Salman Khan Shilpa Shetty: डेटवर घेऊन जाण्यासाठी शिल्पा शेट्टीच्या घरी पोहोचला सलमान खान अन् घडलं भलतंच..
Salman Khan Shilpa Shetty: 90 च्या दशकापासून बॉलीवूडवर (Bollywood) अधिराज्य गाजवणाऱ्या सलमान खानचे (Salman Khan) खाजगी आयुष्य चित्रपटापेक्षा ही रंजक राहिलं आहे. हो सलमान खानची लव लाईफ कोणाला माहित नसेल, असा कोणी शोधूनही सापडणार नाही. बॉलीवूडच्या अनेक दिग्गज अभिनेत्रींना सलमान खानने डेट केलं आहे. ऐश्वर्या राय आणि सलमान खान (Aishwarya Rai Salman Khan) या दोघांचं नातं तर जगजाहीर आहे. या दोन्हीं कपलची बॉलीवूडमध्ये जोरदार चर्चा असायची. याशिवाय सलमान खानने अनेक अभिनेत्रींना डेट देखील केलं आहे. (Salman Khan Shilpa Shetty dating each other)
सलमान खानच्या डेटिंगची लिस्ट खूप मोठी आहे. अजूनही सलमान खानचे नाव अनेक अभिनेत्री सोबत जोडलं जातं. काही दिवसांपूर्वी पूजा हेगडे (Pooja Hegde) सोबत सलमान खानचे नाव जोडलं गेलं होतं. आपल्या आगामी “किसी का भाई किसी की जान” या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सलमान खान व्यस्त आहे. रियालिटी शोमध्ये या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी सलमान खान हजेरी लावत आहे. अशाच एका रियालिटी शो कार्यक्रमात सलमानने आपल्या खाजगी आयुष्याविषयी खुलासा केल्याने खळबळ उडाली आहे.
फरान खान आणि शिल्पा शेट्टी (Farah Khan and Shilpa Shetty) उपस्थित असणाऱ्या एका रियालिटी शो दरम्यान सलमान खानने शिल्पा शेट्टी सोबत डेटवर जाण्यासंदर्भात खुलासा केला. दस का दम (Das ka dum) या कार्यक्रमात शिल्पा शेट्टी आणि फराह खानने हजेरी लावली असताना सलमान खानने आपल्या जवानीचे किस्से सांगितले. या शोमध्ये सलमान खान म्हणाला, शिल्पा शेट्टीला मी डिनरला घेऊन जाण्यासाठी तिच्या घरी पोहोचलो होतो.
शिल्पा शेट्टीच्या घरी मी जेव्हा पोहोचलो, तेव्हा शिल्पा शेट्टी तिसऱ्या मजल्यावर राहत होती. डिनरसाठी जाण्याकरिता शिल्पा शेट्टी खाली आली. तितक्यात मी वरती पाहिलं, तर बाल्कनीतून शिल्पा शेट्टीचे वडील पाहात होते. त्यानंतर मी शिल्पाच्या घरी गेलो, त्यांच्यासोबत गप्पा मारल्या. आम्ही दोघांनी ड्रिंक घेतली. शिल्पा आणि माझा डिनरला जाण्याचा प्लॅन देखील कॅन्सल झाला. पंधरा मिनिटं आमच्या सोबत बसल्यानंतर शिल्पा जाऊन झोपली. मी देखील पहाटे पाच वाजता घरातून बाहेर आलो.
“दस का दम” या रियालिटी शोमध्ये सलमान खानने केलेल्या खुलाशामुळे जवानीमध्ये शिल्पा शेट्टीला सलमान खानने डेट केल्याची चर्चा रंगली आहे. हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याबरोबरच सलमानने शिल्पाच्या वडिलांसोबत असणाऱ्या नात्याविषयी देखील भाष्य केलं. शिप्लाचे वडील अमी मी एकमेकांना काहीही बोलू शकत होतो. असे देखील सलमान खान यावेळी म्हणाला.
हे देखील वाचा CSK vs RCB: याला म्हणतात प्रेम..! पाहा धोनी आणि विराटचा हृदयस्पर्शी व्हिडिओ..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम