IPL 2023: ईशान किशन बाद झाल्यानंतर सुहाना खानने हासडली ती घाणेरडी शिवी; पाहा व्हिडिओ..

0

IPL 2023: काल आयपीएल सीझन 16 चा 22वा सामना (IPL season16 22nd match) वानखेडे क्रिकेट मैदानावर (wankhede cricket ground Mumbai) मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये (KKR vs MI) पार पडला. काल रविवारी दुपारी झालेल्या सामन्यात कोलकत्ता नाईट रायडर्स संघाला चारी मुंड्या चीत करत या स्पर्धेतला सलग दुसरा सामना मुंबई इंडियन्सने जिंकला. पोटाच्या आजारामुळे रोहित शर्मा (rohit sharma) कालचा सामना खेळू शकला नाही. सूर्यकुमार यादवने (suryakumar yadav) कर्णधार पदाची भूमिका बजावली. कोलकत्ता नाईट रायडर्स संघाने दिलेल्या 186 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने केवळ 17.4 षटकात हे आव्हान पूर्ण केले.

कालच्या सामन्यात रोहित शर्मा अंतिम अकरामध्ये नव्हता. मात्र इम्पॅक्ट प्लेयर म्हणून सलामीला फलंदाजीसाठी आला. ईशान किशन आणि रोहित शर्मा दोघांनी आक्रमक फलंदाजी करत मुंबई इंडियन्सला चांगली सुरुवात करून दिली. दोन षटकारांच्या मदतीने रोहित शर्माने तेरा चेंडू 20 धावांची खेळी केली. दुसरीकडे ईशान किशन (ishan Kishan) आज भलताच फॉर्ममध्ये होता. ईशान किशन ने 25 चेंडूत 58 धावांची वादळी खेळी साकारली.

ईशान किशन फलंदाजी करत असताना शाहरुख खानची मुलगी सुहाना खान (Suhana Khan) चांगलीच चिंतेत असल्याचे पाहायला मिळालं. एकीकडे कोलकत्ता नाईट रायडर्स संघाच्या गोलंदाजांची पळताभुई करत असताना दुसरीकडे सुहाना खान देखील मैदानाबाहेर अस्वस्थ होती. मोठा फटका मारण्याच्या नादात ईशान किशन वरून चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाला.

ईशान किशन त्रिफळाचित होताच सुहानी खानच्या तोंडातून वादग्रस्त शब्द निघाले. सुहाना खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. ईशान किशन बाद झाल्यानंतर, सुटकेचा निःश्वास सोडताना सुहाना खानच्या तोंडातून एक विचित्र शब्द बाहेर निघाला. ..ऑफ. सुहाना खानच्या या कृतीमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल देखील केलं गेेलं.

सुहाना खान आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी प्रत्येक सामन्या दरम्यान उपस्थित असते. शाहरुख खानची मुलगी असल्याने अर्थात मॅचदरम्यान सतत तिच्याकडे कॅमेरा दाखवला जातो. ईशान किशन बाद झाल्यानंतर, बरोबर तिच्या तोंडून निघालेली शिवी कॅमेऱ्यात कैद झाली. सुहाना खानला सोशल मीडियावर ट्रोल करताना काही युजर्स म्हणाले, आपण शाहरुख खानची मुलगी आहे, याचं भान ठेवायला हवं. शाहरुख खान प्रचंड सभ्य माणूस आहे. मात्र त्याची मुलगी खूपच विचित्र आहे. अशा प्रकारच्या देखील प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटू लागल्या.

हे देखील वाचा Animal Viral Video: खोल विहिरीतून मांजरीला बाहेर काढण्यासाठी माकडाची धडपड पाहून येतील अश्रू; पाहा हृदयस्पर्शी व्हिडिओ..

Ajit Pawar: ब्रेकिंग न्यूज! त्याचमुळे अजित पवारांनी आज अचानक रद्द केले सर्व कार्यक्रम; राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ..

RR vs GT: हार्दिक पांड्याने पुन्हा दाखवला माज, संजूशी असा भिडला; पाहा व्हिडिओ..

PAN Card: पॅन कार्ड हरवलंय? सोडून द्या चिंता! घरबसल्या असा करा ऑनलाईन अर्ज मिळून जाईल पॅन कार्ड..

Jiocinema: अंबानींचा ग्राहकांना दणका! फ्री नंतर आता Jio Cinema पाहण्यासाठी मोजावे लागणार पैसे..

How Should Men Urinate: या चुकीच्या पद्धतीने लघवी केल्यामुळेच होतोय मुतखडा; संशोधनातून धक्कादायक माहिती समोर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.