाभ, असा करा अर्ज..

PM Kisan Yojana: या दिवशी येणार 14 वा हप्ता, पण त्याआधी करावं लागणार हे काम; तुम्हाला १४वा हप्ता मिळणार का? जाणून घ्या या पद्धतीने..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.