Viral video: काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ! चित्त्याला पळवून पळवून हरणाने केले बेजार, पक्षासारखी हवेत उडीही घेतली पण् शेवटी..

0

Viral video: अलिकडच्या काळात सोशल मीडियावर प्राण्यासंदर्भातले रोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत आहेत. प्राण्यांच्या जीवनशैली विषयी अनेकांना जाणून घेण्याची उत्सुकता असल्याने, हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पाहिले देखील जात आहेत. अनेक जण या व्हिडीओंना लाईक करताना शेअरही करत आहेत. आता पुन्हा एकदा चित्ता हरणाची शिकार करत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, हा व्हिडिओ पाहताना अनेकांच्या काळजाचा थरकाप उडतो आहे.

सोशल मीडियावर आपण नेहमी प्राणी एकमेकांची शिकार करत असतानाचे व्हिडिओ पाहतो. कधी काळजाचा थरकाप उडणारे व्हिडिओ असतात, तर कधी इमोशनल करणारे व्हिडिओ देखील आपण नेहमी पाहतो. मात्र एक चित्ता आणि हरणाच्या लढाईचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, हरणाने दिलेली झुंज अनेकांना आवडली असल्याचं पाहायला मिळत आहे. हरीण पक्षासारखं हवेत उडाल्याचंही या व्हिडिओत पाहायला मिळत असून, तुम्ही देखील हा व्हिडिओ पाहून अवाक् व्हाल.

चित्ता किती चपळ आणि हिंस्र प्राणी आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. चित्त्याने जर एखाद्या प्राण्याची शिकार करायची ठरवलं तर, समोरच्या प्राण्याचा खेळ खल्लास म्हणून समजा. अनेक प्राण्यांची विविध प्रकारे शिकार करताना आपण चित्त्याला अनेक वेळा पाहिला असेल. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत हरणाची शिकार करताना चित्त्याचा किती घाम-घाम निघाला, हे पाहून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल. हरिण किती वेगाने धावते, हे सगळ्यांना ज्ञात आहे. मात्र हरीन नेहमी घाबरल्यामुळे हार मानतं, आणि नेहमी अनेकांनी शिकार होतं.

काय घडलं नेमकं?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत एका हरणाची शिकार चित्ता करत असताना पहिला मिळत आहे. व्हिडिओत हरीण चित्त्यापासून आपला जीव वाचवण्यासाठी वाऱ्याच्या वेगाने धावत असताना पाहायला मिळत आहे. चित्ता देखील या हरणाच्या पाठीमागे जोरदार धावत आहे. हरीन पुढे आणि चित्ता मागे हे दृश्य पाहताना अंगावर काटा येतो. या लढाईत नक्की काय होणार? याची उत्सुकता अनेकांना लागून राहते. मोठ्या शर्थीचे प्रयत्न करून हरीण आपला जीव चित्याच्या तावडीतून वाचवताना पाहायला मिळत आहे.

चित्ता आपली पाठ सोडायला तयार नाही, हे लक्षात आल्यानंतर हरीण आता काहीतरी वेगळं करायचं या प्रयत्नात असताना दिसून येतं. आणि क्षणात हरिण पक्षासारखं उंच हवेत उडी घेतं. हरणाने घेतलेली उंच उडी पाहून, चित्ता देखील एक क्षण अवाक् होतो. मात्र तो मागे हटायला तयार नसल्याचं, देखील या व्हिडिओत पाहिला मिळत आहे. चित्त्यापासून आपला जीव वाचवण्यासाठी हरणाने प्रचंड मेहनत केली. वाऱ्यासारखा वेग धारण केला, शिवाय पक्षासारखी हवेत उंच उडी देखील मारली. मात्र तरीदेखील हरीण स्वतःला चित्त्याच्या तावडीतून वाचवू शकलं नाही.

अखेर चित्त्याने हरणाला गाठून शिकार केली. मात्र हरणाने चित्त्यापासून वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न, हवेत मारलेली उडी, सगळ्यांनाच भावली असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकांनी हरणाचे कौतुक केलं असून, या व्हिडिओखाली कमेंट देखील केल्या आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ wildlife_stories_या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत पन्नास हजाराहून अधिक लोकांनी पाहिला देखील आहे.

हे देखील वाचा Viral video: नवरीच्या वेशात रानू मंडलने गायलं कच्चा बदाम गाणं पण् घडलं भलतंच; तुम्हीच पहा हा विचित्र व्हिडीओ..

Viral video: गप्पा मारत असताना अचानक पाचही जण गेले जमिनीत; पुढे काय झालं? तुम्हीच पहा व्हिडिओ

Viral video: हादरवून टाकणारा व्हिडिओ..! शरीरातून अचानक बाहेर काढला आत्मा; पुढे काय घडलं तुम्हीच पहा..

IPL 2022: पाच वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणाऱ्या ‘मुंबई’चा या कारणांमुळे होणार सलग सहावा पराभव; वाचा सविस्तर..

IPL 2022: आयपीएल पाहण्यासाठी आता Disney+ Hotstar ला रिचार्ज करण्याची गरज नाही; असा घ्या लाभ..

Jay pawar:या  प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीसोबत शरद पवारांच्या नातूचा कारनामा कैमेऱ्यात कैद; पहा व्हायरल फोटोत..

Yojana: काय आहे शरद पवार ग्रामसमृद्धी योजना? योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज आणि मिळवा दोन लाख अनुदान..

 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.