My11Circle prediction: My11Circle वर टीम बनवताय? जिंकायचं असेल, तर या पाच गोष्टी विचारात घेऊनच बनवा टीम..

0

My11Circle prediction: सध्या आयपीएलचा रणसंग्राम सुरू आहे. (IPL season 16) प्रत्येक चाहता आपल्या आवडीच्या टीमला सपोर्ट करताना पाहायला मिळत आहे. आयपीएल T20 स्पर्धा कमालीची लोकप्रिय असून, विदेशात देखील मोठ्या उत्साहाने ही स्पर्धा पाहिली जाते. प्रत्येक संघ जिंकण्यासाठी आपापली रणानिती आखून मैदानात उतरतो. आयपीएल स्पर्धेमुळे फक्त क्रिकेटरच मालामाल झाले नाहीत, तर पंचापासून क्युरेटर, समालोचक, विविध स्पॉन्सर, चॅनल्स देखील मालामाल होतात. याशिवाय आता क्रिकेट चाहत्यांना देखील कोट्यावधी रुपयांची बक्षीस जिंकण्याची संधी मिळाली आहे. (My11Circle team selection tips)

ड्रीम इलेव्हन (dream 11) माय इलेव्हन (My11Circle) सर्कल यासारख्या अनेक ॲपच्या माध्यमातून तुम्हाला कोट्यावधी रुपये जिंकण्याची संधी मिळते. प्रत्येक क्रिकेट चाहता माय इलेव्हन सर्कल तसेच ड्रीम 11वर टीम बनवून आपले नशिब अजमावण्याचा प्रयत्न करतो. ज्यांना क्रिकेट समजते, असा प्रत्येक जण या ॲपवर आपली टीम बनवून जिंकण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र या खेळात नशिबापेक्षा अधिक महत्व तुमच्या अभ्यासाला, स्ट्रॅटेजीला देखील आहे. या खेळात अभ्यास आणि स्ट्रॅटेजीचा खूप मोठा रोल आहे.

ड्रीम इलेव्हनच्या तुलनेत माय इलेव्हन सर्कलवर पैसे कमवण्याची अधिक जास्त संधी आहे. पहिल्यांदा आपण हे लक्षात घेणे गरजेचे आहे. याविषयी आपण पुढच्या लेखात पाहू. मात्र आज आपण ड्रीम इलेव्हन सर्कलवर जिंकायचं असेल, तर काय स्ट्रॅटेजी हवी? कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्या, या सगळ्या गोष्टींवर नजर टाकणार आहोत. माय इलेव्हन सर्कलवर जिंकायचं असेल, तर तुम्ही खालील पाच गोष्टींचा अभ्यास करूनच टीम बनवायला हवी.

खेळपट्टी

क्रिकेट विषयी अगदी बारीक सारी गोष्टी समजणारा देखील मोठा वर्ग आपल्याकडे पाहायला मिळतो. माय इलेव्हन सर्कलवर मोठ्या उत्साहाने अनेकजण टीम बनवतात. मात्र काही गोष्टींची गफलत केल्यामुळे यश प्राप्त होत नाही. जर तुम्ही My11Circle वर टीम बनवत असाल, तर सर्वप्रथम तुम्ही खेळपट्टी विषयी अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. ज्या खेळपट्टीवर सामना होणार आहे, ती खेळपट्टी फलंदाज की गोलंदाज? कोणाला साथ देणारी आहे, हे जाणून घेणे गरजेचे आहे.

एखादी खेळपट्टी जर गोलंदाजांना साथ देणारी असेल, तर तुम्हाला तुमच्या टीमचा कॅप्टन आणि उपकर्णधार निवडताना गोलंदाजच निवडायचे आहेत. याशिवाय खेळपट्टी कोणत्या गोलंदाजांना साथ देणारी आहे, हे देखील तुम्ही जाणून घेणे गरजेचे आहे. खेळपट्टी स्पिनर्सना साथ देणारी असेल, तर तुम्ही स्पिनर मधीलच एखादा ऑलराऊंडर, कॅप्टन म्हणून निवडू शकता.

