Hero Electric Optima CX: Hero ने लॉन्च केली सर्वात शक्तिशाली इलेक्ट्रिक स्कूटर; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, किंमत फक्त इतकी..

0

Hero Electric Optima CX: महागाई बरोबर इंधनाचे (fuel price) दर देखील दिवसेंदिवस वाढत चालले असल्याने, आता इंधनावर गाड्या फिरवणे परवडत नाही. हे वेगळं सांगण्याची गरज नाही. साहजिकच यामुळे आता अनेक जण इलेक्ट्रिक वाहनांकडे (electric vehicle) वळला आहे. अनेक बड्या कंपन्या देखील आता ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन आपले दर्जेदार प्रोडक्ट बाजारात उतरवत आहेत. भारतातील सर्वात लोकप्रिय टू व्हीलर कंपनी हिरोने (Hero two wheeler motor company) आता आपली इलेक्ट्रिक स्कूटर (hero electric scooter) मार्केटमध्ये लॉन्च केली आहे.

हिरो कंपनीने लॉन्च केलेल्या Hero Electric Optima CX इलेक्ट्रिक स्कूटरची (electric scooter) चर्चा जोरदार रंगली आहे. याचे कारण म्हणजे, या स्कुटीचा जबरदस्त लूक आणि किंमत देखील कमी असल्याने ही गाडी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची अक्षरशः झुंबड उडाली आहे. हिरोच्या या इलेक्ट्रिक स्कूटरचे विक्रमी बुकिंग झाले असल्याची माहिती आहे. जाणून घेऊया सविस्तर.

हिरो मोटार कंपनीने मार्केटमध्ये उतरवलेली ही इलेक्ट्रिक स्कूटर पूर्णतः सर्वसामान्यांसाठी बनवलेली आहे. कंपनीने ग्राहकांच्या सर्व आवश्यक गरजांची पूर्तता केली आहे. ज्या ग्राहकांना एकाच वेळी पैसे पेड करून, ही इलेक्ट्रिक स्कूटर घेता येणार नाही, अशांसाठी फायनान्स प्लॅन देखील उपलब्ध केले आहेत. कंपनीने आपल्या या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये शक्तिशाली बॅटरी प्रोव्हाइड केली आहे. सोबतच आधुनिक फीचर्सची देखील जोड दिली आहे.

जबरदस्त रेंज

हिरो मोटार कंपनीने मार्केटमध्ये उतरवलेल्या या इलेक्ट्रिक स्कूटरच नाव Hero Electric Optima CX असं आहे. कंपनीने जबरदस्त बॅटरी प्रोव्हाइड केली आहे. एका चार्जला तब्बल 140 किलोमीटर पर्यंत ही इलेक्ट्रिक स्कूटर धावणार असल्याचा कंपनीने दावा केला आहे. बॅटरी विषयी अधिक जाऊन घ्यायचे झाल्यास, या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये तब्बल 3kWh बॅटरी मिळणार आहे. सोबतच कंपनी BLDC तंत्रज्ञानावर आधारित 1900W ची इलेक्ट्रिक मोटर देखील जोडली आहे.

टॉप स्पीड आणि वैशिष्ट्ये

Hero Electric Optima CX ही इलेक्ट्रिक स्कूटर एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल 140 किलोमीटर तर प्रवास करतेच, मात्र ताशी 55 किलोमीटर इतका स्पीड देखील असल्याने ग्राहकांच्या कमालीचा पसंतीस उतरली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरच्या वैशिष्ट्यांविषयी अधिक सांगायचं झालं, तर कंपनीने ड्राईव्ह लॉक मोड दिला आहे. एवढेच नाही तर, साइड स्टँड सेन्सर देखील देण्यात आला आहे.

Hero Electric Optima CX या इलेक्ट्रिक स्कूटरला कंपनीने रिव्हर्स रोल संरक्षण देखील दिले आहे. बॅटरी संपत आल्यानंतर, तुम्हाला इंडिकेशन देण्यासाठी बॅटरी अलार्म देखील आहे. तसेच डिजिटल ओडोमीटर, डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल ट्रिप मीटर, एलईडी टेल लॅम्प यासह खूप साऱ्या आधुनिक वैशिष्ट्यासह तुम्हाला ही इलेक्ट्रिक स्कूटर मिळते.

किंमत/ हप्त्यावर खरेदी करता येणार

बाजारात अनेक इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध आहेत. मात्र या गाड्यांच्या किंमती खूप जास्त असल्याने, सर्वसामान्यांना परवडत नाहीत. मात्र हिरो कंपनीने बाजारात उतरवलेल्या या स्कूटरची किंमत सर्वसामान्यांना परवडणारी आहे. या गाडीची किंमत फक्त एक लाख वीस हजार रुपये ठेवण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे, तुम्ही ही रक्कम एकाच वेळी देऊ शकत नसाल तर हप्त्याची सुविधा देखील कंपनीने उपलब्ध केली आहे.

हे देखील वाचा Mini Air Cooler: पाच मिनिटात रूम थंड करतोय हा मिनी कूलर; या वेबसाईटवर मिळतोय फक्त ५०० रुपयांत..

Cotton Rate: कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! आणखी वाट पाहाल तर कंगाल व्हाल..

Yantra India Limited Recruitment 2023: 10+ITI झालाय? लगेच असा करा अर्ज! तब्बल 5395 जागांची निघालीय मेगा भरती..

PM Kisan Yojana: या दिवशी येणार 14 वा हप्ता, पण त्याआधी करावं लागणार हे काम; तुम्हाला १४वा हप्ता मिळणार का? जाणून घ्या या पद्धतीने..

OnePlus Nord CE 3 Lite: याठिकाणी सुरू आहे One Plus Nord CE3 या तगड्या स्मार्टफोनचा बंपर सेल; मिळतोय फक्त..

Sukanya Samriddhi Yojana: मुलीच्या नावाने या योजनेत गुंतवा 12 हजार 500 आणि २१ व्या वर्षी मिळवा ६५ लाख; जाणून घ्या सविस्तर..

Dream11 Prediction: ड्रीम11 टीम बनवताना या चार गोष्टी विचारात घेतल्या तरच तुम्ही जिंकू शकता एक कोटी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.