Ration Card Update: मोठी अपडेट! या रेशन कार्ड धारकांचे रेशन बंद..
Ration Card Update: देशातील गरीब जनता उपाशी राहू नये, म्हणून रेशन कार्डच्या (ration card) माध्यमातून दर महिन्याला रेशन कार्ड लाभार्थ्यांना स्वस्त धान्य वाटप केलं जातं. कोरोना काळात या योजनेत भर घालताना केंद्र सरकारने (central government) गरीब आणि गरजू (poor and needy) नागरिकांना मानसी पाच किलो धान्य देण्याचा निर्णय घेतला. देशातील लाखो लाभार्थी या योजनेचा लाभ घेतात. आर्थिक दृष्ट्या सक्षम असून देखील अनेक जण या योजनेचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, आता सरकारने या संदर्भात मोठे पाऊल उचलले आहे. (Ration Card new rule)
जर तुम्ही रेशन कार्डधारक असाल, तर सरकारने जारी केलेल्या नियमाविषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. अन्यथा तुमच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. सरकारने या वर्षी देखील रेशन कार्ड लाभार्थ्यांना मोफत रेशन वाटप करण्याचा निर्णय घेतला. सरकारने सुरू ठेवलेल्या या योजनेचा लाभ पात्र नसणारे, लोकही घेत असल्याचं निदर्शनास आलं आहे. आणि म्हणून सरकारने या संदर्भात मोठे पाऊल उचलले आहे.
रेशन कार्डच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी काही अटी आणि नियम घालून दिले आहेत. यासाठी जे कार्डधारक पात्र आहेत, अशांनाच रेशन कार्डच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ घेता येतो. मात्र सध्या जे कार्डधारक या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र आहेत, अशी मंडळी देखील या योजनेचा लाभ घेत आहेत. सरकारने घालून दिलेल्या नियम आणि अटीमध्ये जो रेशन कार्डधारक बसत नाही, अशांनी आपले रेशन कार्ड रद्द करण्याच्या सूचना सरकारने त्वरित दिल्या आहेत.
..तर होणार ही कारवाई
सरकारने घालून दिलेल्या नियम आणि अटीनुसार जे कार्डधारक अपात्र आहेत, अशांनी त्वरित आपले रेशन कार्ड बंद करण्याचा फॉर्म भरून देणे आवश्यक असल्याचे सरकारने म्हटले आहे. जर तुम्ही अपात्र असून, सरकारच्या योजनेचा लाभ घेत असाल, तर तुमच्यावर मोठी दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही सरकारने नमूद केले आहे. सरकारने जारी केलेल्या अधिसूचने नंतरही, जर रेशन कार्डधारकांनी अपात्र असून लाभ घेतला असेल, तर अशा लाभार्थ्यांकडून लाभाची रक्कम वसूल केली जाणार आहे.
हे रेशन कार्ड धारक आहेत अपात्र
जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल, आणि तुम्हीही सरकारच्या योजनांचा लाभ घेत असाल, तर तुम्हाला सरकारच्या नियम आणि अटी विषयी माहिती असायला हवं. सरकारने यासंदर्भात नियमावली जारी करताना म्हटले आहे, ज्या रेशन कार्ड धारकांचे उत्पन्न हे वार्षिक तीन लाख किंवा त्यापेक्षा जास्त असेल, तर अशा रेशन कार्ड धारकांना रेशन घेता येणार नाही.
जर तुम्ही शहरात राहत असाल, तर तुमच्याकडे स्वतःचा शंभर चौरस मीटरचा प्लॉट किंवा घर नसणे आवश्यक आहे. जर असेल, तर तुम्हाला रेशन घेता येणार नाही. सोबतच ज्या रेशन कार्डधारकांकडे चार चाकी गाडी, शस्त्र परवाना, त्याचबरोबर ट्रॅक्टर, इत्यादी सामग्री असेल, तरीदेखील तुम्हाला रेशनचा लाभ घेता येणार नाही. वरील सर्व रेशन कार्डधारकांना सरकारने अपात्र ठरवले असून, जर यापैकी कोणी रेशनचा लाभ घेत असेल, तर त्याने त्वरित अपात्रतेचा अर्ज भरून देणे आवश्यक आहे. अन्यथा त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
Cotton Rate: कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! आणखी वाट पाहाल तर कंगाल व्हाल..
Mini Air Cooler: पाच मिनिटात रूम थंड करतोय हा मिनी कूलर; या वेबसाईटवर मिळतोय फक्त ५०० रुपयांत..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम