Viral video: ‘या’ किरकोळ कारणासाठी डिलिव्हरी बॉयला चपलने मारू लागली तरूणी; तळपायाची आग मस्तकात जाणारा व्हिडिओ एकदा पहाच..

0

Viral video: अलीकडच्या काळात सोशल मीडियावर आपल्या आसपास घडणाऱ्या घटनांचे देखील व्हिडिओ तुफान व्हायरल होतात, आणि आपल्याला माहितही पडत नाही. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल झाला आहे. एका फूड डिलिव्हरी बॉयला भर रस्त्यात एका मुलीने चपलेने बेदम मारहाण केल्याचा हा व्हिडिओ आहे. चुकून आपली टू-व्हीलर समोर असणाऱ्या मुलीच्या गाडीला धडकली, एवढाच काय तो याचा दोष.

उंचपुर्‍या मुलाला भर रस्त्यात मुलीने केलेल्या बेदम मारहाणीमुळे एकच खळबळ उडाली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला. विशेष म्हणजे मुलीला समजावण्यासाठी आसपास असणारी अनेक लोकं आली मात्र, या मुलीने या लोकांसोबत देखील असभ्य वर्तन केल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. एका गुंडासारखं ही मुलगी डिलिव्हरी बॉयला लाथा देखील मारताना पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ मध्य प्रदेशामधील जबलपूर जिल्ह्यातला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत एक मुलगी भररस्त्यात डिलिव्हरी बॉयला चपलेने मारताना पाहायला मिळत आहे. काही लोकं भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी झाले. मात्र ही मुलगी या लोकांवरच भडकल्याचं पाहायला मिळत आहे. मला दुखापत झाली आहे, तुम्हाला नाही, अशी उगरट भाषा ही मुलगी वापरताना पाहायला मिळत आहे. शेवटी हे प्रकरण पोलिस स्टेशनला गेलं. आणि या मुलीवर गुन्हा दाखल झाला.

@sirajnoorani नावाच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून, ‘दिलीप विश्वकर्मा’ असं या डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. हा पंचवीस वर्षाचा मुलगा ‘नताल चरागणवा’ या ठिकाणचा रहिवासी असल्याची माहिती आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, ओमटी पोलिस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. या पिडीत मुलाने सांगितलेल्या माहितीनुसार, मुलगी स्वतः माझ्याजवळ येऊन स्कुटीवरून तोल गेल्याने खाली पडल्याचं सांगण्यात आलंय.

डिलिव्हरी बॉय पिझ्झा डिलिव्हरी घेऊन जात असताना ही घटना घडली. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून तुमचा संताप अनावर होईल. स्वतःच्या चुकीने छोटासा एक्सीडेंट झाला तरीही, मुलगी विनाकारण या मुलाला चपलने मारत असल्याचा हा व्हिडिओ अनेकांना पाहवत नसल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर अनेकांनी या मुलीवर टीका केली आहे. मुलगी आहे, याचा अर्थ हवी तशी वर्तणुक करायची, असा अजिबात होत नाही. लवकरात लवकर या मुलीवर कारवाई झाली पाहिजे, असं अनेक नेटकरी म्हणताना पाहायला मिळत आहे.

हे देखील वाचा Viral video: अजगर बिबट्याला जिवंत गिळायला गेलं पण् तुम्हीच पहा काळजाचं पाणी-पाणी करणारा video

Online earn: रोज 1,000 ते 5,000 रुपये कमवण्याची सुवर्ण संधी;  यासाठी फक्त स्मार्टफोन आणि इंटरनेटची आवश्यकता..

Viral video: काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ! चित्त्याला पळवून पळवून हरणाने केले बेजार, पक्षासारखी हवेत उडीही घेतली पण् शेवटी..

Yojana: काय आहे शरद पवार ग्रामसमृद्धी योजना? योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज आणि मिळवा दोन लाख अनुदान..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.