Marriage Tips: या ६ पदार्थांचा आहारात करा समाविष्ट; लैंगिक क्षमता वाढून मिळेल भरपूर आनंद..

Marriage Tips: सध्याचे युग हे स्पर्धेचे आणि धावपळीचे आहे. प्रत्येकजण या स्पर्धेत स्वत: ला टिकवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतो. याशिवाय काही अनावश्यक भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले जातात. पण याचा परिणाम थेट तुमच्या आरोग्यावर होतो. शारीरीकतेसोबत, तुमचे मानसिक आरोग्य सुद्धा दिवसेंदिवस बाधीत होत जाते. रोजच्या धावपळीच्या जिवनात या गोष्टी फारशा लक्षात येत नाहीत. मात्र योग्य वेळी आपले शरीर आपल्याला त्या गोष्टींची जाणिव करुन देते. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये झालेला बदल, झोपण्याच्या बदललेल्या वेळा आणि वाढता ताणतणाव यामुळे विविध आजारांना आपणच निमंत्रीत करतो.

धावत्या लाईफस्टाईलचा (lifestyle) परिणाम आरोग्यासोबतच (Health) वैवाहिक जिवनावर (marriage Life) सुद्धा होतो. तरुण असून देखील शारीरीक कमजोरी जाणवायला लागते. वरुन शरीर सुदृढ दिसत असले, तरी आतुन मात्र ते कमजोर होत जाते. त्यामुळे विविध आजार आपल्या शरीराला जखडतातच, सोबतच वैवाहिक जिवनाचा पुरेसा आनंद घेण्यात सुद्धा आपण मागे राहतो. खाण्यापिण्याच्या सवयी, कामाचा ताण, वाढती व्यसनाधीनता आणि एकंदरीत बदलेली लाईफस्टाईल आपल्या लैंगिक क्षमतेवर सुद्धा परिणाम करायला लागते.

लैंगिक क्षमता कमी होणे किंवा मुळातच कमजोर असणे, याचची विविध कारणे असू शकतात. पण धावपळीच्या जिवनामुळे सुद्धा लैंगिक क्षमतेवर परिणाम होत. हे नाकारता येणार नाही. गैरसमाजातुन लहाणपणी सुद्धा बर्‍याच चुका आपल्या हातुन घडतात, ज्या भविष्याच्या दृष्टीने नुकसानदायी असतात. लैंगिक क्षमता कमी होणे, म्हणजे थेट वैवाहिक जिवनावर त्याचा परिणाम होतो. शारीरीक संबंधावेळी आपल्या जोडीदारास आपल्याकडून समाधानाची अपेक्षा असते. पण लैंगिक क्षमता कमजोर असल्यास ते समाधान आपण आपल्या जोडीदारास देऊ शकत नाही. त्यामुळे पुन्हा नैराश्याची भावना मनात जागृत होते. लैंगिक क्षमता वाढवुन जोडीदारास आनंदी आणि समाधानी ठेवण्यासाठी वैद्यकीय ऊपयांसोबतच काही घरगुती ऊपाय सुद्धा तुम्ही वापरु शकता. याच ऊपयांबद्दल आम्ही तुम्हाला येथे सांगणार आहोत.

शुद्ध आणि प्रथिनेयुक्त आहार माणसाला निरोगी ठेवते. त्यामुळे बर्‍यापैकी आजारांचे मुळ तुमची आहार पद्धती आहे. आहारामध्ये व्यवस्थीतरीत्या काही घटकांचा समावेश केल्यास पुष्कळ आजारांना तुम्ही तुमच्या शरीरापासून लांब ठेऊ शकता. लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी सुद्धा आहार हा फार महत्वाचा भाग आहे. वैद्यकीय ऊपचारा सोबतच घरगुती ऊपचार पद्धती वापरत असताना योग्य आहाराचा समावेश आपण केला पाहिजे. त्यामुळेच तुमची लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी तुम्ही काही गोष्टींचा आहारात समावेश करु शकता, जेणेकरुन तुम्ही तुमची क्षमता वाढवु शकाल याबाबत आम्ही तुम्हाला याठिकाणी सविस्तर सांगणार आहोत.

दुध

लहाण मुलांना आपण नियमीत दुध देतो. कारण दुधामध्ये हाडांना मजबुत करण्याची शक्ती आहे. लहाण मुलांमध्ये प्रतिकारशक्ती नव्याने निर्मित होत असते. त्यामुळे अशावेळी त्यांच्या आहारात काही महत्वाच्या गोष्टींचा समावेश करुन प्रतिकारशक्तीच्या वाढण्यात भर घातला पाहिजे. परंतू लहाण मुलांसोबतच मोठ्यांसाठी सुद्धा दुध तेवढेच फायदेशीर आहे. दुधात कॅल्शीयम आणि प्रोटीनची मात्रा अधिक असते. त्यामुळे रोज किमान एक कप दुध तरि घेतलेच पाहिजे. जेणेकरुन शारीरीक कमजोरी त्यामुळे दुर होते.

