Ration Card: रेशन कार्ड धारकांच्या खात्यावर येऊ लागले पैसे; तुम्हीही घेऊ शकता लाभ, असा करा अर्ज..

0

Ration Card: रेशन कार्ड (Ration Card) हे सर्वसामान्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. रेशनकार्डच्या माध्यमातून सरकारच्या अनेक योजनांचा (government scheme) लाभ सर्वसामान्यांना घेता येतो. रेशनच्या माध्यमातून स्वस्त धान्य देखील नागरिकांना दिले जाते. मात्र आता सरकारने धान्याऐवजी लाभार्थ्यांना दरमहा प्रति व्यक्ती दीडशे रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक लाभार्थ्यांना लाभ देखील मिळू लागला आहे. मात्र अजूनही, तुम्ही या योजने संदर्भातला अर्ज भरला नसेल, तर त्वरित भरा. काय आहे ही योजना? या योजनेचा लाभ घेण्यासाठी कसा अर्ज करायचा? जाणून घेऊया सविस्तर. (Ration card benefits)

राज्यातील मराठवाडा-विदर्भामधील १४ आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शिधापत्रकाधारकांना आता धान्याऐवजी पैसे देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. केसरी रेशन कार्ड धारकांना यापूर्वी गहू दोन रुपये किलो तर तांदूळ ३ रुपये किलो या दराने एकूण पाच किलो धान्य देण्यात येत होते. परंतु भारतीय अन्न महामंडळाने या रेशन कार्ड धारकांना धान्य न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरकारने आता केसरी रेशन कार्डधारकांना दर महिन्याला प्रत्येक व्यक्तीसाठी दीडशे रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. लाभार्थ्यांना ही रक्कम थेट बँक अकाउंटवर जमा केली जात आहे.

या लोकांना मिळणार लाभ

मराठवाडा आणि विदर्भ विभागातील (marathvada vidarbha) जे 14 जिल्हे आहेत, अशा जिल्ह्यांसाठीच ही योजना लागू असणार आहे. इतर जिल्ह्यांसाठी ही योजना लागू नसणार आहे. या विभागामध्ये औरंगाबाद, बीड, नांदेड, जालना, परभणी, अकोला, वाशिम, अमरावती, लातूर, हिंगोली, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा इत्यादी जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवर तब्बल महिन्याला 60 कोटींचा भार पडणार आहे.

या 14 जिल्ह्यामधील ज्यांच्याकडे केसरी रेशन कार्ड आहे, मात्र सरकारच्या अन्नसुरक्षा कायद्यामधून धान्य मिळत नव्हते. अशा रेशन कार्डधारकांना 2015 मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारने अन्नसुरक्षा कायद्यामध्ये समाविष्ट केले. आणि दोन रुपये किलो गहू, त्याचबरोबर तीन रुपये किलो तांदूळ यानुसार मानसी पाच किलो धान्य देण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी राज्य सरकार भारतीय अन्न महामंडळाकडून प्रति किलो २२ रुपये दराने गहू आणि २३ रुपये किलो दराने तांदूळ खरेदी करीत होते.

मात्र आता या योजनेसाठी गहू आणि तांदूळ देण्यास भारतीय अन्न महामंडळाने नकार दिला आहे. त्यामुळे या योजनेतील लाभार्थ्यांना आता अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतला. लाभार्थांना आधार क्रमांकानुसार पैसे दिले जाणार आहेत.

केशरी रेशनधारकांना किती पैसे मिळणार?

विदर्भ आणि मराठवाडा विभागातील जे 14 आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत, अशा जिल्ह्यातील रेशन कार्डधारकांना दर महिन्याला दीडशे रुपये प्रति व्यक्ती असा लाभ मिळणार आहे. वार्षिक एक हजार आठशे रुपये प्रति व्यक्ती लाभ मिळणार आहे. जर एका कुटुंबात चार सदस्य असतील, तर 7 हजार 200 रुपये मिळणार आहेत.

पैसे मिळवण्यासाठी असा करा अर्ज? 

सरकारच्या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला या संदर्भातला सविस्तर अर्ज भरावा लागणार आहे. हा संबंधित अर्ज तुम्हाला रेशन दुकानदार किंवा तहसील कार्यालयातून घ्यावा लागणार आहे. संबंधित फॉर्म सविस्तर भरल्यानंतर, तुम्हाला या अर्जासोबत काही कागदपत्रे देखील जोडायची आहेत.

संबधित अर्जासोबत तुम्हाला कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आधारकार्डची झेरॉक्स, त्याचबरोबर रेशन कार्ड झेरॉक्स, कुटुंबातील महिला सदस्यांची बँक पासबुक झेरॉक्स जोडणे आवश्यक आहे. लक्षात असू द्या, बँक पासबुकची झेरॉक्स ही कुटुंबातील महिला सदस्यांची असायला हवी. कारण सरकारने हे पैसे फक्त महिलांच्या बँक अकाऊंटवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित अर्ज तुम्ही रेशन दुकानदाराकडे जमा करायचा आहे. त्यानंतर प्रत्येक महिन्याला तुमच्या अकाउंटवर पैसे यायला सुरुवात होईल.

हे देखील वाचा Aadhar Card Loan: आता आधारकार्ड वरून मिळणार दोन लाख लोन, तेही ऑनलाईन; जाणून घ्या सविस्तर..

Lenovo Laptop| निम्म्या किंमतीत खरेदी करा Lenovo चा दमदार लॅपटॉप; या वेबसाईटवर सुरू आहे बंपर सेल..

Ration Card Update: मोठी अपडेट! या रेशन कार्ड धारकांचे रेशन बंद..

Hero Electric Optima CX: Hero ने लॉन्च केली सर्वात शक्तिशाली इलेक्ट्रिक स्कूटर; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, किंमत फक्त इतकी..

Mini Air Cooler: पाच मिनिटात रूम थंड करतोय हा मिनी कूलर; या वेबसाईटवर मिळतोय फक्त ५०० रुपयांत..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.