NABARD Recruitment 2022: नाबार्डमध्ये निघालीय बंपर भरती; पदवीधरांसाठी आहे सुवर्णसंधी..

NABARD Recruitment 2022: नॅशनल बॅंक फॉर एग्रीकल्चर एन्ड रुरल डेव्हलपमेंट (NABARD) म्हणजेच नाबार्डने नुकतीच पदभरती जाहीर केली आहे. ग्रामिण भागाच्या विकासासाठी नाबार्ड काम करत असते. विविध योजनांना ग्रामीण स्तरावर व्यापक स्वरुप देऊन ग्रामीण भागातला विकास साधणे हा नाबार्डचा मुख्य हेतु असतो. शेतीवरील कर्ज तसेच ग्रामिण भागातील अर्थकारणासाठी नाबार्डला काही विशेष अधिकार प्रदान आहेत. कृषी क्षेत्राशी संबंधीत तथा ग्रामीण भागातील ईतर लघु ऊद्योगांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी १९८२ मध्ये नाबार्डची स्थापना करण्यात आली. ग्रामीण भागातल्या विविध विकास कामात नाबार्ड महत्वाची भूमिका निभावत आली आहे. (NABARD Recruitment 2022)

नाबार्डद्वारे लवकरच नवीन भरतीसाठीची घोषणा करण्यात येणार आहे. ज्याअंतर्गत १७७ पदे भरली जाणार आहेत. ग्रामीण भागातल्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. ग्रामीण भागातल्या बहुतांश तरुणांची ईच्छा असते, की त्यांनी त्यांच्याच भागात काम करुन विकासात्मक गोष्टींना प्राधान्य द्यावे, जेणेकरुन अधिक अधिक सोयीसुविधा ग्रामीण भागापर्यंत पोहचु शकतील. त्यामुळे जर तुमच्या मनात आपल्या परिसरा विषयी आस्था असेल, आणि तुम्ही पदवीधर असाल, तर ही संधी तुमच्याकडे सुवर्णसंधी आहे.

विकास सहाय्यकासाठी ही पदभर्ती केली जाणार आहे. या भर्तीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्विकारण्यात येतील. त्यामुळे https://www.nabard.org नाबार्डच्या या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला भेट द्यावी लागेल. विकास सहाय्यकाची ८२ पदे तर विकास सहाय्यक हिंदी विभागासाठीसाठी ९ पदे रिक्त आहेत. आता आपण या भरती प्रक्रियेसाठी पात्रता काय असणार आहे हे जाणून घेऊ.

पात्रतेचे निकष आणि पगार

वरील पदांसाठी नाबार्डच्या वतीने काही निकष ठरवुन देण्यात आले आहेत. अर्ज करणारा ऊमेदवार किमान ५० % गुणांसह कुठल्याही शाखेचा पदवीधर असणं आवश्यक आहे. त्यामुळे पदवीधरांसाठी ही सुवर्णसंधी आहे. तसेच या पदांसाठीची वयोमर्यादा २१ ते २५ वर्षे ठेवण्यात आली आहे. त्यामुळे जर तुम्ही या वयोमर्यादेत येत असाल, तर तुम्ही या पदांच्या निवड प्रक्रियेसाठी पात्र असणार आहे. ३२ हजार रुपये महिना असे वेतन या पदांसाठी ठरवण्यात आलेले आहे.

कसा कराल अर्ज

उमेदवारांना अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम क्रोम वर जाऊन https://www.nabard.org असं सर्च करायचे आहे. https://www.nabard.org असं सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर अधिकृत वेबसाइट ओपन झालेली असेल. त्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन नोंदनीचे ऑप्शन पाहायला मिळेल. तुम्ही यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी तुम्हाला पासपोर्ट आकाराचा फोटो, सही, आधार कार्ड, त्याचबरोबर अधिसूचनामध्ये देण्यात आलेली सर्व कागदपत्रे तुम्हाला स्कॅन करावी लागणार आहेत. कागदपत्रे स्कॅन केल्यानंतर तुम्ही फॉर्म भरल्यानंर एकदा संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक वाचा आणि त्या अर्जाची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवा.

हे देखील वाचा Marriage Tips: लग्नानंतर महिलांना या गोष्टीची असते सर्वात जास्त भिती; जाणून तुम्हीही जाल चक्रावून..

Relationship Tips धोकेबाज पार्टनरमध्ये असतात ही लक्षणे; आताच जाणून घ्या अन्यथा आयुष्य होईल उद्ध्वस्त..

Marriage Tips: या ६ पदार्थांचा आहारात करा समाविष्ट; लैंगिक क्षमता वाढून मिळेल भरपूर आनंद..

ITBP Recruitment: बारावी पास उमेदवारांसाठी या सरकारी विभागात मेगा भरती; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Lampi Virus: लम्पी रोगाचा महाराष्ट्रातही कहर; आपल्या जनावरांना वाचवण्यासाठी आत्ताच करा हे काम अन्यथा..

Pitru Paksha 2022: कावळ्या व्यतिरिक्त पितृपंधरवड्यात आपले पूर्वज या तीन रूपात देतात आशीर्वाद; त्यांना उपाशी पाठवणं असतं अशुभ..

Indian Army NCC Recruitment 2022: या उमेदवारांना भारतीय सैन्यात नोकरीची सुवर्णसंधी; पगार 50 हजार ते 2 लाखांपर्यंत..

PMMVY: या योजनेअंतर्गत गरोदर महिलांना मिळतात पाच हजार रुपये; जाणून घ्या कसा घ्यायचा लाभ..

Google pay loan: आता Google pay देणार एक लाखापर्यंतचे लोन; जाणुन घ्या कसा करायचा अर्ज..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.