Salman khan Aishwarya Rai: सलमान ऐश्वर्याचा हाच तो व्हिडिओ, ज्यामुळे अभिषेक घटस्फोटापर्यंत पोहोचला? जाणून घ्या दोघे एकत्र येण्याचे कारण..

0

Salman khan Aishwarya Rai: बॉलीवूड (Bollywood) मधील काही कलाकारांचे खाजगी आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथेला देखील उजवं पडेल, असं राहिलं आहे. सलमान खान हा त्यापैकीच एक आहे. एकेकाळी ऐश्वर्या राय आणि सलमान खान (Aishwarya Rai Salman Khan affair) या दोघांच्या अफेअरची संपूर्ण बॉलीवूडमध्ये चर्चा असायची. 2000 ते 2002 या दोन वर्षात हे दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. दोन वर्षात या दोघांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. या दोघांच्या नात्यात दुरावा येण्याचे कारण म्हणजे विवेक ओबेरॉयची ऐश्वर्या राय सोबत वाढलेली जवळीकता. ( Salman Khan Aishwarya Rai video)

ऐश्वर्या रायच्या सांगण्यावरून त्याकाळी विवेक ओबेरॉयने (Vivek Oberoi) सलमान खान विरोधात एक पत्रकार परिषदेत घेत सलमान खानवर अनेक खालच्या पातळीचे वैयक्तिक आरोप केले होते. तेव्हापासून सलमान खान ऐश्वर्या राय या दोघाच्या नात्यात कमालीची कटूता आली. एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात दोघांची उपस्थिती असली तरी देखील दोघेही एकमेकांचे तोंडही पाहत नाही. अशी परिस्थिती होती. मात्र आता या दोघांचा एका पार्टीतला व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सलमान खान सोबत ब्रेकअप झाल्यानंतर, ऐश्वर्या रायने (Aishwarya Rai) २००७ मध्ये अभिषेक बच्चन सोबत लग्न केले. सलमान मात्र अजूनही अविवाहितच आहे. यापूर्वी या दोघांनी एका कार्यक्रमात हस्तोदंलन केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता पुन्हा एकदा या दोघांचा एकत्रित व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या (Neeta Mukesh Ambani cultural centre) उद्घाटन प्रसंगी हे दोघेही एकत्र आले असल्याचा दावा करण्यात आला आहे.

ऐश्वर्या राय आणि सलमान खान या दोघांनीही नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी हजेरी लावली होती. दोघांनीही वेगवेगळ्या वेळी हजेरी लावली होती. दोघांची या उद्घाटन कार्यक्रमात समोरासमोर भेट झाली नाही. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत ऐश्वर्या राय आणि सलमान खान दोघेही पोज देताना पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे, या व्हिडिओत दोघेही हसत एकमेकांशी गप्पा मारताना दाखवण्यात आले आहे. एवढेच नाही, तर सलमानचा कोट ऐश्वर्या स्वतःच्या हाताने व्यवस्थित करत असल्याचे दाखवण्यात आले आहे.

सलमान खान आणि ऐश्वर्या राय या दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, एकच खळबळ उडाली. अनेकांना या व्हिडिओवर विश्वास बसत नसल्याचं दिसून आलं. दोघांनी एकत्र पोझ देणे म्हणजे, धरती आणि आकाश एकत्र आल्याचा असा प्रकार आहे. असा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटू लागल्या. एवढेच नाही, तर सोशल मीडियावर या व्हिडिओमुळे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय या दोघांमध्ये बिनसल असून, अभिषेक बच्चन घटस्फोट घेण्याच्या तयारीत असल्याचंही बोललं गेलं.

मुकेश अंबानी यांच्या पत्नी निता अंबानी यांच्या कल्चरल सेंटर उद्घाटन प्रसंगातील हा व्हिडिओ कट करून एकत्रित जोडण्यात आला आहे. ऐश्वर्या राय आणि सलमान खान या दोघांचाही वेगवेगळ्या व्हिडिओ एकत्र करून जबरदस्त एडिट केलं आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला देखील हा व्हिडिओ एडिट केला आहे, अशी बिलकुलही शंका येणार नाही.

आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, या व्हिडिओ खाली अभिषेक बच्चन घटस्फोट घेणार अशा मजेशीर कमेंट नेटकऱ्यांनी सुरू केल्या. याचाच आधार घेऊन, अनेक माध्यमांनी सलमान खान ऐश्वर्या राय एकत्र आल्याने, अभिषेक घटस्फोट घेणार अशा बातम्या प्रसारित केल्या.

हे देखील वाचा OnePlus Nord CE 3 Lite: याठिकाणी सुरू आहे One Plus Nord CE3 या तगड्या स्मार्टफोनचा बंपर सेल; मिळतोय फक्त..

Sukanya Samriddhi Yojana: मुलीच्या नावाने या योजनेत गुंतवा 12 हजार 500 आणि २१ व्या वर्षी मिळवा ६५ लाख; जाणून घ्या सविस्तर..

Marriage Tips: लग्नासाठी मुलगी पाहताय? मुलीमध्ये हे गुण नसतील तर चुकूनही करू नका लग्न; व्हाल उध्वस्त..

RCB vs LSG: ..म्हणून सामना जिंकल्यानंतर गौतम गंभीरने दिल्या शिव्या, विराट सोबतही केले पाहा दोन्हीं व्हिडिओ..

Dream11 Prediction: ड्रीम11 टीम बनवताना या चार गोष्टी विचारात घेतल्या तरच तुम्ही जिंकू शकता एक कोटी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.