Job: नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे; जाणुन घ्या कुठे कुठे आहेत नोकरीच्या संधी..

Job: सध्या बेरोजगारीचे (unemployment) प्रमाण प्रचंड वाढत आहे. चांगले शिक्षण घेऊनही नोकर्‍या मिळणे दिवसेंदिवस कठिण होत चालले आहे. त्यामुळे तरुण वर्गात चिंतेचे वातावरण आहे. नवनवीन कोर्सेस शोधण्याचा प्रयत्न तरुणांकडून सातत्याने सुरु असतो. जेणेकरुन लवकर चागंली नोकरी मिळवता येईल. परंतू नोकरीचे आजचे वास्तव भयानक आहे. सहजरीत्या कुठलीही नोकरी मिळवणे कठिण झाले आहे.

मोठ्या प्रमाणात तरुण नोकरीच्या शोधात असतात, परंतू तरी देखील त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही. आज शिक्षणापेक्षा कौशल्याला महत्व आहे. त्यामुळे कौशल्ये आत्मसात करण्याकडे तरुणांचा कल असणे गरजेचे आहे. थेयरीटल शिक्षण घेण्यासोबतच प्रात्यक्षिकांवर सुद्धा तेवढाच भर देणे जरुरी आहे. जेणेकरुन प्रात्यक्षिकांमुळे आपण कौशल्ये आत्मसात करु शकतो.

आज नोकरीच्या अभावामुळे तरुणांमध्ये प्रचंड नैराश्य येते. ऊच्च शिक्षणात पैसा खर्च करुन सुद्धा मनासारखी नोकरी मिळत नाही. घरच्यांकडून सुद्धा प्रचंड अपेक्षा असतात. अपेक्षांच्या ओझ्याखाली जगतांना काही नविन कौशल्ये आत्मसात करण्यात युवावर्ग कुठेतरी कमी पडतो. परिणामी त्यांना नोकरी शोधण्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शिवाय सरकारी नोकऱ्यांमध्ये देखील आजकाल पुष्कळ समस्या आहे.

सरकारकडून अतिशय कमी जागा काढण्यात येतात. आणि स्पर्धा दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत नोकरी मिळवणे एक आव्हानच झाले आहे. वाढत्या वयानुसार योग्य ती नोकरी न मिळाल्यास आपल्या अनेक अपेक्षांवर आपल्याला पाणी सोडावे लागते. परंतू या लेखात आम्ही तुम्हाला नोकरी विषयी सविस्तर माहिती देणार आहोत. तसेच कुठे? कशा आणि काय स्वरुपात जागा सध्या निघालेल्या आहेत. याचीसुद्धा माहिती देणार आहोत.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, महावितरण, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमीटेड आणि ऊत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सध्या जागा निघालेल्या आहेत. त्यामुळे वरील ठिकाणी तुम्हाला नोकरीची संधी आहे. या सर्व विभागांमध्ये कुठे आणि कुठल्या भागात जागा निघालेल्या आहेत? याबद्दल माहिती सविस्तर माहिती जाणूण घेऊया.

राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी

राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत परभणी येथे एकुण ८२ जागा निघालेल्या आहेत. वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, MPW, लॅब टेक्नीशीयन या पोस्टसाठी तेथे जागा निघाल्या आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 82 रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहेत. सर्वप्रथम आपण शैक्षणिक पात्रता जाणून घेऊया.