अंडी

पुरुषांनी अंडी खाल्लीच पाहिजे. अंड्यांमध्ये सुद्धा मोठ्याप्रमाणात विविध प्रोटीन्स समाविष्ट असतात. अंडी खाण्याचे पुष्कळ फायदे आहेत. जखम भरुन काढण्यात अंडी मदत करतात. मोठी शस्त्रक्रिया झाल्यानंतर सुद्धा डॉक्टर अंडी खाण्याचा सल्ला देतात. त्यामुळे अंड्याचे सेवन आहारात असलेच पाहिजे. अंडी शरीराला ऊर्जा प्रदान करतात. तसेच शारीरीक शक्ती सुद्धा वाढवतात. अंड्यातले काही पोषक तत्वे शरीरातील कमजोरीला दुर करते. ज्यामुळे आपोआप लैंगिक क्षमता वाढीस लागते.

केळी

केळींमध्ये कॅल्शियम आणि फायबरचे प्रमाण सर्वाधिक असते. आरोग्यासाठी केळी फार लाभदायक आहे. कॅल्शियममुळे हाडांच्या समस्यांपासून सुटका होते. फायबरमुळे शरीरातली ताकद वाढते. केळी लैंगिक क्षमता वाढवण्यात खुप ऊपयोगी आहे. केळीतले पोषक घटक तुमच्या लैंगिक क्षमतेला वाढवते. ज्यामुळे तुम्ही दिर्घकाळ टिकुन जोडीदारास समाधानी करु शकता व वैवाहिक जिवनाचा पुरेपुर आनंद घेऊ शकता.

मका

मका शरीरासाठी अत्यंत लाभकारी आहे. मक्यामध्ये व्हिटॅमीन “बी” चे प्रमाण जास्त असते. मक्याचे सेवन केल्यास शरीरातील कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते. वात आणि पित्त कमी करण्यासाठी देखील मका फायदेशीर आहे. गरम पाण्यात ऊकळुन मक्याचे दाणे खाल्ल्यास त्याचे पुष्कळसे फायदे आपल्या शरीराला होतात. फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे शारीरातील कमजोरी दुर करण्यात सुद्धा मका महत्वाची भूमिका निभावतो.

खजुर

खजुरामध्ये अनेक पोषक घटक असतात. खजुरामुळे शरीरातील ऊत्साह कायम राहतो. शरीराला ऊर्जा प्रदान करण्याचे काम देखील खजुर करते. याशिवाय हृदयरोगाच्या समस्या असणार्‍यांसाठी सुद्धा खजुर फायदेशीर आहे. खजुर शरीरातली उर्जा वाढवण्यात मदत करत असल्यामुळे शरीर नेहमी ताजेतवाने जाणवते. परिणामी लैंगिक क्षमता वाढवण्यात त्याची मदत होते.

कांदा

कांद्यामध्ये पोषक तत्वांचे प्रमाण सर्वाधीक असते. जेवतांना चवीसाठी ऊपयोग केला जाणारा कांदा शरीरासाठी प्रचंड फायदेशीर आहे. कांदा शरीरात ऊर्जा निर्माण करतो. पचनक्रिया अबाधीत ठेवण्यासाठी कांद्याचे फार मोठे योगदान आहे. लैंगिक अवयवाती रक्तपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सुद्धा कांदा ऊपयोगाचे असल्याचे म्हटलं जाते. त्यामुळे लैंगिक क्षमता वाढवायची असल्यास व त्याचबोरबर सुदृढ शरीर ठेवायचे असल्यास रोजच्या जेवणात कांद्याचा समावेश केलाच पाहिजे.

हे देखील वाचा Relationship Tips धोकेबाज पार्टनरमध्ये असतात ही लक्षणे; आताच जाणून घ्या अन्यथा आयुष्य होईल उद्ध्वस्त..

Pitru Paksha 2022: कावळ्या व्यतिरिक्त पितृपंधरवड्यात आपले पूर्वज या तीन रूपात देतात आशीर्वाद; त्यांना उपाशी पाठवणं असतं अशुभ..

ITBP Recruitment: बारावी पास उमेदवारांसाठी या सरकारी विभागात मेगा भरती; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Lampi Virus: लम्पी रोगाचा महाराष्ट्रातही कहर; आपल्या जनावरांना वाचवण्यासाठी आत्ताच करा हे काम अन्यथा..

Indian Army NCC Recruitment 2022: या उमेदवारांना भारतीय सैन्यात नोकरीची सुवर्णसंधी; पगार 50 हजार ते 2 लाखांपर्यंत..

PMMVY: या योजनेअंतर्गत गरोदर महिलांना मिळतात पाच हजार रुपये; जाणून घ्या कसा घ्यायचा लाभ..

Google pay loan: आता Google pay देणार एक लाखापर्यंतचे लोन; जाणुन घ्या कसा करायचा अर्ज..

Job: नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे; जाणुन घ्या कुठे कुठे आहेत नोकरीच्या संधी..

Extramarital affairs: या 6 कारणांमुळे ठेवले जातात विवाहबाह्य संबंध; विवाहबाह्य संबंधापासून दूर राहायचं असेल तर करा या गोष्टी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.