PM Matritva Vandana Yojana: लग्न झालं असेल तर लगेच करा या पद्धतीने अर्ज; सरकार महिलांसाठी देतंय दरमहा इतके पैसे..

0

PM Matritva Vandana Yojana: महिलांच्या सक्षमीकरणासाठी (Women Empowerment) सरकार अनेक योजना (government scheme) राबवते. आर्थिक दुर्बल असणाऱ्या महिलांसाठी सरकार अनेक योजनांच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी करण्याचा प्रयत्न सातत्याने करत आहे. अशीच एक योजना आहे, ज्याच्या माध्यमातून महिलांना आर्थिक मदत म्हणून सरकार सहा हजार रुपये देते. पिएम मातृत्व असे या योजनेचे नाव असून, या योजनेच्या माध्यमातून सहा हजार रुपयांची आर्थिक मदत महिलांना केली जाते, जाणून घेऊया योजनेविषयी सविस्तर.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकार महीलांसाठी अनेक योजना राबवते. मात्र अनेकांना या योजनांविषयी माहिती मिळत नाही. शिवाय कोणत्याही किचकट प्रक्रियेचा सामना करावा लागू नये, म्हणून कोणी फारसे या योजनांकडे लक्ष देखील देत नाही. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही किचकट प्रक्रिया मधून जावे लागणार नाही.

..म्हणून सरकारने सुरू केली योजना

ही योजना सुरू करण्याचा उद्देश म्हणजे, देशामध्ये कुपोषित बालकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. कुपोषित बालक जन्माला येऊ नये, यासाठी भारत सरकारने योजना ही सुरू केली आहे. पंतप्रधान मातृत्व योजना असं या योजनेचे नाव असून, विवाहित महिला गरोदर राहिल्यानंतर चार टप्प्यात महिलांना सहा हजार रुपये सरकार या योजनेच्या माध्यमातून देते.

योजनेचे स्वरूप

प्रधानमंत्री मातृत्व योजनेच्या माध्यमातून विवाहित महिलांना गरोदर राहिल्यानंतर एकूण चार टप्प्यात सहा हजार रुपये देण्याचे काम सरकार करते. महिलांना पहिला हप्ता एक हजार रुपये देण्यात येतात. गरोदरपणामध्ये बालकाची काळजी घेण्यासाठी आर्थिक मदत व्हावी, यासाठी दुसऱ्या टप्प्यात 2000, तिसऱ्या टप्प्यात 2000 आणि मूल जन्मल्यानंतर, एक हजार रुपयाची आर्थिक मदत या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून केली जाते. अशा प्रकारे एकूण सहा हजार रुपयाची आर्थिक मदत विवाहित महिलांना सरकारकडून दिली जाते.

असा घेता येईल लाभ

जर तुम्ही विवाहित असाल, आणि गर्भवती असाल, तर तुम्हाला योजनेचा लाभ घेता येणार आहे. मात्र ज्या महिला सरकारी कर्मचारी आहेत, अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात आलं आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन, https://wcd.nic.in/schemes/pradhan-mantri-matru-vandana-yojana असं सर्च करायचं आहे.

त्यानंतर तुमच्यासमोर या विभागाची अधिकृत वेबसाईट ओपन होईल. वेबसाईटवर ओपन झाल्यानंतर तुम्हाला भाषा निवडायची आहे. त्यानंतर तुम्हाला सविस्तर अर्ज करता येणार आहे. यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे देखील तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील, या सर्व कागदपत्रांची पूर्तता तुम्हाला करायची आहे. विवाहित महिलांचे वय 19 वर्षापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑफलाईन पद्धतीने देखील अर्ज करू शकता. यासाठी तुम्ही पंचायत समिती, किंवा ग्रामपंचायतमध्ये देखील चौकशी करू शकता.

हे देखील वाचा PM Kusum Yojana: सौर पंपासाठी सरकार देतंय 90 टक्के अनुदान; लगेच करा अर्ज..

PM Kisan Yojana: या दिवशी येणार 14 वा हप्ता, पण त्याआधी करावं लागणार हे काम; तुम्हाला १४वा हप्ता मिळणार का? जाणून घ्या या पद्धतीने..

Marriage Tips: लग्नासाठी मुलगी पाहताय? मुलीमध्ये हेगुण नसतील तर चुकूनही करू नका लग्न; व्हाल उध्वस्त..

physical relationship: संबंध करताना चुकूनही खाऊ नका हे चार पदार्थ अन्यथा..

Salman Khan Shilpa Shetty: डेटवर घेऊन जाण्यासाठी शिल्पा शेट्टीच्या घरी पोहोचला सलमान खान अन् घडलं भलतंच..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.