मैदानावर कामगिरी

ज्या मैदानावर सामना होणार आहे, त्या मैदानावर कोणता संघ यापूर्वी उत्कृष्ट खेळला आहे. या संदर्भातले रेकॉर्ड देखील पाहणे आवश्यक आहे. ज्या मैदानावर एखादा संघ चांगली कामगिरी करत असेल, तर त्या संघातील खेळाडूंना तुमच्या टीममध्ये घेणे योग्य आहे. सोबतच त्याच संघातील एखाद्या चांगल्या खेळाडूला तुम्ही कर्णधार म्हणून निवडू शकता. आयपीएलमध्ये अनेकदा तुम्ही पाहिलं असेल, घरच्या मैदानावरच अनेक संघ चांगली कामगिरी करतात. हे देखील लक्षात ठेवा.

खेळाडूंचा रेकॉर्ड

माय इलेव्हन सर्कलवर टीम निवडताना तुम्ही कोणत्या खेळाडूचा रेकॉर्ड कोणत्या संघाविरुद्ध दमदार राहिला आहे, याचाही अभ्यास करा. खेळाडूला एखाद्या संघाविरुद्ध खेळायला आवडत असतं. त्याचा रेकॉर्ड देखील त्या संदर्भात दमदार असतो. अशा वेळी तुम्ही ही गोष्ट अभ्यासूनच टीम बनवायला हवी. उदाहरणार्थ, रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया विरुद्ध जवळपास ६० च्या सरासरीने धावा केल्या आहेत. यासोबतच कोणत्या संघाविरुद्ध कोणता गोलंदाज धोकादायक ठरला आहे, याचा देखील रेकॉर्ड पाहून टीम बनवायला हवी.

धावांचा पाठलाग

माय इलेव्हन सर्कलवर टीम बनवताना धावांचा पाठलाग हा विषय देखील अभ्यासणे आवश्यक आहे. टॉस जिंकल्यानंतर, कोणता संघ धावांचा पाठलाग करणार आहे, यानुसार तुम्ही तुमची टीम निवडायची आहे. उदाहरणार्थ, एखाद्या संघातील अधिक खेळाडू तुम्ही तुमच्या संघात घेतले आहेत. खास करून फलंदाज आहेत. आणि तो संघ धावांचा पाठलाग करणार आहे. मात्र धावांचा पाठलाग करताना तो संघ चांगला खेळ करत नसेल, तर तुम्ही तुमच्या टीममध्ये बदल करायला हवा. जो संघ धावांचा चांगला पाठलाग करत नाही, अशा संघातील अधिक फलंदाज निवडणे योग्य नाही. या गोष्टींचा अभ्यास करून तुम्ही संघ निवडणे गरजेचे आहे.

स्पिनर

अनेकदा आपण पाहतो, फलंदाज किंवा जलदगती गोलंदाजांनाच आपण कर्णधार आणि उपकर्णधार म्हणून निवडतो. मात्र ज्या संघाचे स्पिनर दमदार आहेत. आणि ते एका विशिष्ट संघाविरुद्ध दमदार कामगिरीही करत असतील, किंवा त्यांचा प्रतिस्पर्धी संघ स्पिनर्सला व्यवस्थित खेळत नसेल, तर तुम्ही फिरकीपटूंना देखील तुमचा कर्णधार निवडू शकता. या सगळ्याच अभ्यास करूनच तुम्ही संघ निवड करा.

हे देखील वाचाDream11 Prediction: ड्रीम11 टीम बनवताना या चार गोष्टी विचारात घेतल्या तरच तुम्ही जिंकू शकता एक कोटी..

Salman khan Aishwarya Rai: सलमान ऐश्वर्याचा हाच तो व्हिडिओ, ज्यामुळे अभिषेक घटस्फोटापर्यंत पोहोचला? जाणून घ्या दोघे एकत्र येण्याचे कारण..

Post Office RD: फक्त दहा हजार गुंतवा, मिळेल 16 लाखांचा परतावा; होय ही आहे पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना..

CSK vs RR: या सिझनचे दोन सर्वात तगडे संघ एकमेकांशी भिडणार; जाणून घ्या कोण मारणार बाजी..

OnePlus Nord CE 3 Lite: याठिकाणी सुरू आहे One Plus Nord CE3 या तगड्या स्मार्टफोनचा बंपर सेल; मिळतोय फक्त..

Sukanya Samriddhi Yojana: मुलीच्या नावाने या योजनेत गुंतवा 12 हजार 500 आणि २१ व्या वर्षी मिळवा ६५ लाख; जाणून घ्या सविस्तर..

Marriage Tips: लग्नासाठी मुलगी पाहताय? मुलीमध्ये हे गुण नसतील तर चुकूनही करू नका लग्न; व्हाल उध्वस्त..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.