शैक्षणिक पात्रता: वरील जागांसाठीची शैक्षणिक पात्रता काय असणार? हे आम्ही तुम्हाला याठिकाणी सांगणार आहोत. वैद्यकीय अधिकारी पदासाठी MBBS चे शिक्षण घेणं आवश्यक आहे. याशिवाय स्टाफ नर्ससाठी BSC नर्सरी GNM/ MPW शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. त्यासोबत लॅब टेक्नीशियनसाठी १२ वी पास तसेच DMLT डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

नोकरीचे ठिकाण परभणी या ठिकाणी असून, ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद परभणी, या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे. १६ सप्टेंबर अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमीटेड

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमीटेड मुंबई याठिकाणी एकुण १० जागांची भर्ती निघाली आहे. प्रयोगशाळा ऑपरेटर, संगणक सहाय्यक आणि प्रोग्रॅमिंग सहाय्यकच्या या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत केल्या जाणाऱ्या भरतीसाठी फक्त दहावी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आली आहे. उमेदवारांची कोणत्याही मान्यता प्राप्त शिक्षण मंडळातून दहावी उत्तीर्ण असेल, तर या नोकरीसाठी उमेदवार अर्ज करू शकतात. www.bharatpetrolium.in या वेबसाईटवर अर्ज करायचा आहे.

महावितरण सांगली

महावितरण सांगली येथे आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. ईलेक्ट्रीशियन आणि वायरमनाच्या तब्बल १०० जागा अप्रेंटशिपसाठी निघाल्या आहेत. www.mahadiscom.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करून उमेदवार महावितरण सांगली या ठिकाणी नोकरी करू शकतात. महावितरण सांगली या ठिकाणी केले जाणारे भरतीच्या शैक्षणिक पात्रतेचा विचार करायचा झाल्यास उमेदवारांची शैक्षणिक दहावी पास होणे आवश्यक आहे सोबतच उमेदवारचा आयटीआय शिक्षण पूर्ण असणे देखील महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुमचे ईलेक्ट्रीशियन आणि वायरमन या विभागात आयटीआयचे शिक्षण पूर्ण असेल तर त्वरीत अर्ज करा.

ऊत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव

ऊत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे एकुण २७ जागांची भर्ती काढण्यात आलेली आहे. प्राचार्य, सहाय्यक प्राध्यपक, क्रिडा शिक्षक, शारिरीक शिक्षक या पदांसाठीच्या या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. 27 रिक्त जागांसाठी होणाऱ्या या भरतीसाठी उमेदवारांच्या पात्रतेचा विचार करायचा झाल्यास, प्राचार्य या पदासाठी उमेदवारांची पीएचडी होणे आवश्यक आहे. याशिवाय पदव्युत्तर शिक्षण असणे गरजेचे आहे. या भरती प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. www.nmu.ac.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करून नोकरी करण्याच्या संधीचा लाभ घेऊ शकता. २१ सप्टेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

हे देखील वाचा Extramarital affairs: या 6 कारणांमुळे ठेवले जातात विवाहबाह्य संबंध; विवाहबाह्य संबंधापासून दूर राहायचं असेल तर करा या गोष्टी..

Law For Women भांडण सोडा, पत्नीला फक्त हे जरी म्हणाला, तरी खावी लागेल जेलची हवा; कायदा वाचून लग्न करायलाही घाबराल

Lata Koli News: बिबट्या झडप टाकणार इतक्यात वयोवृद्ध महिलेने टाकली पुर आलेल्या तापी. नदीत ऊडी; पुढे पुरात जे घडले ते पाहून..

Milk farming: पशुखाद्यामध्ये या पदार्थांचा करा समावेश; निरोगी रोग्याबरोबरच गाई म्हशी दूधही देतील दुप्पट..

Airtel vs Jio: एअरटेल की जिओ कोणतं सिम आहे बेस्ट? दोन्हीं कंपनींचे हे चार रिचार्ज प्लान पाहा, आणि तुम्हीच ठरवा..

flipkart big billion days: स्मार्टफोन, टीव्ही, लॅपटॉप, फ्रीजसह अनेक वस्तूंवर तब्बल 50% हून अधिक डिस्काउंट; जाणून घ्या कधी सुरू होतोय सेल..

Asia Cup final: पाकिस्तानला पराभूत करत श्रीलंकेने फायनलही जिंकला आणि रोहित शर्माचं तोंडही बंद केलं..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.