CSK vs RCB: याला म्हणतात प्रेम..! पाहा धोनी आणि विराटचा हृदयस्पर्शी व्हिडिओ..

0

CSK vs RCB: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर (RCB vs CSK) या दोन तुल्यबळ संघामध्ये आयपीएल सिझन16 चा 24 वा सामना काल बेंगलोरच्या चिन्हस्वामी क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला. आयपीएलच्या हंगामातील सर्वात चर्चेत असणारी ही लढत होती. क्रिकेट चाहत्यांना या सामन्याची प्रचंड उत्सुकता होती. महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली (Mahendra Singh Dhoni Virat Kohli video) या दोन दिग्गज खेळाडूंचे लाखों चाहते आहेत. याशिवाय दोन्ही खेळाडूंमध्ये असणारा रिस्पेक्ट देखील कमालीचा असल्याने या सामन्यांकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले होते. चेन्नई सुपर किग्स संघाने हा सामना जिंकल्यानंतरची काही दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. साहजिकच सोशल मीडियावर या सामन्यापेक्षा व्हिडिओचीच जास्त चर्चा रंगली आहे.

महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली या दोघांमध्ये असणारं नातं हे जगजाहीर आहे. दोघांचा एकमेकांप्रती कमालीचा रिस्पेक्ट आहे. विराट कोहली महेंद्रसिंग धोनीचे कौतुक करताना थकत नाही. दोघांच्या नात्यांमध्ये किती निखळत आहे, हे काल झालेल्या सामन्यानंतर पुन्हा पाहायला मिळाले. महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहलीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील थकणार नाही.

रॉयल चॅलेंजर बंगलोर संघाचा कर्णधार फाफ डुप्लेसीने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मात्र चेन्नई सुपर किंग संघाच्या फलंदाजांनी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाच्या गोलंदाजाची पळतभुई थोडी केली. सुरुवातीपासूनच चेन्नई सुपर किंग संघाच्या फलंदाजांनी आक्रमक पवित्रा घेत 20 षटकात 226 धावा उभारल्या.

विजयासाठी 227 धावांची आवश्यकता असताना, सुरुवात उत्तम होणे आवश्यक होतं. मात्र पहिल्याच षटकात विराट कोहलीच्या रूपात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाला मोठा धक्का बसला. परंतु त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि फाफ डुप्लेसी दोघांनी डावाची सूत्रे आपल्या हाती घेत बेंगलोर संघाला या सामन्यात जिवंत ठेवलं. या दोघांनी तब्बल 126 धावांची भागीदारी केली. तेराव्या षटकात ग्लेन मॅक्सवेल बाद झाल्यानंतर, हळूहळू चेन्नई सुपर किंग संघाच्या बाजूने सामना झुकायला सुरुवात झाली.

अखेर चेन्नई सुपर किंग्स संघाने 8 धावांनी सामना जिंकला. या सामन्याची उत्सुकता जितकी होती, त्याहून अधिक उत्सुकता विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी कसे भेटतात याकडे सगळ्यांचे लक्ष होतं. त्याच कारण म्हणजे, विराट कोहलीच्या पडत्या काळात महेंद्रसिंग धोनीने त्याला साथ दिल्याचे विराट कोहलीने जाहीरपणे सांगितले होते. एवढेच नाही, तर कर्णधार पद गेल्यानंतर एकट्या महेंद्रसिंग धोनीने विराट कोहलीला मेसेज केला होता.

सामना संपल्यानंतर प्रेझेंटेशन कार्यक्रमा दरम्यान विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी एकमेकांना मिठी मारत प्रेमाने एकमेकांची विचारपूस करताना पाहायला मिळाले. दोघेही गप्पा मारताना जोरजोरात हसताना देखील सोशल मीडियावर व्हायरस झालेल्या व्हिडिओत पाहिला मिळत आहे. दोघांच्या संभाषण दरम्यानचा हा व्हिडिओ फारच निखळ आणि प्रेमळ आहे. हा व्हिडिओ चाहत्यांना कमालीचा आवडला असल्याचं पाहायला मिळत आहे.

हे देखील वाचा IPL 2023: ईशान किशन बाद झाल्यानंतर सुहाना खानने हासडली ती घाणेरडी शिवी; पाहा व्हिडिओ..

Animal Viral Video: खोल विहिरीतून मांजरीला बाहेर काढण्यासाठी माकडाची धडपड पाहून येतील अश्रू; पाहा हृदयस्पर्शी व्हिडिओ..

RR vs GT: हार्दिक पांड्याने पुन्हा दाखवला माज, संजूशी असा भिडला; पाहा व्हिडिओ..

Jiocinema: अंबानींचा ग्राहकांना दणका! फ्री नंतर आता Jio Cinema पाहण्यासाठी मोजावे लागणार पैसे..

How Should Men Urinate: या चुकीच्या पद्धतीने लघवी केल्यामुळेच होतोय मुतखडा; संशोधनातून धक्कादायक माहिती समोर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.