Ajit Pawar: राष्ट्रवादीत भूकंप! अजित पवारांनी ट्विटर वरून शरद पवार, घड्याळ टाकले काढून; भाजप सोबत जाण्याचा हा प्लॅन तयार..

0

Ajit Pawar: अजित पवार (Ajit Pawar) आणि नाराजी नाट्य ही सामान्य गोष्ट आहे. अजित पवार नाराज असल्याच्या बातम्या माध्यमाला नवीन राहिल्या नाहीत. मात्र राष्ट्रवादीत आता मोठा भूकंप झाला आहे. काही दिवसांपासून अजित पवार भाजप सोबत हातमिळवणी करणार असल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या बातमीनुसार, अजित पवार 53 पैकी 35 आमदार सोबत घेऊन भाजप सोबत सत्ता स्थापन करणार असल्याचा दावा केला आहे. अशातच आता अजित पवारांनी मोठं पाऊल उचलल्याने खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वी अचानक अजित पवार नॉट रीचेबल झाले होते. एवढंच नाही, तर नॉट रीचेबल होऊन अजित पवार दिल्लीत अमित शहा यांना भेटल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने आपल्या वृत्तपत्रात दिले होते. आज पुन्हा एकदा इंडियन एक्सप्रेसने अजित पवार 35 आमदारांना सोबत घेऊन भाजप सोबत सत्ता स्थापन करणार असल्याचा दावा केला आहे. अजित पवारांनी या बातमीचे खंडन केले असले तरी, आता स्वतः त्यांनीच भाजपसोबत जाणार असल्याचे एक प्रकारे संकेत दिले आहेत.

एकीकडे महाविकास आघाडी वज्रमूठ सभेतून आपली ताकद दाखवून देत आहे. लोकांचा देखील चांगला प्रतिसाद महाविकास आघाडीला मिळत आहे. मात्र अचानक अजित पवार भाजप सोबत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अशातच आता अजित पवारांनी आपल्या ट्विटर (Twitter) आणि फेसबुक वरून राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सोबत असणारा आपला फोटो डिलीट केला आहे.

अजित पवार यांनी केलेले या कृत्यामुळे राष्ट्रवादी पक्षात सगळं काही आलबेल नसल्याचे स्पष्ट होत आहे. याशिवाय नितीन पवार, अण्णा बनसोडे, कोकाटे यांनी देखील आपण अजित पवार जो निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य असल्याचं म्हटले आहे. या सगळ्यांचा विचार केला तर राष्ट्रवादीत फूट पडली आहे, हे आता स्पष्ट होत आहे. यापूर्वी अजित पवार यांच्या ट्विटर आणि फेसबुकच्या प्रोफाईलवर राष्ट्रवादीचे चिन्ह घड्याळ, शरद पवार आणि स्वतःचा फोटो होता. आता मात्र हा फोटो काही वेळापूर्वीच अजित पवार यांनी डिलीट केला आहे.

आपल्या ट्विटर आणि फेसबुक वरून अजित पवार यांनी राष्ट्रवादी चिन्ह आणि शरद पवार यांच्यासोबत असणार आपला फोटो डिलीट केला असून, या फोटोच्या जागी स्वतःचा आणि निळ्या रंगाचे बॅकग्राऊंड असणारा फोटो ठेवण्यात आला आहे. याचा अर्थ आता अजित पवार वेगळा निर्णय घेणार आहेत, हे जवळपास स्पष्ट झालं आहे. राष्ट्रवादीच्या इफ्तार पार्टीत देखील अजित पवार अनुपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

अजित पवार भाजपमध्ये जाणार हे आता जवळपास स्पष्ट झालं असून, आपल्यासोबत तब्बल 35 आमदारांना ते घेऊन जाणार असल्याची माहिती आहे. अजित पवार भाजपमध्ये विलीन होणार नाहीत. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमाणे पक्षावर देखील अजित पवार दावा ठोकणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. भाजप राज्यात ऑपरेशन कमळ राबवणार असल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्यासोबत जाणाऱ्या आमदारांना राजीनामा द्यायला लावून पुन्हा निवडणूक लावण्याच्या तयारीत भाजप असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

हे देखील वाचा Ajit Pawar: ब्रेकिंग न्यूज! त्याचमुळे अजित पवारांनी आज अचानक रद्द केले सर्व कार्यक्रम; राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ..

CSK vs RCB: याला म्हणतात प्रेम..! पाहा धोनी आणि विराटचा हृदयस्पर्शी व्हिडिओ..

PM Kusum Yojana: सौर पंपासाठी सरकार देतंय 90 टक्के अनुदान; लगेच करा अर्ज..

Jiocinema: अंबानींचा ग्राहकांना दणका! फ्री नंतर आता Jio Cinema पाहण्यासाठी मोजावे लागणार पैसे..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.