PM Kisan Yojana:’या’ दिवशी येणार 14 वा हप्ता, पण त्याआधी करावं लागणार हे काम; तुम्हाला १४वा हप्ता मिळणार का? जाणून घ्या या पद्धतीने..

0

PM Kisan Yojana: देशातील गरीब शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी, यासाठी केंद्र सरकारने (central government) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana Update) सुरू केली. देशातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक अकाऊंटमध्ये आतापर्यंत एकूण तेरा हप्ते ट्रान्सफर करण्यात आले आहेत. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देण्यात येतात. दर चार महिन्यांनी तीन हप्त्यांमध्ये हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केले जातात. या योजनेचा लाभार्थी शेतकरी आता चौदाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे. जाणून घेऊया सविस्तर.

या योजनेमध्ये होणारा भ्रष्टाचार टाळण्यासाठी केंद्र सरकारने पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना e kyc करणं बंधनकारक करण्यात आलं. यापूर्वी एकाच कुटुंबातील दोन किंवा त्याहून अधिक सदस्य लाभ घेत असल्याचे निदर्शनास आलं होतं. केंद्र सरकारच्या धोरणामुळे एकाच कुटुंबातील अनेक सदस्य लाभ घेत होते, त्यांना आळा बसला. मात्र याबरोबरच जे पात्र लाभार्थी आहेत, ते देखील या धोरणामुळे वंचित राहिल्याचे पाहायला मिळतं. जर तुम्ही देखील पात्र असाल आणि अद्यापही केवायसी केली नसेल तर सोप्या पद्धतीने तुम्हाला इतिहास करता येणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी जर तुम्ही पात्र असाल, तर तुम्हालाही eKYC करता येणार आहे. सोबतच ई-केवायसी पूर्ण आहे की नाही, हे तुम्हाला माहिती नसेल, तरीदेखील तुमच्या खात्याची स्थिती तुम्हाला तपासता येणार आहे. आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. सोबत पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर कधीपर्यंत ट्रान्सफर होईल, हे देखील जाणून घेणार आहोत.

तुम्हाला मिळणार का चौदावा हप्ता? जाणून या सोप्या पद्धतीने

जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल, आणि तुम्हाला ई-केवायसी केली आहे की नाही, याची माहिती नसेल. तर तुम्ही तुमच्या खात्याची स्थिती तपासू शकता. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन https://pmkisan.gov.in/ असं सर्च करायचं आहे.

त्यानंतर पीएम किसान योजनेची अधिकृत वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल. त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर, तुम्हाला “FARMERS CORNER” पेजवर “beneficiary status” वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर एक चार्ट ओपन होईल, त्यावर तुम्हाला तुमचा दहा अंकी मोबाईल क्रमांक टाकायचा आहे.

त्यानंतर तुम्हाला खाली कॅपच्या कोड नंबर दिलेला असेल, तो नंबर तुम्हाला बरोबर त्याच्या रकान्यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला get वर क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला तुमच्या स्क्रीन समोर, तुमच्या खात्याची स्थिती पाहायला मिळेल. ई-केवायसी, पात्रता, लँड साइडिंग ते तीन पर्याय तुम्हाला पाहायला मिळतील. या तीन पर्यायाच्या समोर yes असं लिहिलं असेल, तर तुम्ही चौदाव्या हप्त्यासाठी पात्र आहात, असा त्याचा अर्थ होतो.

आता आपण e kyc कशी करायची? हेही पाहू

जर तुम्हाला चौदावा हप्ता कधीपर्यंत येईल? हे माहीत नसेल, तर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चौदावा हप्ता जमा होणार आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे जर मे महिन्यात जमा झाला नाही, तर जूनच्या पहिल्या आठवड्यात लाभार्थी शेतकऱ्यांच्या अकाउंटवर 14 वा हफ्ता ट्रान्सफर करण्यात येईल.

जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल आणि ई-केवायसी केली नसल्याने, तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येत नसेल, तर तुम्ही तुमच्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन https://pmkisan.gov.in/ असं सर्च करायचं आहे. त्यानंतर अधिकृत वेबसाईट ओपन होईल. त्यानंतर “फार्मर कॉर्नर” या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर तुमच्या समोर आणखी एक नवीन पेज ओपन होईल. या पेजवर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे. आधार क्रमांक टाकल्यानंतर, तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल. हा OTP समोरील रकान्यात प्रविष्ट केल्यानंतर, तुमची e kyc प्रोसेस पूर्ण होते.

हे देखील वाचा Cotton Rate: कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! आणखी वाट पाहाल तर कंगाल व्हाल..

Dream11 Prediction: ड्रीम11 टीम बनवताना या चार गोष्टी विचारात घेतल्या तरच तुम्ही जिंकू शकता एक कोटी..

My11Circle prediction: My11Circle वर टीम बनवताय? जिंकायचं असेल, तर या पाच गोष्टी विचारात घेऊनच बनवा टीम..

CSK vs RR: या सिझनचे दोन सर्वात तगडे संघ एकमेकांशी भिडणार; जाणून घ्या कोण मारणार बाजी..

Sukanya Samriddhi Yojana: मुलीच्या नावाने या योजनेत गुंतवा 12 हजार 500 आणि २१ व्या वर्षी मिळवा ६५ लाख; जाणून घ्या सविस्तर..

Salman khan Aishwarya Rai: सलमान ऐश्वर्याचा हाच तो व्हिडिओ, ज्यामुळे अभिषेक घटस्फोटापर्यंत पोहोचला? जाणून घ्या दोघे एकत्र येण्याचे कारण..

OnePlus Nord CE 3 Lite: याठिकाणी सुरू आहे One Plus Nord CE3 या तगड्या स्मार्टफोनचा बंपर सेल; मिळतोय फक्त..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.